अधिकृत स्वाक्षरीकर्ता जोडा - उपयोगकर्ता पुस्तिका

1. अवलोकन

ही सेवा ई-फाइलिंग पोर्टलवरील सर्व नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. जे वापरकर्ते देशाबाहेर असल्यामुळे, अनिवासी असल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे त्यांचे ITR, फॉर्म्स किंवा सेवा विनंत्या यांची पडताळणी करण्यास असमर्थ आहेत—अशा वापरकर्त्यांना त्यांच्या वतीने पडताळणी पूर्ण करण्यासाठी इतर कोणत्याही व्यक्तीला अधिकृत करण्याची सुविधा या सेवेद्वारे प्रदान केली जाते. ही सेवा वापरकर्त्यांना प्रतिनिधी निर्धारिती म्हणून नोंदणी करण्याची आणि दुसऱ्या व्यक्तीच्या वतीने काम करण्याची सुविधा देखील देते.

2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्व-अटी

  • वैध वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड

  • पॅन आधार क्रमांकासह लिंक केलेले आहे

3. प्रक्रिया/क्रमवार मार्गदर्शन

3.1 दुसऱ्या व्यक्तीच्या वतीने कार्य करण्यासाठी नोंदणी करा


स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा.

Data responsive

स्टेप 2: वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करा.

Data responsive

 

स्टेप 3: अधिकृत भागीदार वर जा आणि स्वतःच्या वतीने कार्य करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला अधिकृत करा वर क्लिक करा

Data responsive

 

स्टेप 4: चला सुरू करूया वर क्लिक करा

Data responsive

 

स्टेप 5: + अधिकृत स्वाक्षरीकर्ता जोडा वर क्लिक करा

Data responsive

 

स्टेप 6: अधिकृत स्वाक्षरीकर्ता जोडण्याचे कारण निवडा, अधिकृत स्वाक्षरीकर्त्याचा पॅन प्रविष्ट करा आणि ज्यासाठी अधिकृत करत आहात तो कालावधी (सुरुवातीची तारीख -ते- शेवटची तारीख) किंवा कार्य निवडा.

Data responsive

 

टीप:

खालील कार्यांसाठी अधिकृत स्वाक्षरीकर्ता जोडला जाऊ शकतो:

  1. उत्पन्नाचे विवरणपत्र सादर करणे आणि पडताळणी करणे
  2. उत्पन्नाच्या विवरणपत्राची पडताळणी
  3. फॉर्म सादर करणे
  4. सेवा विनंती सादर करणे

स्टेप 7: आता विनंतीची पडताळणी करण्यासाठी ई-फाइलिंगसाठी नोंदणीकृत असलेल्या मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडीवर प्राप्त झालेला 6-अंकी ओटीपी प्रविष्ट करा.

Data responsive

 

स्टेप 8: विनंती यशस्वीरित्या सबमिट करण्यात आली आहे, आता अधिकृत स्वाक्षरीकर्ता 7 दिवसांच्या आत ही विनंती स्वीकारेल. आयकर विभागाकडून 7 दिवसांच्या आत यावर प्रक्रिया केली जाईल.

विनंती पाहण्यासाठी विनंती पहा वर क्लिक करा.

Data responsive

 

3.2 अधिकृत स्वाक्षरीकर्त्याद्वारे विनंतीचा स्वीकार:

स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा.

Data responsive

 

स्टेप 2: वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करा.

Data responsive

 

स्टेप 3: प्रलंबित कारवाई वर जा आणि कार्यसूची वर क्लिक करा.

Data responsive

 

स्टेप 4: कार्यसूची उघडेल, जिथे तुम्हाला निर्धारितीद्वारे अधिकृत स्वाक्षरीकर्ता जोडण्यासाठी सादर केलेली विनंती दिसेल. विनंती स्वीकारण्यासाठी स्वीकारा वर क्लिक करा.

Data responsive

 

स्टेप 5: आता, 'फाइल जोडा' वर क्लिक करून मुखत्यारपत्र जोडा आणि 'पडताळणी सुरू ठेवा' वर क्लिक करा

Data responsive

टीप:

1) फाइल जास्तीत जास्त 5 MB ची असू शकते.

2) फाइल्स केवळ PDF स्वरूपात अपलोड केल्या जाऊ शकतात.

 

स्टेप 6: आता, खालील पडताळणी पद्धतींद्वारे विनंतीची पडताळणी करा:

Data responsiveData responsive

स्टेप 7: 'आधार तपशीलांची पडताळणी करा' वर क्लिक करा, 'आधार ओटीपी जनरेट करा' हा पर्याय निवडा आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा.

Data responsiveData responsive

Step 8: यशस्वी ई-पडताळणीनंतर, एक पुष्टीकरण संदेश दिसेल. आणि फॉर्म सबमिट करण्यासाठी पुढे जाण्याकरिता 'होय' वर क्लिक करा.

Data responsive

पडताळणीनंतर आयकर विभाग विनंतीवर प्रक्रिया करेल आणि प्रमाणीकरण प्रभावी होण्यासाठी 24 ते 72 तास लागतील.

संबंधित विषय

शब्दकोश

संक्षेप/संक्षिप्त रूप

वर्णन/पूर्ण रूप

AO

मूल्यांकन अधिकारी

AY

निर्धारण वर्ष

AOP

व्यक्तींची संघटना

BOI

व्यक्तींची संस्था

CA

सनदी लेखापाल

CPC

केंद्रीकृत प्रक्रिया केंद्र

ERI

ई-विवरणपत्र मध्यस्थ

LA

स्थानिक प्राधिकरण

TDS

स्त्रोतावर करकपात

EXTA

बाहेरील संस्था

ITDREIN

आयकर विभाग रिपोर्टिंग संस्थेचा ओळख क्रमांक

HUF

हिंदु अविभाजित कुटुंब

EVC

इलेक्ट्रॉनिक पडताळणी कोड

DSC

डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र

ITD

आयकर विभाग

ITR

आयकर विवरणपत्र