प्रिय करदाता,
आमच्या नोंदींनुसार, निर्धारण वर्ष 2024-25 करिता, फॉर्म 10-IEA आपल्यासाठी लागू असलेल्या देय तारीखेनंतर फाइल करण्यात आला आहे. त्यामुळे, आयकर कायदा ,1961 च्या तरतुदींनुसार हे एक वैध सबमिशन नाही.
आपण फॉर्म 10-IEA फाइल करणार असल्यास, कृपया पुढील निर्धारण वर्षांमध्ये लागू असलेल्या देय तारखीच्या आत तो नव्याने फाइल करत असल्याची खात्री करा.
आयकर कायद्याच्या कलम 115BAC अनुसार, फॉर्म 10-IEA फाइल करण्याची देय तारीख ही कलम 139(1) अंतर्गत नमूद केलेल्या विवरणपत्र फाइल करण्याच्या देय तारखेरोजीची किंवा त्यापूर्वीची आहे.
आपल्या प्रकरणामध्ये लागू होणाऱ्या तरतुदींची पडताळणी करण्यासाठी, आपण आयकर कायदा ,1961 ची संबंधित कलमे आणि नियमांचा संदर्भ घेऊ शकता.
आधीच पालन केले असल्यास, कृपया दुर्लक्ष करा.
आपले विनम्र,
आयकर विभाग (CPC),
बंगलोर"