सांवतार्या फॉर्म भरण्यासाठी विलंब माफीची विनंती _ वापरकर्ता मार्गदर्शक
1. अवलोकन
काहीवेळा अपरिहार्य कारणांमुळे आपण निर्धारित वेळेत आयकर वैधानिक फॉर्म फाईल करू शकत नाही. अशा परिस्थितीत, त्या कालावधीसाठी सिस्टिम वैधानिक फॉर्म फाईल करता येत नाहीत.
मात्र, यासाठी आयकर विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला त्याच्या अपरिहार्य परिस्थितीमुळे आयकराचे वैधानिक फॉर्म विहित मुदतीत सादर करता आले नाहीत, ती व्यक्ती सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीने वैधानिक फॉर्म फाईल करू शकते.
देय तारखेपूर्वी फॉर्म फाईल करू न शकलेल्या करदात्यांना आयकर ई-फायलिंग पोर्टलवरील विलंबासाठी माफीची विनंती ही सुविधा वापरता येते.
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठीच्या पूर्व-अटी
- ई-फायलिंग पोर्टलवर वैध वापरकर्ता नाव आणि पासवर्डसह नोंदणीकृत वापरकर्ता असावे.
- करदात्याने विहित मुदतीत वैधानिक फॉर्म दाखल केलेले नसावेत.
3. सुविधेविषयी माहिती
3.1 उद्देश
3.2 याचा वापर कोण करू शकतो/शकते?
देय तारखेपूर्वी फॉर्म फाईल करू न शकलेला करदाता माफीची विनंती या सुविधेचा वापर करू शकतो.
4. फॉर्म फाईल करण्यासाठी विलंब माफीची विनंती कशी सादर करावी?
स्टेप 1: तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करा.
स्टेप 2: तुमच्या डॅशबोर्डवरील 'सेवा'>'विलंब माफीची विनंती' यावर क्लिक करा.
स्टेप 3: विलंब माफीची विनंती पेजवर 'वैधानिक फॉर्मसाठी अर्ज' निवडा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.
स्टेप 4: विनंती करण्यासाठी '+ विलंब माफीची विनंती तयार करा' यावर क्लिक करा.
स्टेप 5: 'नवीन फायलिंग सुरू करा' यावर क्लिक करा.
स्टेप 6: आवश्यक माहिती प्रविष्ट करा (निवासी स्थिती, फाईल न केलेल्या फॉर्मशी संबंधित तपशील, फॉर्म फाईल करण्यास झालेल्या विलंबाचे कारण लिहा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा). त्यानंतर 'ई-पडताळणीसाठी पुढे जा' वर क्लिक करा.
स्टेप 7: पडताळणीसाठी योग्य पद्धत निवडा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.
स्टेप 8: पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुमची विनंती सबमिट केली जाईल आणि व्यवहार आयडी जनरेट होईल. तसेच, नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर पुष्टीकरणाचा संदेशही प्राप्त होईल.
'विलंब माफीची विनंती पहा' यावर क्लिक करून तुम्ही माफीच्या विनंतीचा तपशील पाहू शकता.
स्टेप 9: येथे तुम्ही केलेल्या 'विलंब माफीच्या विनंत्या' दिसतील. विलंब माफीच्या विनंतीचा तपशील पाहण्यासाठी 'तपशील पहा' वर क्लिक करा.
कृपया चेकबॉक्सवर क्लिक करा आणि 'सेव्ह करा' वर क्लिक करा.
स्टेप 10: येथे विलंब माफीची विनंतीचा तपशील दिसेल. तसेच, 'मंजुरीपत्र डाउनलोड करा' वर क्लिक करून तुम्ही मंजुरीपत्र डाउनलोड करू शकता.
4. संबंधित विषय