आधार लिंक करणे > वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. कोणाला आधार आणि PAN लिंक करण्याची आवश्यकता आहे?
आयकर कायद्याच्या कलम 139AA मध्ये अशी तरतूद आहे की, ज्या प्रत्येक व्यक्तीला 1 जुलै 2017 रोजी स्थायी खाते क्रमांक (PAN) देण्यात आला आहे आणि जो आधार क्रमांक मिळवण्यास पात्र आहे, तो त्याचा आधार क्रमांक विहित नमुन्यात आणि पद्धतीने सूचित करेल. आपण 30 जून 2023 पर्यंत PAN आधारसोबत लिंक केलेले नसल्यास, आपला PAN निष्क्रिय होईल. तथापि, सूट असलेल्या श्रेणीत येणारे लोक PAN निष्क्रिय होण्याच्या परिणामांच्या अधीन राहणार नाहीत.
2. कोणासाठी आधार-PAN लिंक करणे अनिवार्य नाही?
आधार-PAN लिंक करण्याची आवश्यकता अशा कोणत्याही व्यक्तीला लागू होत नाही जी:
- आसाम, जम्मू आणि काश्मीर, आणि मेघालय या राज्यांमध्ये वास्तव्य करते;
- आयकर कायदा 1961 अनुसार अनिवासी;
- मागील वर्षात कोणत्याही वेळी वयाची ऐंशी वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे; किंवा
- भारताचा नागरिक नाही.
टीप:
- प्रदान केलेल्या सवलती या विषयावरील त्यानंतरच्या शासकीय सूचनांनुसार बदलांच्या अधीन आहेत
- अधिक तपशीलांसाठी महसूल विभाग अधिसूचना क्रमांक 37/2017 दिनांक 11 मे 2017" चा संदर्भ घ्या
- तथापि, वरीलपैकी कोणत्याही श्रेणीत येणार्या वापरकर्त्यांसाठी, PAN सह आधार लिंक करण्याची स्वेच्छेने इच्छा असल्यास, ठराविक रकमेचे शुल्क भरणे आवश्यक आहे.
3. आधार आणि PAN कसे लिंक करावे?
नोंदणीकृत असलेले आणि नोंदणीकृत नसलेले वापरकर्ते दोघेही लॉग इन न करताही ई-फाइलिंग पोर्टल, वर आधार आणि PAN लिंक करू शकतात. आधार आणि PAN लिंक करण्यासाठी आपण ई-फाइलिंग होम पेजवर आधार लिंक करा या क्विक लिंकचा वापर करू शकता.
4. मी आधार आणि PAN लिंक केले नाही तर काय होईल?
आपण 30 June2023 पर्यंत PAN आधारसह लिंक केले नसल्यास, आपले PAN निष्क्रिय होईल आणि PAN निष्क्रिय झाल्यामुळे खालील परिणामांना सामोरे जावे लागेल:
- कायद्यातील तरतुदींनुसार देय कराच्या कोणत्याही रकमेचा किंवा त्यातील काही भागाचा परतावा त्याला दिला जाणार नाही;
- नियम 114AAA च्या पोट-नियम (4) अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या तारखेपासून सुरू होऊन आणि ज्या तारखेला ते सक्रिय होते त्या तारखेपर्यंतच्या कालावधीसाठी त्याला अशा परताव्यावर व्याज देय होणार नाही;
- अशा व्यक्तीच्या बाबतीत, जेथे प्रकरण XVJJ-B अंतर्गत कर कपात करण्यायोग्य असतो, तेव्हा कलम 206AA च्या तरतुदीनुसार अशा करामध्ये जास्त दराने कपात करण्यात येईल;
- एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत, जेथे प्रकरण XVJJ-BB अंतर्गत स्त्रोतापासून कर वसूल करता येतो, असा कर कलम 206CC च्या तरतुदीनुसार जास्त दराने वसूल केला जाईल.
अधिक माहितीसाठी, कृपया दिनांक 28मार्च2023 याच्या 2023 च्या परिपत्रक क्र. 03 चा संदर्भ घ्या.
5. मी PAN सह माझा आधार लिंक करू शकत नाही, कारण आधार आणि PAN मध्ये माझे नाव/फोन नंबर/जन्मतारीख जुळत नाही. मी काय करायला हवे?
पॅन किंवा आधार डेटाबेसमध्ये आपले तपशील दुरुस्त करा जेणेकरून दोघांत जुळणारे तपशील असतील.
PAN मध्ये आपले नाव अपडेट करण्यासाठी, कृपया प्रोटीनशीhttps://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html वर किंवा UTIITSL शी https://www.pan.utiitsl.com/ वर संपर्क साधा.
आधार कार्डमध्ये आपले नाव अपडेट करण्यासाठी, कृपया UIDAI ला https://ssup.uidai.gov.in/web/guest/update वर वर संपर्क साधा.आपण UIDAI हेल्पडेस्कला (autsupport@uidai.net.in ) मेल देखील पाठवू शकता ज्यामध्ये विशेषत: आपल्या आधार क्रमांकासाठी डेटा एक्स्ट्रॅक्ट करण्याची विनंती करत आहे.
लिंक करण्याची विनंती तरीही अयशस्वी झाली, तर आपल्याला PAN सेवा प्रदात्यांच्या (प्रोटिन आणि UTIITSL) समर्पित केंद्रांवर बायोमेट्रिक आधारित प्रमाणीकरणाचा पर्याय वापरण्याचा सल्ला दिला जातो.आपण आपले PAN, आधार, शुल्क भरल्याच्या (रु..1000/) चलानची कॉपी सोबत न्यावी आणि केंद्रावर आवश्यक बायोमेट्रिक प्रमाणीकरण शुल्क भरल्यानंतर सुविधेचा लाभ घ्यावा.बायोमेट्रिक प्रमाणीकरणाकरिता अधिकृत सेवा प्रदात्यांच्या तपशीलासाठी, प्रोटीन/ UTIITSL च्या संबंधित वेबसाइटला भेट देता येऊ शकते.
6. माझा PAN निष्क्रिय झाला तर मी काय करावे?
निष्क्रिय PAN चे हे परिणाम 1 जुलै, 2023 पासून लागू होतील आणि PAN सक्रिय होईपर्यंत सुरू राहतील. आधार क्रमांकाला सूचित करून PAN सक्रीय करण्यासाठी एक हजार रुपये शुल्क लागू होत राहील.
अधिक माहितीसाठी, कृपया दिनांक 28मार्च2023 याच्या 2023 च्या परिपत्रक क्र. 03 चा संदर्भ घ्या.
अस्वीकरण:
हे वारंवार विचारले जाणारे प्रश्न केवळ माहिती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने जारी केले आहे. करदात्यांना त्यांच्या प्रकरणांसाठी लागू होणारी अचूक माहिती, व्याख्या, स्पष्टीकरण यासाठी संबंधित परिपत्रके, अधिसूचना, नियम आणि आयकर कायद्यातील तरतूद पाहण्याचा सल्ला दिला जातो.