Do not have an account?
Already have an account?

1. ITNS 280N म्हणजे काय आहे?

ITNS 280N हा आयकर अधिनियम, 2025 अंतर्गत विविध प्रकारचा आयकर भरणा करण्यासाठी उपलब्ध असलेला एक चलान फॉर्म आहे. याचा वापर सामान्यतः स्वयं निर्धारण कर, अग्रिम कर, नियमित निर्धारणावरील कर, दुय्यम समायोजन कर, संवृद्धी कर, पॅन आधारशी लिंक करण्यात विलंब झाल्याचे शुल्क, कलम 429 अंतर्गत विलंब शुल्क (फॉर्म 113 आणि फॉर्म 114), अपील शुल्क आणि चक्रवाढ शुल्क भरण्यासाठी केला जातो.

2. ITNS 280N अंतर्गत कोणते मुख्य आणि लघु शीर्ष समाविष्ट आहेत?

यात समाविष्ट असलेल्या मुख्य शीर्षांमध्ये निगम कर (0020) आणि आयकर (कंपन्यांव्यतिरिक्त) (0021) यांचा समावेश होतो. यात समाविष्ट असलेल्या लघु शीर्षांमध्ये स्वयं निर्धारण कर (300), अग्रिम कर (100), नियमित निर्धारणावरील कर (400), दुय्यम समायोजन कर (110), संवृद्धी कर (111), पॅन आधारशी लिंक करण्यात विलंब झाल्याचे शुल्क (500), कलम 429 अंतर्गत विलंब शुल्क (फॉर्म 113 आणि फॉर्म 114) (500), अपील शुल्क (500) आणि चक्रवाढ शुल्क (500) यांचा समावेश होतो.

3. आयकर भरणा करण्यासाठी मी ITNS 280N कोठे ॲक्सेस करू शकतो/शकते?

लॉगिन केल्यानंतर, ITNS 280N हे 'ई फाइल → ई कर भरणा → लागू आयकर अधिनियम निवडा → नवीन पेमेंट → आयकर/निगम कर टाइल किंवा नियमित निर्धारण कर (400) म्हणून मागणी पेमेंट टाइल' या मार्गाने ॲक्सेस केले जाऊ शकते. लॉगिन करण्यापूर्वी, ते 'डॅशबोर्ड → ई कर भरणा (क्विक लिंक) → लागू आयकर अधिनियम निवडा → पॅन आणि मोबाइल नंबर इनपुट स्क्रीन → ओटीपी पडताळणी → आयकर/निगम कर टाइल किंवा नियमित निर्धारण कर (400) म्हणून मागणी पेमेंट टाइल' या मार्गाने ॲक्सेस केले जाऊ शकते.

4. लघु शीर्ष 500 अंतर्गत कोणते सर्व पेमेंट्स केले जाऊ शकतात?

लघु शीर्ष 500 अंतर्गत, पॅन आधारशी लिंक करण्यात विलंब झाल्याचे शुल्क, कलम 429 अंतर्गत विलंब शुल्क (फॉर्म 113 आणि फॉर्म 114), अपील शुल्क आणि चक्रवाढ शुल्क यांसाठी पेमेंट्स केले जाऊ शकतात.

5. लघु शीर्ष 500 अंतर्गत कोणतेही पेमेंट जमा करण्यासाठी, कर विभाजन तपशीलांमध्ये कोणते फील्ड वापरले जावे?

अपील शुल्क, कलम 429 अंतर्गत विलंब शुल्क, पॅन आधारशी लिंक करण्यात विलंब झाल्याचे शुल्क आणि चक्रवाढ शुल्क जमा करण्यासाठी, “पेमेंटचा प्रकार” अंतर्गत “इतर प्राप्ती (500)” हे लघु शीर्ष निवडणे आवश्यक आहे आणि 'कर विभाजन तपशील' स्क्रीनवरील “इतर” या फील्डमध्ये रक्कम प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

6. पॅन आधारशी लिंक करण्यासाठी पेमेंट करण्याकरिता पुढील मार्गाचे अनुसरण करा: ई फाइल → ई कर भरणा → लागू आयकर अधिनियम निवडा → आयकर अधिनियम, 2025 → नवीन पेमेंट → आयकर टाइल → पेमेंटचा प्रकार (लघु शीर्ष) → इतर प्राप्ती (500) → पेमेंटचा उप-प्रकार → पॅन आधारशी लिंक करण्यात विलंब झाल्याचे शुल्क.

पॅन आधारशी लिंक करण्यासाठी पेमेंट करण्याकरिता पुढील मार्गाचे अनुसरण करा: ई फाइल → ई कर भरणा → लागू आयकर अधिनियम निवडा → आयकर अधिनियम, 2025 → नवीन पेमेंट → आयकर टाइल → पेमेंटचा प्रकार (लघु शीर्ष) → इतर प्राप्ती (500) → पेमेंटचा उप-प्रकार → पॅन आधारशी लिंक करण्यात विलंब झाल्याचे शुल्क.

7. मी पेमेंट यशस्वीरित्या केले आहे. मला BSR कोड किंवा चलान अनुक्रमांक कुठून मिळू शकेल?

7 अंकी BSR कोड, पेमेंट करण्याची तारीख आणि चलान अनुक्रमांक हे 'ई कर भरणा → पेमेंट हिस्ट्री → कार्यवाही → तपशील पहा' अंतर्गत उपलब्ध असून ते ई फायलिंग पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर ॲक्सेस केले जाऊ शकतात.

8. एकाच चलानचा (ITNS 280N) वापर अनेक लघु शीर्षांअंतर्गत पेमेंट्स करण्यासाठी केला जाऊ शकतो का?

नाही. प्रत्येक लघु शीर्षांअंतर्गत केल्या जाणाऱ्या पेमेंटसाठी स्वतंत्र चलान वापरणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, स्वयं निर्धारण कर आणि अग्रिम कर भरणा करण्यासाठी स्वतंत्र चलान आवश्यक असतात.

9. मी पॅन लॉगिनद्वारे नियमित निर्धारण कर (400) म्हणून मागणी पेमेंट कसे करू शकेन?

नियमित निर्धारण कर (400) म्हणून मागणी पेमेंटची प्रक्रिया पॅन लॉगिनद्वारे मागणीच्या संदर्भ क्रमांकासह (DRN) किंवा त्याशिवाय केली जाऊ शकते. DRN शिवाय पेमेंट्स, लॉगिन करण्यापूर्वी आणि लॉगिन केल्यानंतर दोन्ही वेळी ई फाइल → ई कर भरणा → आयकर अधिनियम → नवीन पेमेंट → 'नियमित निर्धारण कर (400) म्हणून मागणी पेमेंट' या मार्गाने करता येतात. DRN सह पेमेंट्स करण्यासाठी, पॅन वापरुन लॉगिन करणे आवश्यक आहे, त्यानंतर त्याच मार्गाचे अनुसरण करून आणि DRN वापरुन पेमेंट प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

10. DRN सह आणि DRN शिवाय केल्या जाणाऱ्या पेमेंट प्रक्रियेत काही फरक आहे का?

होय. DRN वापरुन पेमेंट करताना, DRN हा पर्याय निवडल्यावर DRN संबंधित सर्व तपशील आपोआप मिळवले जातात आणि वापरकर्त्यास थेट पेमेंट पेजवर नेले जाते; हा पर्याय केवळ पॅनद्वारे लॉगिन केल्यानंतरच उपलब्ध असतो. DRN शिवाय पेमेंट करताना, वापरकर्त्याला स्क्रीनवर दर्शविल्या जाणाऱ्या हायपरलिंकवर क्लिक करून नेव्हिगेशन मार्गाचे (लॉगिन → मागणी टाइल → पुढे जाण्यासाठी लिंक) अनुसरण करणे आवश्यक असते आणि हा पर्याय लॉगिन करण्यापूर्वी आणि लॉगिन केल्यानंतर अशा दोन्ही पद्धतींमध्ये उपलब्ध असतो.

11. ई-फायलिंग पोर्टलवर DRN वापरून मी मागणी पेमेंट कसे करू शकेन?

लागू असणाऱ्या वर्षांसाठी पेमेंट स्क्रीनवर उपलब्ध असणारे DRN रेडिओ बटण निवडून DRN वापरून मागणी पेमेंट केले जाऊ शकते, त्यानंतर सिस्टम आपोआप DRN चे तपशील मिळवते आणि वापरकर्त्याला व्यवहार पूर्ण करण्यासाठी पेमेंट पेजवर पुनर्निर्देशित केले जाते.

12. माझ्याकडे DRN नाही. मी मागणी पेमेंट कसे करू?

जर DRN उपलब्ध नसेल, तरीही पेमेंट स्क्रीनवर दर्शविल्या जाणाऱ्या हायपरलिंकवर क्लिक करून आणि 'लॉगिन → मागणी टाइल → लिंक' या मार्गाचे अनुसरण करून मागणी पेमेंट केले जाऊ शकते, ज्यामुळे वापरकर्त्याला पेमेंटची प्रक्रिया पुढे चालू ठेवण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी योग्य पेजवर पुनर्निर्देशित केले जाते.