1. अवलोकन
आयकर परतावा म्हणजे अशी कर भरलेली रक्कम जी वास्तविक देय रकमेपेक्षा (TDS किंवा TCS किंवा अग्रीम कर किंवा स्व-निर्धारण कराद्वारे) जास्त असल्यास, आयकर विभागाने परत केलेली रक्कम होय. आयकर परतावा म्हणजे अशी कर भरलेली रक्कम जी वास्तविक देय रकमेपेक्षा (TDS किंवा TCS किंवा अग्रीम कर किंवा स्व-निर्धारण कराद्वारे) जास्त असल्यास, आयकर विभागाने परत केलेली रक्कम होय.
करदात्याने विवरणपत्राची ई-पडताळणी केल्यानंतरच कर विभागाकडून परताव्याची प्रक्रिया सुरू होते. सहसा, करदात्याच्या खात्यामध्ये परतावा जमा होण्यासाठी 4-5 आठवडे लागतात. तथापि, या कालावधीत परतावा न मिळाल्यास, करदात्याने ITR मधील विसंगतींबाबत माहिती तपासली पाहिजे; परताव्याबाबत आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही अधिसूचनांसाठी ईमेल तपासा. येथे तपशीलवार दिलेल्या प्रक्रियेनुसार करदाता ई-फाइलिंग पोर्टलवर परताव्याची स्थिती देखील तपासू शकतो.
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्वअट
- वैध वापरकर्ता ID आणि पासवर्ड
- PAN आधार क्रमांकासह लिंक केलेला आहे
- परताव्याचा दावा करण्यासाठी ITR फाइल केला जातो
3. प्रक्रिया/क्रमानुसार मार्गदर्शक
3.1 परताव्याची स्थिती
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा.
स्टेप 2: वापरकर्ता ID आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी, PAN आधारशी लिंक केलेला नसल्यास, आपल्याला एक पॉप-अप संदेश दिसेल की, आपला PAN आपल्या आधारशी लिंक केलेला नसल्यामुळे तो निष्क्रिय झाला आहे.
PAN ला आधारशी लिंक करण्यासाठी, आता लिंक करा बटणावर क्लिक करा अन्यथा पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 3: ई-फाइल टॅबवर जा > आयकर विवरणपत्रे > फाइल केलेले विवरणपत्रे पहा.
स्टेप 4: आता आपल्याला पाहिजे असलेल्या निर्धारण वर्षासाठी परताव्याची स्थिती तपासू शकता.
तपशील पहा वर क्लिक करा आणि येथे आपण फाइल केलेल्या ITR चे जीवनचक्र देखील तपासू शकता.
स्थिती 1: जेव्हा परतावा जारी केला जातो:
स्थिती 2: जेव्हा परतावा अंशतः समायोजित केला जातो:
स्थिती 3: जेव्हा पूर्ण परतावा समायोजित केला जातो:
स्थिी 4: परतावा अयशस्वी झाल्यावर:
टीप: आपला PAN निष्क्रिय असल्यास, आपला परतावा अयशस्वी होईल आणि आपल्याला आपला PAN आधारशी लिंक करण्यासाठी चेतावणी संदेश दिसेल.
परतावा अयशस्वी होण्याची इतर कारणे:
वरील कारणाच्या व्यतिरिक्त, आयकर विभागाकडून देण्यात आलेला परतावा खालील कारणांमुळे आपल्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकत नाही:
1. बँक खाते पूर्व-प्रमाणित नसल्यास. आता आपले बँक खाते पूर्व-प्रमाणित करणे अनिवार्य आहे.
2. बँक खात्यामध्ये नमूद केलेले नाव PAN कार्ड तपशीलांशी जुळत नाही.
3. अवैध IFSC कोडच्या बाबतीत.
4. आपण ITR मध्ये नमूद केलेले खाते बंद केले असेल.