Do not have an account?
Already have an account?

1. अवलोकन


ई-निवारण हे ई-फाइलिंग पोर्टलवरील एक तक्रार नोंदवण्याचे मॉड्यूल आहे जे ई-फाइलिंग, CPC-ITR, निर्धारण अधिकारी आणि CPC-TDS यांसारख्या विविध विभागांबाबतच्या करदात्याच्या तक्रारींचे निराकरण करते.


2. तक्रार कोण नोंदवू शकते?


ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत किंवा नोंदणी नसलेले वापरकर्ते.


3. असे विभाग ज्यांच्याबाबत ई-निवारण यावर तक्रारी मांडता येतात


1. ई-फाइलिंग: आयकर विवरणपत्राच्या ई-फाइलिंग किंवा वैधानिक फॉर्म आणि ई-पडताळणी आणि ई-कार्यवाही इत्यादीसारख्या इतर मूल्यवर्धित सेवांशी संबंधित तक्रारी खालील श्रेणींमध्ये ई-फाइलिंग विभागात मांडता येतील:


ई-फाइलिंग विभागातील श्रेणी:

संदेश DCS याच्याशी संबंधित ई-PAN ITR फाइल करणे फॉर्म याच्याशी संबंधित
ITDREIN

त्वरित ई-PAN (आधारद्वारे त्वरित ई-PAN)

 

JSON उपयुक्तता याच्याशी संबंधित मोबाइल ॲप पासवर्ड
प्रोफाईल

दुरुस्ती याच्याशी संबंधित

 

नोंदणीकरण TAN याच्याशी संबंधित TIN 2.0
टॅक्सजीनी/चॅटबॉट सेवा

पडताळणी/ई-पडताळणी करता आली नाही

 

ई-फाइलिंग पोर्टल ॲक्सेस ई-कार्यवाही  

2. AO: निर्धारण अधिकारी हे नियुक्त केलेले आयकर अधिकारी आहेत जे त्यांच्या कार्यक्षेत्रामधील करदात्यांच्या निर्धारणाची हाताळणी करतात आणि मागणी, अपील, PAN याच्याशी संबंधित विशिष्ट प्रश्नांसाठी खालील श्रेणींमध्ये त्यांच्याशी संपर्क साधता येतो:


AO विभाग यामधील श्रेणी:

अपील निकालाचा आदेश प्राप्त झाला नाही TDS कपातकर्त्यानुसार डीफॉल्ट AO द्वारे दुरुस्तीची चुकीची मागणी AO द्वारे दुरुस्तीची चुकीची मागणी

संकिर्ण अर्ज प्रलंबित

AO कडे PAN याच्याशी संबंधित अर्ज PAN ची स्थिती AO कडे दुरुस्तीचे प्रकरण प्रलंबित परतावा प्राप्त झाला नाही

इतर

 

3. CPC-ITR: हा विभाग आयकर विवरणपत्राची प्रक्रिया हाताळतो. ITR-V, परतावा, आयकर प्रक्रिया संबंधित प्रक्रिया इत्यादींशी संबंधित तक्रारी CPC-ITR विभागामध्ये खालील श्रेणींमध्ये नोंदवल्या जातील:


CPC-ITR विभाग यामधील श्रेणी:

संदेश

मागणी ITR-V
प्रक्रिया चालू आहे

दुरूस्ती

परतावा

4. CPC-TDS: हा विभाग ई-TDS योजनेशी संबंधित आहे. TAN साठी TDS परतावा, 26QB/26QC/26QD/26QE, फॉर्म 26AS/ATS संबंधित, कर चुकवणे, TDS/TCS विवरणपत्र याच्याशी संबंधित समस्या आणि मालमत्तेच्या विक्रीवरील TDS संबंधित कोणत्याही तक्रारी या विभागात खालील श्रेणींमध्ये नोंदवल्या जातील:

CPC-TDS विभाग यामधील श्रेणी:

26QB/26QC/26QD/26QE याच्याशी संबंधित समस्या चलान/BIN याच्याशी संबंधित कर चुकवण्याशी संबंधित

TDS/TCS प्रमाणपत्र डाउनलोड करणे याच्याशी संबंधित समस्या

फॉर्म 13 / फॉर्म 15E / फॉर्म 15C आणि 15D फॉर्म 26A/27BA फॉर्म 26AS/ATS याच्याशी संबंधित KYC
TAN साठी TDS परतावा TDS/TCS विवरणपत्र याच्याशी संबंधित समस्या

RACES नोंदणी/लॉग इन याच्याशी संबंधित प्रश्न

इतर

4. तक्रार कशी नोंदवावी आणि सबमिट कशी करावी

4.1. आपण ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असल्यास:

स्टेप 1: ई-फाईलिंग पोर्टल वर जा आणि लॉग इन करा वर क्लिक करा.
 

Data responsive

स्टेप 2: लॉग इन पेजवर आपला वापरकर्ता ID आणि पासवर्ड प्रविष्ट करा.

Data responsive

स्टेप 3: आपल्या डॅशबोर्डवर, तक्रार मेनू > तक्रार सबमिट करा वर जा.

Data responsive

स्टेप 4: तक्रार पेजवर, संबंधित विभाग निवडा. किंवा, तक्रार नोंदवण्यासाठी शोध बॉक्समध्ये समस्या शोधा.

Data responsive

स्टेप 5: संबंधित विभाग निवडल्यानंतर ड्रॉपडाउन मेनूमधून तक्रारीची श्रेणी आणि उपश्रेणी निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 6: इतर माहिती प्रविष्ट करा. (निर्धारण वर्ष इ.) तक्रारीच्या श्रेणीनुसार, तक्रार वर्णन बॉक्समध्ये तक्रारीचे वर्णन (किमान 100 वर्णांमध्ये) लिहा आणि संबंधित दस्तऐवज अपलोड करा (अनिवार्य नाही) आणि तक्रार सबमिट करा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 7: आता, तक्रार सबमिट केली आहे. तक्रारीची स्थिती तपासण्यासाठी तक्रार पोचपावती क्रमांकाची नोंद ठेवा.

Data responsive

याशिवाय, कोणत्याही समस्यांसाठी, आपण आयकर तक्रार ईमेल ID webmanager@incometax.gov.in द्वारे संपर्क साधू शकता.


टीप: करदात्यांना तक्रार कार्यक्षमतेचा वापर करून लॉग इन नंतर ई-फाइलिंग पोर्टलवर तक्रार नोंदवण्याची शिफारस आयकर विभागाने केली आहे.

4.2. आपण ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत नसल्यास:


स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलवर जा, खाली स्क्रोल करा आणि आमच्याशी संपर्क साधा विभागाखाली तक्रार वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 2: "माझ्याकडे PAN/TAN नाही" निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 3: नाव, ईमेल ID आणि मोबाइल नंबर सारखी माहिती प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 4: वरील स्टेपमध्ये प्रविष्ट केलेला मोबाइल नंबर आणि ईमेल ID वर प्राप्त झालेला वन टाइम पासवर्ड (OTP) प्रविष्ट करा आणि सबमिट करा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 5: आता ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत वापरकर्त्याप्रमाणे तक्रार नोंदवा.

Data responsive

5. तक्रारीची स्थिती कशी तपासावी

तक्रारीची स्थिती लॉग इन करण्यापूर्वी आणि लॉग इन केल्यानंतरच्या मोडमध्ये तपासता येते.

लॉग इन पूर्व मोड

स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टल वर जा, खाली स्क्रोल करा आणि आमच्याशी संपर्क साधा विभागाच्या अंतर्गत तक्रार पहा वर क्लिक करा.
 

Data responsive

स्टेप 2: तक्रार नोंदवण्यासाठी वापरलेला तक्रार पोचपावती क्रमांक आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive

लॉग इन नंतर मोड

स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टल वर जा आणि लॉग इन करा वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 2: लॉग इन पेजवर आपला वापरकर्ता ID आणि पासवर्ड प्रविष्ट करा.

Data responsive

स्टेप 3: आपल्या डॅशबोर्डवर, तक्रार मेनू > तक्रार स्थिती पहा वर जा.

Data responsive



स्टेप 4: आपल्या तक्रारीची स्थिती तपासा. आपण लॉग इन तारीख, विभाग आणि स्थिती फिल्टर देखील वापरू शकता.

Data responsive