Do not have an account?
Already have an account?

1. माझ्या ITR ची स्थिती तपासणे का महत्त्वाचे आहे?

ITR स्थिती आपल्या फाइल केलेल्या ITR ची वर्तमान स्थिती/प्रकार दर्शवते. एकदा आपले ITR फाइल केले की, आपण आयकर विभागाने त्याचा स्वीकार आणि प्रक्रिया केली आहे की नाही ते तपासू शकता. काही विशिष्ट प्रकरणांमध्ये जेथे काही विसंगती आढळल्यास, आपल्याला ITD वरील संप्रेषणास प्रतिसाद देण्याची आवश्यकता असू शकेल. म्हणूनच, नियमितपणे आपली ITR स्थिती तपासा.


2. ITR स्थितींचे विविध प्रकार काय आहेत?

  • सबमिट केले आहे आणि ई-पडताळणी/पडताळणीसाठी प्रलंबित आहे: आपण आपले ITR फाइल करता पण त्याची ई-पडताळणी केलेली नाही किंवा आपल्याद्वारे विधिवत स्वाक्षरी केलेले ITR-V अद्याप CPC कडे प्राप्त झाले नाही तेव्हा ही स्थिती दर्शवली जाते.
  • यशस्वीपणे ई-पडताळणी/पडताळणी झाली आहे: ही स्थिती तेव्हा दर्शवली जाते जेव्हा आपण आपले विवरणपत्र फाइल केले आहे आणि विधिवत ई-पडताळणी/ पडताळणी केली आहे पण विवरणपत्र अद्याप प्रक्रिया केलेली नाही तेव्हा .
  • प्रक्रिया केलेले: जेव्हा आपल्या विवरणपत्र यशस्वीपणे प्रक्रिया केली जाते तेव्हा ही स्थिती दिसते.
  • सदोष: जेव्हा विभागाला फाइल केलेल्या विवरणपत्रामध्ये कायदानुसार आवश्यक असलेल्या काही महत्त्वपूर्ण माहितीच्या अभावी किंवा काही असमानतांमुळे दोष आढळतो तेव्हा ही स्थिती दर्शवली जाते. अशा परिस्थितीत, आपल्याला कलम 139(9) अंतर्गत सूचना प्राप्त होईल, ज्यामध्ये आपल्याला सूचना मिळाल्याच्या तारखेपासून नमूद केलेल्या कालमर्यादेमध्ये दोष सुधारण्यास सांगितले जाईल. जर आपण सदोष विवरणपत्र स्थितीला प्रतिसाद दिला नाही तर, आपल्या ITR ला अवैध मानले जाईल आणि प्रक्रियेसाठी घेतले जाणार नाही.
  • मूल्यांकन अधिकारी यांच्याकडे प्रकरणाचे हस्तांतरण केले: CPC ने आपला ITR आपल्या अधिकारक्षेत्र AO कडे हस्तांतरित केल्यावर ही स्थिती दिसते. आपले प्रकरण आपल्या AO कडे हस्तांतरित झाल्यास, आवश्यक तपशील प्रदान करण्यासाठी अधिकारी आपल्याशी संपर्क साधतील.

3. माझे अधिकृत प्रतिनिधी/ ERI त्याचे/तिचे लॉग इन वापरून माझी ITR स्थिती अ‍ॅक्सेस करू शकतात का?

होय, अधिकृत प्रतिनिधी / ERI द्वारे फाइल केलेल्या ITR साठी, ते आपल्याला आणि आपल्या अधिकृत प्रतिनिधी / ERI दोघांनाही दाखवले जाईल. आपण आपले स्वतःचे ITR (नोंदणीकृत करदाता म्हणून) भरल्यास, स्थिती आपल्याला फक्त आपल्या ई-फाइलिंग खात्यावर दाखवली जाईल.


4. ITR स्थिती सेवा फक्त नोंदणीकृत करदाता म्हणून माझी ITR स्थिती पाहण्यासाठी आहे का?

नाही. आपल्या ITR ची स्थिती पाहण्याव्यतिरिक्त, आपण आपल्या आयकर विवरणपत्राचे तपशील पाहू शकता:

  • आपली ITR-V याची पोचपावती, अपलोड केलेले JSON (ऑफलाइन उपयोगितेद्वारे), PDF स्वरुपात संपूर्ण ITR फॉर्म आणि सूचना आदेश पाहू शकता आणि डाउनलोड करू शकता.
  • पडताळणीासाठी प्रलंबित असलेले आपले आपले विवरणपत्र पहा आणि आपले विवरणपत्र ई-पडताळणी करण्यासाठी पुढील कार्यवाही करा.

5. मला माझी ITR स्थिती तपासण्यासाठी लॉग इन करणे आवश्यक आहे का?

नाही. ITR स्थिती लॉग इन पूर्व आणि लॉग इन नंतर देखील तपासता येईल. जर आपण आपली ITR स्थिती लॉग इन नंतर तपासली तर आपण विवरणपत्र / सूचना डाउनलोड करण्यासारखी अतिरिक्त माहिती पाहू शकता

6. ITR स्थिती सेवेसह, मला माझे आधीचे विवरणपत्र किंवा पूर्वी फाइल केलेले विवरणपत्र पाहता येईल का?

आपण आपले सर्व मागील फाइलिंग तसेच आपली सध्याची फाइलिंग पाहू शकता.

7. लॉग इन न करता माझ्या ITR ची स्थिती पाहण्यासाठी ई-फाइलिंग पोर्टलसह नोंदणीकृत असलेल्या माझ्या मोबाइल नंबरची आवश्यकता आहे का?

नाही, लॉग इन न करता आपल्या ITR ची स्थिती पाहण्यासाठी आपण कोणताही वैध मोबाइल नंबर वापरू शकता. तथापि, आपण लॉग इन न करता या सेवेचा वापर करत असल्यास आपल्याला वैध ITR पोचपावती क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

8. माझ्या जोडीदाराची ITR स्थिती मला पहायची आहे. मला हे करता येईल का?

आपण आपल्या जोडीदाराची ITR स्थिती पुढील प्रकारे पाहू शकता:

  • लॉग इन पूर्व: ई-फाइलिंग होमपेज वर, ITR स्थिती पहा वर क्लिक करा. आपल्याला त्याचा/तिचा ITR पोचपावती क्रमांक आणि वैध मोबाइल नंबर आवश्यक असेल.
  • लॉग इन नंतर:
    • आपण अधिकृत प्रतिनिधी/अधिकृत स्वाक्षरी करणारा म्हणून आपल्या जोडीदाराचे ITR फाइल केले असल्यास, आपण व आपला जोडीदार दोघेही ITR ची स्थिती पाहू शकतात.
    • आपल्या जोडीदाराने त्याचा/तिचा स्वतःचे ITR भरले असेल तर, तो/ती त्याच्या/तिच्या स्वतःच्या ई-फाइलिंग खात्यावर स्थिती पाहू शकतात.

9. माझी ITR स्थिती तपासताना प्रविष्ट करण्यासाठी मला माझा पोचपावती क्रमांक कोठे मिळेल?

  • आपले विवरणपत्र ई-फाइल करून झाल्यांनतर,आपण आपला ITR-V चा पोचपावती नंबर आपल्या नोंदणीकृत ईमेलवर तपासू शकता. लॉग इन केल्यानंतर आपला ITR-V ई-फाइलिंग पोर्टलवरून देखील डाउनलोड करता येईल: इ-फाइल > आयकर विवरणपत्र > फाइल केलेले विवरणपत्र पहा > पावती डाउनलोड करा पर्याय.
  • आपण ई-फाइलिंग पोर्टलवर फाइल केलेले फॉर्म पहा सेवा वापरून फाइल केलेल्या ITR साठी आपला पोचपावती क्रमांक (लॉग इन नंतर) देखील तपासू शकता.