1. फॉर्म 29B म्हणजे काय?
फॉर्म 29B हा कलम 115JB अंतर्गत कंपनीच्या लेखापुस्तकी नफ्याची गणना करण्यासाठीचा अहवाल आहे. कलम 11JB लागू असलेल्या कंपनीसाठी हा अहवाल सीए यांनी सादर करणे आवश्यक असते. या अहवालामुळे निर्धारितीला लेखापुस्तकी नफ्याची अचूक गणना सुनिश्चित करता येते आणि आयकर अधिनियमानुसार गणना केलेल्या कराच्या आधारे उपलब्ध होणार्या MAT क्रेडिटचा लाभ घेण्यास मदत होते.
2. फॉर्म 29B फाईल करणे अनिवार्य आहे का?
ज्या कंपनीचे उत्पन्न लेखापुस्तकी नफ्याच्या 15% पेक्षा कमी आहे (निर्धारण वर्ष 2020-21 पासून लागू), त्या कंपनीने सनदी लेखापालाकडून फॉर्म 29B मधील अहवाल प्राप्त करणे आवश्यक आहे. हा अहवाल कलम 139(1) अंतर्गत उत्पन्नाचे विवरणपत्र फाईल करण्याच्या मुदतीच्या एक महिना आधी किंवा कलम 142(1)(i) अंतर्गत दिलेल्या नोटिशीच्या उत्तरात सादर करण्यात येणाऱ्या आयकर विवरणपत्रासोबत सबमिट करावा.
3. फॉर्म 29B भरण्याची प्रक्रिया काय आहे?
हा फॉर्म करदात्याने (कंपनीने) नियुक्त केलेल्या सीएने भरणे आवश्यक आहे. नियुक्त केलेल्या सीएने फॉर्म भरून अपलोड केल्यानंतर, तो यशस्वीरित्या सादर होण्यासाठी निर्धारितीने (कार्यसूची मधून) तो स्वीकारून त्याची ई-पडताळणी करणे आवश्यक आहे.
4. माझ्या सीएने फॉर्म 29B पूर्ण भरून सबमिट केला आहे, हे मला कसे कळेल?
ई-फायलिंग पोर्टलवरील तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर तुम्हाला पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल. तसेच, कार्यसूची मधील (तुमच्या कृतीसाठी) विभागात तुम्ही त्याची स्थिती पाहू शकता. सीएने फॉर्म 29B अपलोड केल्यास, अपलोड केले आहे – निर्धारितीच्या स्वीकृतीच्या प्रतीक्षेत असे दर्शविले जाईल.
5. फॉर्म 29B भरण्याची माझी विनंती माझ्या सीएने नाकारली आहे, हे मला कसे कळेल?
तुम्ही नियुक्त केलेल्या सीएने फॉर्म 29B भरण्याची विनंती नाकारल्यास, ई-फायलिंग पोर्टलवरील तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर तुम्हाला त्याबाबतचा संदेश प्राप्त होईल.
6. माझ्या सीएने फॉर्म 29B भरण्याची माझी विनंती स्वीकारली आहे, हे मला कसे कळेल?
तुम्ही नियुक्त केलेल्या सीएने विनंती स्वीकारल्यानंतर, कार्यसूची मधील (तुमच्या कृतीसाठी) विभागात पुढीलपैकी एक स्थिती दिसेल:
- सीएने अपलोड केले आहे – स्वीकृतीच्या प्रतीक्षेत: म्हणजे तुम्ही नियुक्त केलेल्या सीएने अद्याप तुमची विनंती स्वीकारलेली नाही. किंवा
- अपलोड केले आहे – निर्धारितीच्या स्वीकृतीच्या प्रतीक्षेत: म्हणजे सीएने फॉर्म 29B आधीच अपलोड करून सबमिट केला आहे.