फॉर्म 174

1. अवलोकन

फॉर्म 174 हा पेन्शन फंडाद्वारे त्यांचा लाभांश, व्याज, आयकर अधिनियम, 2025 च्या कलम 92(2)(k) मध्ये संदर्भित असलेली कोणतीही सवलत आणि भारतातील एखाद्या निर्दिष्ट व्यक्तीने केलेल्या गुंतवणुकीतून उद्भवणारा भांडवली नफा यावर 100% कर सवलत मिळवण्यासाठी फाइल केला जातो, मग ही गुंतवणूक कर्ज, शेअर भांडवल किंवा युनिटच्या स्वरूपात असो.

2. ही सेवा मिळवण्यासाठीच्या पूर्व-अटी

•  करदाता ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असावा.
•  करदात्याकडे ई-फाइलिंग 2.0 पोर्टलचे वैध वापरकर्तानाव (पॅन) आणि पासवर्ड असावा.
•  पॅन डेटाबेसनुसार करदात्याच्या पॅनची स्थिती "सक्रिय" असावी.
•  DSC पद्धतीद्वारे फॉर्मची पडताळणी करण्यासाठी करदात्याकडे वैध DSC असणे आवश्यक आहे. ते ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असावे आणि त्याची वैधता कालबाह्य झालेली नसावी.

3. फॉर्मबद्दल माहिती

3.1 हेतू

या फॉर्मचे उद्दिष्ट म्हणजे भारतात निर्दिष्ट व्यक्तीने कर्ज, भागभांडवल किंवा एककांच्या स्वरूपात केलेल्या गुंतवणुकीतून प्राप्त होणारे लाभांश, व्याज, आयकर अधिनियम, 2025 च्या कलम 92(2)(k) मध्ये नमूद केलेली कोणतीही राशी आणि भांडवली नफा यांवर 100% कर सवलत मिळवणे होय.

3.2 याचा वापर कोण करू शकते/शकतो?

फॉर्म 174 हा आयकर कायदा, 2025 च्या अनुसूची V [सारणी: अनुक्रमांक 7. टीप 5(a)(iii)(D)] नुसार पेन्शन फंडाद्वारे फाइल केला जातो. असा पेन्शन फंड जो केंद्र सरकारद्वारे या हेतूसाठी अधिसूचनेद्वारे निर्दिष्ट केला गेला आहे आणि अशा अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करतो; तसेच विहित केलेल्या इतर अटींची पूर्तता करतो.

3.3 फॉर्मचा संक्षिप्त आढावा

फॉर्म 174 चे 4 पॅनल्स आहेत:

  1. भाग A - पेन्शन फंडाचा तपशील
  2. किंवा भाग B - प्रमाणन
  3. जोडपत्रे
  4. पडताळणी
Data responsive

4. क्रमवार मार्गदर्शक

स्टेप 1: तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करा.

Data responsive

स्टेप 2: वापरकर्ता आयडी (पॅन) आणि पासवर्ड प्रविष्ट करा.

Data responsive

स्टेप 3: ई-फाइल > आयकर फॉर्म्स > आयकर फॉर्म्स फाइल करा वर जा.

Data responsive

स्टेप 4: तीन टॅब्जपैकी, कृपया आयकर अधिनियम 2025 नुसार फॉर्म्स टॅब निवडा, फॉर्म 174 निवडा किंवा शोधा, आणि आत्ता फाइल करा बटणावर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 5: पॅन, सादर करण्याची पद्धत, फाइलिंगचा प्रकार तपासा आणि लागू असलेले कर वर्ष निवडा आणि पुढे सुरू ठेवा बटणावर क्लिक करा.

Data responsive

स्‍टेप 6:चला सुरू करूया वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 7: "चला सुरू करूया" वर क्लिक केल्यावर, वापरकर्त्याला पॅनल स्क्रीनवर नेले जाईल. पुढे जाण्यासाठी पहिले पॅनल निवडा: भाग A - पेन्शन फंडाचा तपशील निवडा. संबंधित तपशील भरा, पडताळणी करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.

टीप: कृपया सुनिश्चित करा की पत्त्यासह "माझे प्रोफाइल" विभागातील सर्व अनिवार्य तपशील पूर्ण केले आहेत. तुम्ही “माझे प्रोफाइल” या हायपरलिंकवर क्लिक करून तुमचा संपर्क आणि पत्त्याचा तपशील अपडेट करू शकता.

Data responsive

स्टेप 8: पहिले पॅनल सेव्ह केल्यानंतर, दुसरे पॅनल: भाग B – प्रमाणन निवडा.

कृपया चेकबॉक्सवर क्लिक करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 9: दुसरे पॅनल सेव्ह केल्यानंतर, तिसरे पॅनल: जोडपत्रे निवडा. कृपया या “जोडपत्रे ” पॅनलमध्ये संबंधित कागदपत्रे जोडा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 10: तिसरे पॅनल सेव्ह केल्यानंतर, “पडताळणी" पॅनल निवडा. पडताळणी पॅनलची पुष्टी करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 11: पडताळणी पॅनल सेव्ह केल्यानंतर, पॅनलची स्थिती पूर्ण म्हणून दर्शविली जाईल आणि त्यानंतर पूर्वावलोकन करा बटण सक्षम होईल.

Data responsive

स्टेप 12: पूर्वावलोकन पेजवर, तपशीलांची पडताळणी करा आणि ई-पडताळणीकडे जा वर क्लिक करा.

टीप: “डाउनलोड करा” बटणावर क्लिक करून, वापरकर्ता पूर्वावलोकन PDF डाउनलोड करू शकतो आणि ई-पडताळणी सुरू करण्यापूर्वी तपशीलांची पडताळणी करू शकतो/शकते.

Data responsive

स्टेप 13: ई-पडताळणीसाठी पुढे जा बटणावर क्लिक केल्यानंतर, एक पॉप-अप पुष्टीकरण दिसेल ज्यामध्ये तुम्ही ई-पडताळणी करण्यासाठी पुढे जाऊ इच्छिता का असे दर्शवले जाईल. होय वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 14: होय वर क्लिक केल्यावर, तुम्हाला ई-पडताळणी पेजवर नेले जाईल, जिथे तुम्ही DSC/EVC चा वापर करून फॉर्म 174 ची पडताळणी करू शकता.

टीप: अधिक माहितीकरिता ई-पडताळणी कशी करावी या उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्‍या.

स्टेप 15: ई-पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, व्यवहार आयडी आणि पोचपावती क्रमांकासह यशस्वीतेचा संदेश प्रदर्शित होईल. भविष्यातील संदर्भासाठी कृपया व्यवहार आयडी आणि पोचपावती क्रमांक नोंदवून ठेवा. तसेच, ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत ईमेल आयडीवर आणि मोबाईल क्रमांकावर तुम्हाला पुष्टीकरणाचा संदेशही प्राप्त होईल.

पोचपावती क्रमांक डाउनलोड करण्‍याकरिता डाउनलोड करा या बटणावर क्लिक करा.

Data responsive

फॉर्म 189 यशस्वीरित्या सबमिट केल्यावर वापरकर्ता फाइल केलेला फॉर्म येथे पाहू शकतो - तुमच्या डॅशबोर्डवर, ई-फाइल > आयकर फॉर्म्स फाइल करा > फाइल केलेले फॉर्म्स पहा > आयकर अधिनियम 2025 अंतर्गत फाइल केलेले फॉर्म्स या टॅब वर क्लिक करा.

टीप: अधिक माहितीसाठी फाइल केलेला फॉर्म पहा या उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.

5. संबंधित विषय

6. शब्दावली

संक्षेप/संक्षिप्त रूप वर्णन/पूर्ण रूप
DSC डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र
EVC इलेक्ट्रॉनिक पडताळणी प्रमाणपत्र
ARN पोचपावती क्रमांक
PY मागील वर्ष
FY आर्थिक वर्ष
TY कर वर्ष