फॉर्म 41 उपयोगकर्ता पुस्तिका

 

1.अवलोकन

करारा अंतर्गत ज्या करदात्यांच्या उत्पन्नावर भारतात आणि अन्य एखाद्या देशात अशा दोन्ही ठिकाणी कर आकारला जातो त्यांना दुहेरी कर आकारणी सवलत उपलब्ध असते. अशा दाव्यांची पडताळणी आयकर विभागाला करता यावी यासाठी, अनिवासी करदात्यांना विशिष्ट अतिरिक्त माहिती प्रस्तुत करणे आवश्यक असते.

हे तपशील सादर करण्यासाठी फॉर्म 41 हा विहित प्ररुप आहे. आयकर अधिनियम 159 अंतर्गत, जेव्हा एखादा अनिवासी दुहेरी कर आकारणी टाळण्याच्या करारा अंतर्गत कर सवलतीचा दावा करु इच्छितो, तेव्हा हा फॉर्म फाइल करणे अनिवार्य असते. फॉर्म 41 फाइल करण्याने, नियम 75 अंतर्गत आवश्यक असलेली पूरक माहिती योग्यरित्या सादर केली गेली आहे हे सुनिश्चित होते, जेणेकरून कर सवलतीचा दावा अचूकपणे करता येतो.

फॉर्म 41 ई-फाइलिंग पोर्टलवर उपलब्ध केला आहे आणि तो केवळ ऑनलाइनच भरता येईल.

2.ही सेवा मिळवण्यासाठी आवश्यक पूर्व अटी

  • तुम्ही ई-फाइलिंग पोर्टलवर वैध वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड असलेले नोंदणीकृत वापरकर्ता असणे आवश्यक आहे.
  • ज्या अनिवासी व्यक्तीकडे पॅन नाही आणि ज्यांना पॅन असणे अनिवार्य नाही ("अनिवासी करदाता"), त्यांनी हा फॉर्म करदात्यांच्या या श्रेणीसाठीच विशेषत्वाने तयार करण्यात आलेल्या एका स्वतंत्र लॉगिनद्वारे फाइल करावा
  • अर्जदाराचा देश किंवा त्याच्या निवासस्थानाच्या प्रदेशातील कर ओळख क्रमांक
  • कलम 159(8) मध्ये संदर्भित प्रमाणपत्राची प्रत
  • तुम्ही DSC पद्धतीने फॉर्म पडताळणी करण्याचा पर्याय निवडल्यास, तुमच्याकडे एक वैध DSC असणे आवश्यक आहे, आणि (पॅन लॉगिनच्या बाबतीत) ते ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असावे आणि त्याची मुदत संपलेली नसावी

3.फॉर्मबद्दल माहिती 

3.1 हेतू

आयकर अधिनियम, 2025 अंतर्गत अनिवासी करदात्याच्या उपन्नावर कर करारा अंतर्गत भारत आणि अन्य एखाद्या देशात असे दोन्हीकडे कर आकारला जात असल्यास, त्या करदात्यास कर सवलत मिळवण्याची परवानगी असते. अशा कर दाव्यास समर्थन देण्यासाठी, निर्धारित करदात्यास विशिष्ट माहिती आणि कागदपत्रे कर अधिकाऱ्यांसह शेअर करणे अनिवार्य असते.

फॉर्म 41 हे तपाशील सादर करण्याचे विहित प्ररुप आहे. ह्या फॉर्ममुळे अनिवासी करदात्यास कलम 159 आणि नियम 75 अंतर्गत आवश्यक तपशील सादर करण्याची परवानगी मिळते, जेणेकरून करदाता दुहेरी कर टाळण्याच्या करारा (DTAA) अंतर्गत उपलब्ध कारारातील सवलतीचा दावा करु शकतो.

3.2 कोण ह्याचा वापर करु शकतो?

ई-फाइलिंग पोर्टलवर सर्व अनिवासी नोंदणीकृत वापरकर्ते, आयकर अधिनियम 2025 च्या कलम 159(8) अंतर्गत अनिवार्य माहिती सादर करण्यासाठी फॉर्म 41 मध्ये आवश्यक तपशील सादर करू शकतात.

3.3 फॉर्मचा संक्षिप्त आढावा

फॉर्म 41 मध्ये तीन पॅनल्स आहेत:

  1.  भाग A: अर्जदाराचे तपशील
    2.  भाग B: निवास स्थानाची माहिती
    3. घोषणापत्र आणि पडताळणी

4. क्रमवार मार्गदर्शक

स्टेप 1: स्टेप 1: तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करा.

Data responsive

स्टेप 2: वापरकर्ता आयडी म्हणून (पॅन-ज्या अनिवासी व्यक्तींकडे पॅन आहे त्यांच्यासाठी आणि NR ID-असे वापरकर्ते ज्यांनी पॅन नसलेल्या अनिवासी श्रेणीअंतर्गत नोंदणी केली आहे त्यांच्यासाठी) आणि पासवर्ड प्रविष्ट करा.

Data responsive

स्टेप 3: ई-फाइल > आयकर फॉर्म्स > आयकर फॉर्म्स फाइल करा वर जा.

Data responsive

स्टेप 4: आयकर अधिनियम 2025 नुसार फॉर्म्स टॅब निवडा, फॉर्म 41 शोधा, आणि आत्ता फाइल करा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 5: लागू कर वर्ष निवडा आणि पुढे सुरु ठेवा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 6: चला सुरू करुया वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 7: चला सुरू करुया बटणावर क्लिक केल्यानंतर, वापरकर्त्यास पॅनल स्क्रीन वर नेले जाईल आणि पहिले पॅनल निवडा: "भाग A: अर्जदाराचे तपशील".

Data responsive

स्टेप 8: तपाशीलांची पुष्टी करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.

टीप: कृपया "माझे प्रोफाइल" विभागातील पत्त्यासह सर्व आवश्यक तपशील पूर्ण भरले असल्याचे सुनिश्चित करा. तुम्ही "माझे प्रोफाइल" हायपरलिंकवर क्लिक करून तुमचा संपर्क आणि पत्ता अपडेट करु शकता.

Data responsive

स्टेप 9: पहिले पॅनल सेव्ह केल्यानंतर, पहिले पॅनलची स्थिति पूर्ण अशी दाखवली जाईल त्यानंतर दुसरे पॅनल: "भाग B: निवासस्थानाची माहिती".

Data responsive

स्टेप 10: दुसऱ्या पॅनलमध्ये आवश्यक तपशील भरा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.

Data responsive

 

Data responsive

स्टेप 11: दुसरे पॅनल सेव्ह केल्यानंतर, पॅनलची स्थिति पूर्ण अशी दाखवली जाईल त्यानंतर तिसरे पॅनल निवडा: "घोषणापत्र आणि पडताळणी".

Data responsive

स्टेप 12: तिसऱ्या पॅनलमध्ये आवश्यक तपशील भरा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 13: तिसरे पॅनल सेव्ह केल्यानंतर, पॅनलची स्थिति पूर्ण अशी दाखवली जाईल त्यानंतर पूर्वावलोकन करा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 14: पूर्वावलोकन पेजवर, तपाशीलांची पडताळणी करा आणि ई-पडताळणीसाठी पुढे जा वर क्लिक करा.

Data responsive

 

Data responsive

स्टेप 15: ई-पडताळणीसाठी पुढे जा बटणावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुम्हाला ई-पडताळणी पुढे चालू ठेवायची आहे का असा संदेश दाखवणारा एक पॉपअप दिसेल, होय वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 16: होय वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला ई-पडताळणी पेजवर नेले जाईल जिथे तुम्ही तुमच्या लॉगिन प्रकारावर आधारित फॉर्म 41 ची पडताळणी करु शकता:

1. पॅन लॉगिन: EVC किंवा DSC (लागू असल्यास) वापरुन पडताळणी करा
2. NR आयडी लॉगिन: तुमच्या ई-मेल आणि मोबाइल क्रमांकावर पाठवलेला ओटीपी वापरुन पडताळणी करा

टीप:अधिक जाणून घेण्यासाठी ई-पडताळणी कशी करावी ह्याचे उपयोगकर्ता पुस्तिका पहा.

ई-पडताळणी यशस्वी झाल्यानंतर, व्यवहार आयडी आणि पोचपावती क्रमांकासह यशस्वीतेचा संदेश दाखवला जाईल. कृपया भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार आयडी आणि पोचपावती क्रमांकाची नोंद तुमच्याजवळ ठेवा. तुम्हाला ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत ई-मेल आणि मोबाइल क्रमांकावर देखील पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल.

Data responsive

5.संबंधित विषय

6. शब्दावली

संक्षेप/संक्षिप्त रुप वर्णन/पूर्ण फॉर्म
DSC डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र
EVC इलेक्ट्रॉनिक पडताळणी प्रमाणपत्र
ARN पोचपावती क्रमांक
FY आर्थिक वर्ष