Do not have an account?
Already have an account?

1. अवलोकन

खालील नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी (लॉग इन पूर्व आणि लॉग इन नंतर) ITR स्थिती सेवा उपलब्ध असते:

  • आपल्या PAN साठी ITR फाइल करणारे सर्व करदाते
  • अशा भूमिकेमध्ये त्यांनी फाइल केलेल्या ITR साठी अधिकृत स्वाक्षरीकर्ता, ERI आणि प्रतिनिधी निर्धारिती

या सेवेद्वारे वरील वापरकर्त्यांना फाइल केलेल्या ITR चे तपशील पाहता येतात:

  • ITR-V पोचपावती, अपलोड केलेले JSON (ऑफलाइन उपयोगितेमधून), PDF मध्ये पूर्ण ITR फॉर्म आणि सूचना आदेश पहा आणि डाउनलोड करा
  • पडताळणीसाठी प्रलंबित विवरणपत्र पहा

2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्वअट

लॉग इन पूर्व:

  • वैध पोचपावती नंबरसह ई-फाइलिंग पोर्टलवर फाइल केलेले किमान एक ITR
  • OTP साठी वैध मोबाइल नंबर

लॉग इन नंतर:

  • ई-फाइलिंग पोर्टलवर वैध वापरकर्ता ID आणि पासवर्ड असणारा नोंदणीकृत वापरकर्ता
  • ई-फाइलिंग पोर्टलवर फाइल केलेला किमान एक ITR

3. प्रक्रिया/ क्रमानुसार मार्गदर्शन

3.1 ITR स्थिती (लॉग इन पूर्व)

स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा.

Data responsive


स्टेप 2: आयकर विवरणपत्र (ITR) स्थिती वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 3: आयकर विवरणपत्र (ITR) स्थिती पेजवर, आपला पोचपावती क्रमांक आणि वैध मोबाइल नंबर प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 4: स्टेप 3 मध्ये दिलेल्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला 6-अंकी OTP प्रविष्ट करा आणि सबमिट करा वर क्लिक करा.

टीप:

  • OTP केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल.
  • योग्य OTP प्रविष्ट करण्यासाठी आपल्याकडे 3 प्रयत्न आहेत.
  • स्क्रीनवरील OTP एक्सपायरी काउंटडाउन टाइमर आपल्याला OTP कधी एक्स्पायर होईल हे सांगतो.
  • OTP पुन्हा पाठवा वर क्लिक केल्यानंतर, एक नवीन OTP जनरेट होईल व पाठवला जाईल.
Data responsive

यशस्वी प्रमाणीकरण झाल्यांनतर, आपल्याला ITR स्थिती दिसेल.

Data responsive

आपला PAN निष्क्रिय असल्यास, परतावा जारी केला जाऊ शकत नाही. कृपया कलम 234H अंतर्गत आवश्यक शुल्क भरल्यानंतर आपला PAN आधारशी लिंक करा.

Data responsive

3.2 ITR स्थिती (लॉग इन नंतर)

स्टेप 1: आपला वैध वापरकर्ता ID आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा.

Data responsive

वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी, PAN आधारशी लिंक केलेला नसल्यास, आपल्याला एक पॉप-अप संदेश दिसेल की, आपला PAN आपल्या आधारशी लिंक केलेला नसल्यामुळे तो निष्क्रिय झाला आहे.

PAN ला आधारशी लिंक करण्यासाठी, आता लिंक करा बटणावर क्लिक करा अन्यथा पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive

.स्टेप 2: ई-फाइल > आयकर विवरणपत्र > फाइल केलेले विवरणपत्र पहा या वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 3: फाइल केलेले विवरणपत्रे पहा पेजवर, आपण फाइल केलेले सर्व विवरणपत्रे पाहू शकता. आपण ITR-V पोचपावती, अपलोड केलेले JSON (ऑफलाइन उपयोगितेवरून), PDF मध्ये पूर्ण ITR फॉर्म आणि सूचना आदेश (उजवीकडील पर्यायांचा वापर करून) डाउनलोड करण्यास सक्षम असाल.

Data responsive

टीप:

आपला PAN निष्क्रिय असल्यास, आपल्याला एक पॉप-अप संदेश दिसेल की, आपला PAN निष्क्रिय असल्यामुळे परतावा जारी केला जाऊ शकत नाही. आपण आता लिंक करा बटणावर क्लिक करून आपला PAN लिंक करू शकता अन्यथा आपण पुढे सुरू ठेवा वर क्लिक करू शकता.

Data responsive


टीप:

  • विविध निकष (निर्धारण वर्ष किंवा फाइलिंगचे प्रकार) यावर आधारित आपण फाइल केलेले विवरणपत्र पाहण्यासाठी फिल्टर वर क्लिक करा.
  • एक्सेल फॉरमॅटमध्ये आपल्या विवरणपत्राचा डेटा एक्स्पोर्ट करण्यासाठी एक्सेलवर एक्सपोर्ट करा यावर क्लिक करा
Data responsive
  • विवरणपत्राचे कार्यचक्र आणि त्याच्याशी संबंधित कारवाई माहीती पहाण्यासाठी आपण तपशील पहा यावर क्लिक करा (उदा., ई-पडताळणीसाठी प्रलंबित परतावा).
Data responsive

4. संबंधित विषय