Do not have an account?
Already have an account?

1. फॉर्म 10-IEA कोणत्या निर्धारण वर्षापासून लागू आहे?

फॉर्म 10-IEA, अधिसूचना क्र. 43/2023 दिनांक 21 जून 2023 द्वारे अधिसूचित करण्यात आला असून, तो निर्धारण वर्ष 2024-25 पासून पुढे, म्हणजेच निर्धारण वर्ष 2024-25 आणि त्यानंतरच्या वर्षांसाठी लागू आहे.

2. ई-फाइलिंग पोर्टलवर फॉर्म 10-IEA कोण फाइल करू शकतो?

हा फॉर्म अशा व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF), व्यक्तींची संघटना (सहकारी संस्थेशिवाय), व्यक्तींचा समूह (BOI), आणि कलम 2(31)(vii) अंतर्गत येणारी कृत्रिम न्यायिक व्यक्ती (AJP) यांच्याद्वारे दाखल केला जाऊ शकतो, ज्यांना व्यापार किंवा व्यवसायातून उत्पन्न मिळते.

3. मला फॉर्म 10-IEA सबमिट करण्याची गरज का आहे?

जर तुम्हाला नवीन कर व्यवस्थेमधून बाहेर पडायचे असेल किंवा त्यात पुन्हा प्रवेश करायचा असेल आणि तुमचे उत्पन्न "व्यापार आणि व्यवसायचा नफा आणि लाभ" या शीर्षकाखाली येत असेल, तर तुम्हाला फॉर्म 10-IEA सबमिट करावा लागेल.

4. फॉर्म 10-IEA कोणकोणत्या पद्धतींनी सबमिट करता येतो?

फॉर्म 10-IEA फक्त ई-फाइलिंग पोर्टलवर ऑनलाइन सबमिट केला जाऊ शकतो.

5. फॉर्म 10-IEA ची ई-पडताळणी कशी करता येते?

करदाता आधार ओटीपी, EVC किंवा DSC चा वापर करून फॉर्मची ई-पडताळणी करू शकतो/शकते. अधिक माहितीसाठी तुम्ही 'ई-पडताळणी कशी करावी' या वापरकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घेऊ शकता. (वापरकर्ता पुस्तिकेची लिंक येथे दिली पाहिजे).

6. माझ्या वतीने फॉर्म 10-IEA फाइल करण्यासाठी मी अधिकृत प्रतिनिधी नियुक्त करू शकतो/शकते का?

होय, आपण आपल्या वतीने फॉर्म 10-IEA फाइल करण्यासाठी अधिकृत प्रतिनिधी जोडू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही 'अधिकृत प्रतिनिधी म्हणून प्राधिकृत करा / नोंदणी करा' या वापरकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घेऊ शकता. (वापरकर्ता पुस्तिकेची लिंक येथे दिली पाहिजे).

7. फॉर्म 10-IEA फाइल करण्यासाठी कालमर्यादा काय आहे?

फॉर्म 10-IEA हा आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 139(1) अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या आयकर विवरणपत्र फाइल करण्याच्या नियत तारखेला किंवा त्यापूर्वी फाइल करणे आवश्यक आहे. करदात्याने नियत तारखेनंतर फॉर्म फाइल केल्यास, तो अवैध मानला जाईल.

8. आयकर विवरणपत्र फाइल केल्यानंतर मी फॉर्म 10-IEA सबमिट करू शकतो/शकते का?

फॉर्म 10-IEA फाइल करण्याचा लाभ मिळवण्यासाठी, आयकर विवरणपत्र फाइल करण्यापूर्वी फॉर्म फाइल करण्याची शिफारस केली जाते. आयकर विवरणपत्रामध्ये पोचपावती क्रमांक आणि फाइल केलेला फॉर्म 10-IEA याची फाइल करण्याची तारीख देणे आवश्यक आहे.

9.फॉर्म 10-IEA सबमिट करताना पडताळणी टॅबमध्ये पदनाम आधीपासून भरलेले दिसत नाही. मी काय करावे?

कृपया "माझे प्रोफाइल" विभागातील "मुख्य व्यक्तीचा तपशील" अद्ययावत करा. त्यानंतर ई-फाइलिंग पोर्टलवर पुन्हा लॉगिन करून पुन्हा प्रयत्न करा.

10. माझे कोणतेही व्यावसायिक उत्पन्न नाही. फॉर्म 10-IEA फाइल करताना, जर मी "तुम्हाला या निर्धारण वर्षात 'व्यापार किंवा व्यावसायिक नफा आणि लाभ' या शीर्षकाखाली उत्पन्न आहे का?" या प्रश्नाचे उत्तर "नाही" निवडले, तर मला पुढे जाता येत नाही आहे. मी काय करावे?

जर तुमच्याकडे कोणताही व्यापार किंवा व्यावसायिक उत्पन्न नसेल आणि तुम्हाला ITR 1/ ITR 2 फाइल करणे आवश्यक असेल, तर आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 115BAC(1A) अंतर्गत नवीन कर व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी किंवा त्यात पुन्हा प्रवेश करण्यासाठी फॉर्म 10-IEA फाइल करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. अशा परिस्थितीत, आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 139(1) अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या देय तारखेला किंवा त्यापूर्वी संबंधित ITR फॉर्म (ITR 1/ ITR 2) फाइल करताना पर्यायाचा वापर केला जाऊ शकतो.

11. "आयकर विवरणपत्र फाइल करण्यासाठी लागू असलेली अंतिम मुदत" यासाठी मी कोणता पर्याय निवडावा?

तुम्हाला आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 139(1) अंतर्गत उत्पन्नाचे विवरणपत्र फाइल करण्यासाठी लागू होणारी देय तारीख निवडावी लागेल. तुम्ही स्क्रीनवर उपलब्ध असलेल्या 'मदत दस्तऐवज' याचा संदर्भ घेऊ शकता आणि फॉर्म 10-IEA फाइल करण्यासाठी लागू असलेला पर्याय निवडू शकता

12. नवीन कर व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी मला दरवर्षी फॉर्म 10-IEA फाइल करावा लागेल का?

जर तुम्ही (व्यापार/व्यावसायिक उत्पन्न असलेली व्यक्ती म्हणून) मागील निर्धारण वर्षात नवीन कर व्यवस्था नाकारून जुनी कर व्यवस्था निवडली असेल आणि तुम्हाला ITR मध्ये तीच जुनी कर व्यवस्था पुढेही कायम ठेवायची असेल, तर तुम्हाला दरवर्षी फॉर्म 10-IEA फाइल करण्याची आवश्यकता नाही. मात्र, व्यापार/व्यावसायिक उत्पन्न नसलेल्या व्यक्ती दरवर्षी थेट ITR मध्ये कर व्यवस्था बदलू शकतात.

13.फॉर्म 10-IEA माझ्यावर लागू होतो आणि आता मला माझ्या ITR मध्ये जुनी कर व्यवस्था निवडण्याचा पर्याय मागे घ्यायचा आहे. त्यासाठी काय प्रक्रिया आहे?

तुम्ही मागील निर्धारण वर्षात जुनी कर व्यवस्था निवडली असेल आणि आता तुम्हाला नवीन कर पुन्हा निवडायची असेल, तर चालू निर्धारण वर्षासाठी त्या अर्जामधील पर्याय मागे घेण्यासाठी तुम्हाला फॉर्म 10-IEA फाइल करणे आवश्यक आहे.

14. मी मागील निर्धारण वर्षात 'पुन्हा प्रवेश करा' हा पर्याय निवडून फॉर्म 10-IEA फाइल करून जुन्या कर व्यवस्थेतून बाहेर पडलो/पडले होतो/होते. मी पुन्हा फॉर्म 10-IEA मध्ये जुन्या कर व्यवस्थेचा पर्याय निवडू शकतो/शकते का?

जर तुम्ही एकदा जुनी कर व्यवस्था निवडल्यानंतर त्यातून बाहेर पडून पुन्हा नवीन कर व्यवस्थेमध्ये प्रवेश केला असेल, तर व्यापार किंवा व्यवसायिक उत्पन्न असणे बंद झाल्याशिवाय तुम्ही पुन्हा कधीही जुनी कर व्यवस्था निवडण्यास पात्र राहणार नाही.

15.मला फॉर्म 10-IEA मध्ये नवीन कर व्यवस्थेतून बाहेर पडायचे होते, पण मी आयकर विवरणपत्र फाइल करण्याच्या देय तारखेनंतर फॉर्म 10-IEA फाइल केला. मला जुन्या कर व्यवस्थेचा लाभ मिळेल का?

जर तुम्हाला नवीन कर व्यवस्थेतून बाहेर पडायचे असेल आणि तुम्ही देय तारखेपर्यंत फॉर्म दाखल करण्यात अयशस्वी ठरलात, तर तुम्ही तुमच्या ITR मध्ये जुन्या कर व्यवस्थेचा लाभ मिळवण्यास पात्र नसाल.

16. मी फॉर्म 10-IEA फाइल केला आहे आणि फॉर्मची स्थिती 'अवैध फॉर्म' अशी आहे. मी काय करावे?

आपण आयकर विवरणपत्राच्या देय तारखेनंतर फॉर्म 10-IEA फाइल केला असल्यास, फॉर्मची स्थिती अवैध फॉर्म अशी असेल. अशा परिस्थितीत, त्यानंतरच्या निर्धारण वर्षात फॉर्म नव्याने फाइल करता येईल.

17. फाइल केलेल्या फॉर्म 10-IEA ची स्थिती 'वैध फॉर्म' वरून 'अवैध फॉर्म' अशी बदलली आहे. मी काय करावे?

फॉर्म 10-IEA फाइल करताना योग्य देय तारीख निवडली नसल्यास, जी आपल्या आयकर विवरणपत्र फाइल करण्यासाठी लागू आहे आणि आपला फाइल केलेला फॉर्म 10-IEA हा ITR च्या प्रक्रियेसाठी स्वीकारला गेला नाही कारण हा फॉर्म ITR च्या देय तारखेनंतर फाइल गेला आहे. अशा परिस्थितीत, फॉर्मची स्थिती "अवैध फॉर्म" मध्ये बदलली जाईल. अशा परिस्थितीत, फॉर्म 10-IEA पुढील निर्धारण वर्षात नव्याने फाइल केला जाऊ शकतो.

18. फॉर्म 10-IEA सबमिट केल्यानंतर मी त्यात सुधारणा किंवा बदल करू शकतो/शकते का?

नाही, फॉर्म 10-IEA मध्ये सुधारणा करण्याची परवानगी नाही. तसेच, एकदा फाइल केलेला फॉर्म 10-IEA त्याच वर्षी मागे घेतला जाऊ शकत नाही.

19. फॉर्म 10-IEA फाइल केल्यानंतर त्याची स्थिती मी कशी तपासू शकतो/शकते?

तुम्ही आयकर ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करून फॉर्म 10-IEA च्या फाइलिंगची स्थिती तपासू शकता. फाइल केलेल्या फॉर्मचा तपशील 'ई-फाइल' टॅब ----> 'आयकर फॉर्म्स' ----> 'फाइल केलेले फॉर्म पहा'----> 'आयकर अधिनियम 1961 नुसार फॉर्म' अंतर्गत पाहिला जाऊ शकतो------> तिथे फॉर्म 10-IEA शोधा अणि तो वैध आहे की अवैध, याची स्थिती तपासा.

20. मी नंतरच्या काळात माझा उत्पन्नाचा स्त्रोत बदलून व्यापार/व्यवसाय असा केल्यास काय होईल? मला पुन्हा 10-IEA फॉर्म भरावा लागेल का?

होय, जर नंतर उत्पन्नाचा स्रोत व्यापार किंवा व्यवसायिक उत्पन्न असा बदलला आणि करदात्याला जुनी कर व्यवस्था निवडायची असेल, तर अधिनियमाच्या कलम 139(1) नुसार लागू असलेल्या नियत तारखेच्या आत फॉर्म 10-IEA फाइल करणे आवश्यक आहे.

21. मी दरवर्षी जुनी आणि नवीन कर व्यवस्था यांच्यामध्ये बदल करू शकतो/शकते का?

व्यापार किंवा व्यवसायिक उत्पन्नाव्यतिरिक्त इतर उत्पन्न असलेले करदाता अधिनियमाच्या कलम 139(1) नुसार नियत तारखेच्या आत आयकर विवरणपत्र फाइल करताना दरवर्षी जुनी किंवा नवीन कर व्यवस्था निवडू शकतात. व्यापार किंवा व्यवसायिक उत्पन्न असलेले करदाता कलम 139(1) अंतर्गत नियत तारखेच्या आत फॉर्म 10-IEA फाइल करून जुनी कर व्यवस्था निवडू शकतात. त्यानंतर, फॉर्म 10-IEA पुन्हा 'पुन्हा प्रवेश करणे' पर्यायासह फाइल करून ते केवळ एकदाच नवीन कर व्यवस्थेमध्ये परत जाऊ शकतात.