परतावा पुन्हा जारी करणे उपयोगकर्ता पुस्तिका

1. अवलोकन

"परतावा पुन्हा जारी करण्याची विनंती" ही सुविधा ई-फायलिंग पोर्टलवरील नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. जारी केलेला परतावा अयशस्वी झाल्यास, या सुविधेच्या माध्यमातून तुम्ही परतावा पुन्हा जारी करण्यासाठी विनंती करू शकता.

2. या सेवेचा लाभ घेण्यासाठीच्या पूर्वअटी

  1. ई-फायलिंग पोर्टलवर वैध वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड असणारा नोंदणीकृत वापरकर्ता
  2. आयकर विवरणपत्र दाखल केलेले असावे आणि परतावा जारी करण्यात अयशस्वी झालेला असावा.
  3. ई-फायलिंग पोर्टलवर प्रमाणित बँक खाते असावे.
  4. खालीलपैकी कोणत्याही एका पडताळणी पद्धतीद्वारे पडताळणी करता येणे:

           •    आधारशी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक. 
           •    वैध आणि ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत DSC.
           •    बँक खाते / डिमॅट खाते / नेट बँकिंगद्वारे EVC.

3. क्रमवार मार्गदर्शन

परतावा पुन्हा जारी करण्याची विनंती

स्टेप 1: तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करा.

Data responsive

स्टेप 2: तुमच्या डॅशबोर्डवरील सेवा यावर जा आणि परतावा पुन्हा जारी करा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 3: परतावा पुन्हा जारी करण्यासाठी नवीन विनंती तयार करण्यासाठी "+परतावा पुन्हा जारी करण्याची विनंती तयार करा" यावर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 4: "परतावा पुन्हा जारी करण्याची विनंती तयार करा" पेजवर, ज्या नोंदीसाठी तुम्हाला विनंती सादर करायची आहे ती निवडा आणि "पुढे सुरू ठेवा" वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 5: "बँक खाते निवडा" पेजवर, ज्या बँक खात्यात तुम्हाला परतावा प्राप्त करायचा आहे ते खाते निवडा आणि "पडताळणीसाठी जा" वर क्लिक करा.

Data responsive

टीप: येथे केवळ प्रमाणित बँक खात्यांचा तपशील दिसेल. तुम्हाला प्रमाणित खात्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही बँक खात्यात परतावा हवा असल्यास, वरील स्क्रीनमध्ये हायलाईट करून दाखवलेल्या "बँक खाते जोडा" या लिंकवर क्लिक करा किंवा ई-फायलिंग पोर्टलवरील "बँक खाते जोडा" या सुविधेचा वापर करा.

स्टेप 6: बँक खाते निवडल्यानंतर, 'ई-पडताळणी' पेजवर पडताळणीसाठी तुमचा पसंतीचा पर्याय निवडा. त्यानंतर 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.

Data responsive

टीप: अधिक माहितीसाठी ई-पडताळणी कशी करावी ही वापरकर्ता पुस्तिका पहा.

ई-पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, व्यवहार आयडीसह यशस्वी झाल्याचा संदेश दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी कृपया व्यवहार आयडीची नोंद करून ठेवा. तसेच, ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या तुमच्या ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर पुष्टीकरणाचा संदेशही प्राप्त होईल.

Data responsive

टीप: तुम्हाला परतावा पुन्हा जारी करण्याची विनंती पाहायची असल्यास, 'परतावा पुन्हा जारी करण्याची विनंती पहा' यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला 'परतावा पुन्हा जारी करण्याची विनंती पहा' या पेजवर नेले जाईल, तिथे तुम्ही सबमिट केलेल्या विनंत्यांची स्थिती पाहू शकता.

4. संबंधित विषय