टॅन लॉगिनद्वारे चालन तयार करा

Frequently Asked Questions

ITNS 281N बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. ITNS 281N म्हणजे काय?

ITNS 281N हा आयकर अधिनियम, 2025 अंतर्गत स्रोतावर कपात केलेला कर (TDS) आणि स्रोतावर संकलित केलेला कर (TCS) यांचा भरणा करण्यासाठी वापरला जाणारा चलान फॉर्म आहे.

2. ITNS 281N अंतर्गत कोणत्या मुख्य शीर्ष आणि लघु शीर्षांचा समावेश आहे ?

मुख्य शीर्ष:
• कंपनी कर (0020)
• आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त) (0021)
लघु शीर्ष:
• करदात्याद्वारे देय TDS/TCS (200)
• TDS/TCS नियमित निर्धारण (400)
• इतर प्राप्ती (500)
• पॅन-आधारित TDS मागणीचा भरणा (800)

3. ITNS 281N वापरून भरणा करण्यासाठी कोणता अधिनियम लागू होईल?

ITNS 281N फॉर्मचा वापर आयकर अधिनियम, 2025 अंतर्गत कर वर्ष 2026-27 पासून पुढील कर भरण्यासाठी करता येतो. आयकर अधिनियम, 1961 अंतर्गत भरणा करण्यासाठी करदात्यांनी ITNS 281 चा वापर करावा.

4. आयकराचा भरणा करण्यासाठी ITNS 281N कुठे उपलब्ध आहे?

लॉगिननंतर (TAN):
लॉगिन → ई-फाईल → ई-कर भरणा → लागू असलेला आयकर अधिनियम निवडा → नवीन पेमेंट
लॉगिनपूर्वी:
डॅशबोर्ड → ई-कर भरणा (जलद लिंक) → लागू असलेला आयकर अधिनियम निवडा → TAN आणि मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा → ओटीपी पडताळणी → TDS/TCS भरणा, शुल्क भरा [इतर प्राप्ती (500)] किंवा विविध प्राप्तींची टाइल निवडा.

5. ITNS 281N द्वारे एकापेक्षा अधिक कलम कोडसाठी पेमेंट भरणा करता येते का?

होय.लघु शीर्ष 200 अंतर्गत, एकाच चलानाद्वारे एकापेक्षा अधिक कलम कोड्ससाठी पेमेंट करता येते. मात्र, एका चलानामध्ये जास्तीत जास्त 20 कलम कोड्सचा समावेश करता येतो. 20 पेक्षा अधिक कलम कोड्ससाठी पेमेंट करायचे असल्यास, अतिरिक्त चलानाचा वापर करावा लागेल. कर कपात प्राप्त करणार्‍याच्या (करणार्‍यांच्या) निवासी स्थितीनुसार ड्रॉप-डाउन यादीमध्ये कलम कोड्स प्रदर्शित केले जातात.

6. लघु शीर्ष 500 अंतर्गत पेमेंट करताना, कर विभाजनाच्या तपशीलामध्ये कोणते फील्ड वापरावे?

लघु शीर्ष 500 अंतर्गत पेमेंट करताना, अपील शुल्क आणि तडजोड शुल्क यांसाठी स्वतंत्र चलाने जनरेट करावी लागतात. कर विभाजनाचा तपशील या स्क्रीनवरील "इतर" या स्तंभात रक्कम प्रविष्ट करावी.

7. निवासी आणि अनिवासी कर कपात प्राप्त करणार्‍यासाठी एकाच चलानाचा वापर करता येतो का?

नाही. निवासी आणि अनिवासी कर कपात प्राप्त करणार्‍यांसाठी स्वतंत्र चलानांचा वापर करणे आवश्यक आहे.

8. TAN लॉगिनद्वारे नियमित निर्धारण कर (400) साठी मागणीचे पेमेंट कसे करता येईल?

नियमित निर्धारण कर (400) अंतर्गत मागणीचे पेमेंट TAN लॉगिनद्वारे ई-फाईल → ई-कर भरणा → लागू असलेला आयकर अधिनियम निवडा → नवीन पेमेंट → प्रलंबित मागणीचा भरणा करा या क्रमाने जाऊन करता येतो. TDS प्रलंबित मागणीच्या पेमेंटसाठी मागणी संदर्भ क्रमांक (DRN) हा तपशील प्रविष्ट करणे ऐच्छिक आहे.

9. कलम 393(1) अंतर्गत कर कपातीच्या चलान आणि विवरणपत्राच्या (फॉर्म 141) मागणीचे पेमेंट कसे करता येईल?

कर कपातीच्या चलान आणि विवरणपत्राच्या (फॉर्म 141) मागणीचे पेमेंट करण्यासाठी पॅनद्वारे लॉगिन करून ई-फाईल → ई-कर भरणा → आयकर अधिनियम, 2025 निवडा → नवीन भरणा → फॉर्म 141 (कलम 393(1) अंतर्गत कर कपातीच्या चलान आणि विवरणपत्राच्या मागणीचे पेमेंट) या मार्गाने जा.
फॉर्म 141 टाइलसमोरील "कार्यवाही"वर क्लिक केल्यानंतर, वापरकर्त्याने पुढील तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे:
• मागणी ज्या व्यवहारासंदर्भात करण्यात आली आहे त्याचे स्वरूप
• कर वर्ष
• पोचपावती क्रमांक
• मागणी संदर्भ क्रमांक (उपलब्ध असल्यास)
जर पोचपावती क्रमांक उपलब्ध नसेल (उदाहरणार्थ, मागणी इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आली असल्यास), तर वापरकर्त्याने "ACKNOTAVBL" प्रविष्ट करावे. सर्व तपशील भरून "पुढे सुरू ठेवा" वर क्लिक केल्यानंतर, वापरकर्त्याला "कर विभाजन तपशील जोडा" या स्क्रीनवर नेले जाईल.

10. 'कंपनी' कर कपात प्राप्त करणारे आणि 'कंपनीव्यतिरिक्त' कर कपात प्राप्त करणारे यांच्यासाठी एकच चलान वापरता येईल का?

नाही. 'कंपनी' कर कपात प्राप्त करणारे आणि 'कंपनीव्यतिरिक्त' कर कपात प्राप्त करणारे यांच्यासाठी स्वतंत्र चलान वापरणे आवश्यक आहे.

Detailed guides and documentation