1. मी दाखल करण्यासाठी लागू असलेल्या आयकर फॉर्मच्या श्रेणीमध्ये कशा प्रकारे प्रवेश करू शकतो/शकते?
ई-फाईल मेनूमधील आयकर फॉर्म पर्यायांच्या अंतर्गत, आपल्याला अल्प वर्णनांसह सर्व उपलब्ध आयकर फॉर्मच्या श्रेणीची यादी दर्शविली जाईल. सर्व श्रेणीं अंतर्गत उपलब्ध असलेल्या यादीतून आपल्या फाईलिंगसाठी सर्वात जास्त संबंधित फॉर्म निवडा.
2. माझ्यासाठी कोणते भिन्न ई-सत्यापन पर्याय आहेत?
खालील ई-सत्यापन पर्याय उपलब्ध आहेत. आपण आपल्यासाठी अधिक सोयीस्कर असलेला एक पर्याय निवडू शकता:
- आधार ओ.टी.पी.
- ई.व्ही.सी. (ई.व्ही.सी. आधीपासूनच उपलब्ध आहे किंवा ई.व्ही.सी. जनरेट केले जाईल)
- डी.एस.सी.
काही विशिष्ट फॉर्मसाठी, ई-सत्यापन केवळ डी.एस.सी. वापरुन केले जाऊ शकते.
3. अपलोड करण्यापूर्वी मी फॉर्ममध्ये ऑफलाइन बदल करू शकतो/शकते का?
होय, फॉर्म ऑफलाइन तयार केला जाऊ शकतो आणि उपलब्ध उपयोगिता वापरून ई-फाईलिंग पोर्टलवर अपलोड केला जाऊ शकतो. उपयोगिता ई-फाईलिंग पोर्टल वरूनच डाउनलोड करणे आवश्यक आहे.
4. माझ्या वतीने इतर कोणी, फॉर्म अपलोड करू शकतो/शकते का?
होय, विशिष्ट प्रकरणांमध्ये, करदाता त्याच्या किंवा तिच्या वतीने फॉर्म अपलोड करण्यासाठी दुसर्या व्यक्तीला निवडून अधिकृत करू शकतो. कोण प्रतिनिधित्व करू शकतो/शकते, त्या व्यक्तीबद्दल अधिक माहिती, प्रतिनिधी वापरकर्ता मॅन्युअल म्हणून अधिकृत/नोंदणीमध्ये मिळू शकते.