निर्धारण वर्ष 2026-27 साठी पगारदार व्यक्तींना लागू असलेली विवरणपत्रे आणि फॉर्म्स.
अस्वीकरण: या पेजवरील माहिती केवळ अवलोकन आणि सर्वसाधारण मार्गदर्शन प्रदान करण्याच्या उद्देशाने असून ती सर्वसमावेशक नाही.
|
|||||
|
खालीलपैकी कोणत्याही स्रोतातून मिळणारे एकूण उत्पन्न ₹ 50 लाखांपर्यंत आहे, अशा रहिवासी व्यक्तीला (सामान्य रहिवासी नसलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त) हे विवरणपत्र लागू आहे. |
|||||
|
|||||
|
टीप: खालील व्यक्तींना ITR-1 चा वापर करता येणार नाही: a) जे कंपनीमध्ये संचालक आहेत b) ज्यांना अल्प कालावधीचा भांडवली नफा झाला आहे c) ज्यांच्याकडे आयकर कायदा, 1961 च्या कलम 112A अंतर्गत ₹1,25,000 पेक्षा जास्त दीर्घकालीन भांडवली नफा आहे d) ज्यांनी मागील वर्षामध्ये कधीही कोणतेही सूचीबद्ध नसलेले इक्विटी शेअर्स धारण केले आहेत e) ज्यांची भारताबाहेर कोणतीही संपत्ती(कोणत्याही संस्थेमधील आर्थिक हितासह) आहे f) ज्यांना भारताबाहेरील कोणत्याही खात्यामध्ये स्वाक्षरी करण्याचा अधिकार आहे g) ज्यांना भारताबाहेरील कोणत्याही स्रोतातून उत्पन्न मिळते h) ज्यांच्या संदर्भात आयकर कायदा, 1961 च्या कलम 194N अंतर्गत कर कपात करण्यात आलेली आहे i) ज्यांच्या बाबतीत ESOP वर कर भरणे किंवा कपात करणे स्थगित करण्यात आले आहे j) ज्यांच्याकडे उत्पन्नाच्या कोणत्याही स्रोतांतर्गत मागील वर्षातील शिल्लक तोटा किंवा अग्रेनीत केलेला तोटा आहे k) ज्यांचे एकूण उत्पन्न ₹50 लाखांपेक्षा जास्त आहे (कलम 112A अंतर्गत ₹1,25,000 पर्यंतचा दीर्घकालीन भांडवली नफा वगळून) |
|||||
|
2. ITR-2 - वैयक्तिक (ITR-1 साठी पात्र नसलेले) आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) यांच्यासाठी लागू |
||
|
हे विवरणपत्र वैयक्तिक करदाते आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) यांच्यासाठी लागू आहे |
||
|
|
||
|
3. ITR-3- वैयक्तिक करदाते आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) यांच्यासाठी लागू |
||
|
हे विवरणपत्र वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंबासाठी (HUF) लागू आहे |
||
|
|
||
|
4. ITR-4 (SUGAM) – वैयक्तिक करदाते, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) आणि फर्म (LLP व्यतिरिक्त) यांच्यासाठी लागू |
|||||
|
हे विवरणपत्र अशा वैयक्तिक करदात्यास किंवा हिंदू अविभक्त कुटुंबास (HUF) लागू आहे, जे रहिवासी आहेत परंतु साधारणपणे रहिवासी नाहीत अशा व्यक्तींपेक्षा वेगळे आहेत, किंवा अशा फर्मसाठी (LLP व्यतिरिक्त) लागू आहे जी रहिवासी आहे आणि ज्यांच्या व्यापार किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाची आयकर कायदा, 1961 च्या कलम 44AD / 44ADA / 44AE अंतर्गत अनुमानित आधारावर गणना केली जाते आणि खालीलपैकी कोणत्याही स्रोतांमधून उत्पन्न मिळते:
|
|||||
|
|
|||||
|
टीप 1: खालील व्यक्तींना ITR-4 चा वापर करता येणार नाही:
टीप 2: ITR-4 (Sugam) अनिवार्य नाही. आयकर कायदा, 1961 च्या कलम 44AD, 44ADA किंवा 44AE अंतर्गत अनुमानित आधारावर व्यापार किंवा व्यवसायातून मिळालेला नफा व मिळकत जाहीर करण्यासाठी पात्र असलेला निर्धारिती, आपल्या इच्छेनुसार हे सुलभीकृत विवरणपत्र वापरू शकतो. |
|||||
लागू होणारे फॉर्म्स (आयकर कायदा, 1961 नुसार):
|
1. फॉर्म 12BB - कर कपातीसाठी कर्मचाऱ्याद्वारे करण्यात आलेल्या दाव्यांचा तपशील (आयकर कायदा, 1961 च्या कलम 192 अंतर्गत) |
|
|
प्रदाता |
फॉर्ममध्ये दिलेले तपशील |
|
कर्मचाऱ्याकडून त्याच्या नियोक्त्याला |
स्रोतावरील कर कपात (TDS) गणनेसाठी HRA, LTC, गृहकर्जावरील व्याज कपात, कर बचत दावे / पात्र देयके किंवा गुंतवणुकीवरील कपातींचे पुरावे किंवा तपशील |
|
2. फॉर्म 16 - वेतनाच्या स्रोतावरील कर कपातीचे प्रमाणपत्र (आयकर कायदा, 1961 च्या कलम 203 अंतर्गत) |
|
|
प्रदाता |
फॉर्ममध्ये दिलेले तपशील |
|
आर्थिक वर्षाच्या शेवटी नियोक्त्याकडून (नियोक्त्यांकडून) त्याच्या कर्मचाऱ्याला |
कर्मचार्यांचे उत्पन्न, कपात/सूट आणि कर देण्यायोग्य/परतावा करण्यायोग्य गणना करण्याच्या हेतूने स्त्रोतावर कपात केलेला कर |
|
3. फॉर्म 16A – वेतनाव्यतिरिक्त उत्पन्नावरील TDS साठी आयकर कायदा, 1961 च्या कलम 203 अंतर्गत प्रमाणपत्र |
|
|
प्रदाता |
फॉर्ममध्ये दिलेले तपशील |
|
वजावट करणाऱ्याकडून वजावट मिळवणार्यास |
फॉर्म 16A हे त्रैमासिक जारी केले जाणारे स्रोतावरील करकपातीचे (TDS) प्रमाणपत्र आहे, जे TDS ची रक्कम, पेमेंटचा प्रकार आणि आयकर विभागाकडे जमा केलेले TDS पेमेंट याची माहिती संकलित करते |
|
4. फॉर्म 67 - भारताबाहेरील देश किंवा निर्दिष्ट प्रदेशातील उत्पन्न आणि परकीय कर क्रेडिटचे विवरण |
|
|
सादरकर्ता |
फॉर्ममध्ये दिलेले तपशील |
|
आयकर कायदा, 1961 च्या कलम 139(1) अंतर्गत आयकर विवरणपत्र सादर करण्यासाठी निर्दिष्ट केलेल्या देय तारखेला किंवा त्यापूर्वी करदात्याद्वारे सादर करणे. |
भारताबाहेरील देश किंवा निर्दिष्ट प्रदेशातील उत्पन्न आणि दावा करण्यात आलेले परकीय कर क्रेडिट |
|
5. फॉर्म्स 26 AS |
AIS (वार्षिक माहिती विवरणपत्र) |
|
प्रदाता: आयकर विभाग (हे ई-फाइलिंग पोर्टलवर उपलब्ध आहे: लॉग इन > ई-फाइल > आयकर विवरणपत्र > फॉर्म 26AS पहा) |
प्रदाता: आयकर विभाग (आयकर ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर अॅक्सेस केले जाऊ शकते) ई-फाइलिंग पोर्टल > AIS वर लॉग इन करा |
|
फॉर्ममध्ये दिलेले तपशील स्रोतावर कपात / संकलित केलेला कर |
फॉर्ममध्ये दिलेले तपशील
इतर माहिती (जसे की प्रलंबित/पूर्ण झालेली कार्यवाही, GST माहिती, परदेशी सरकारकडून प्राप्त माहिती इत्यादी) |
|
6. फॉर्म 15G - निवासी करदात्याने (कंपनी किंवा फर्म नसलेल्या) विशिष्ट प्राप्तीवर कर कपात न करण्याचा दावा करणारा जाहीरनामा |
|
|
सादरकर्ता |
फॉर्ममध्ये दिलेले तपशील |
|
मूलभूत करमुक्त मर्यादेपेक्षा उत्पन्न कमी असल्यास, व्याज उत्पन्नावरील TDS कपात न करण्यासाठी 60 वर्षांखालील रहिवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) किंवा इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे (कंपनी / फर्म व्यतिरिक्त) बँकेस |
आर्थिक वर्षासाठीचे अंदाजित उत्पन्न |
|
7. फॉर्म 15H - कर कपात न करता काही विशिष्ट प्राप्तींसाठी दावा करणाऱ्या रहिवासी व्यक्तीद्वारे (ज्यांचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे) करावयाचे घोषणापत्र |
|
|
सादरकर्ता |
फॉर्ममध्ये दिलेले तपशील |
|
व्याजाच्या उत्पन्नावर TDS कपात न करण्यासाठी, 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या रहिवासी व्यक्तीकडून, बँकेला |
आर्थिक वर्षासाठीचे अंदाजित उत्पन्न |
|
8. फॉर्म 10E - वेतनाची थकबाकी किंवा आगाऊ वेतन अदा करण्यात आल्यास आयकर कायदा, 1961 च्या कलम 89(1) अंतर्गत सवलतीचा दावा करण्यासाठी उत्पन्नाचा तपशील सादर करण्यासाठीचा फॉर्म |
|
|
कलम 89(1) अंतर्गत ITR मध्ये सवलतीचा दावा करण्यासाठी वैयक्तिक करदात्याद्वारे सादर केले जाईल |
फॉर्ममध्ये दिलेले तपशील |
|
आयकर विभागातील कर्मचारी |
1.थकबाकी / अग्रिम पगार 2.उपदान 3.सेवा समाप्तीबद्दलची भरपाई 4.निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण |
निर्धारण वर्ष 2026-27 साठी टॅक्स स्लॅब्ज***
नवीन करव्यवस्था विरुद्ध जुनी करव्यवस्था:
वित्त कायदा 2023 द्वारे निर्धारण वर्ष 2024-25 पासून लागू होणाऱ्या आयकर कायद्याच्या कलम 115BAC मधील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, वैयक्तिक करदाते, HUF, AOP (सहकारी संस्थांव्यतिरिक्त), BOI आणि कृत्रिम न्यायालयीन व्यक्ती यांच्यासाठी नवीन कर व्यवस्था ही डिफॉल्ट कर प्रणाली करण्यात आली आहे. तथापि, पात्र करदात्यांना डिफॉल्ट कर व्यवस्थेमधून बाहेर पडण्याचा आणि जुन्या कर व्यवस्थेअंतर्गत कर आकारणीचा पर्याय निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. जुनी कर व्यवस्था म्हणजे नवीन कर व्यवस्था लागू होण्यापूर्वी अस्तित्वात असलेली आयकर गणना पद्धती आणि कर श्रेणी व्यवस्था होय. जुन्या कर प्रणालीमध्ये करदात्यांना विविध कर कपात आणि सूट यांचा दावा करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. तथापि, डिफॉल्ट कर व्यवस्थेमध्ये जुन्या कर व्यवस्थेच्या तुलनेत अत्यल्प कपातींसह कमी कर दर लागू असतात.
व्यापारेतर प्रकरण:
"व्यापारेतर प्रकरणांमध्ये", डिफॉल्ट कर व्यवस्था बदलण्याचा पर्याय दरवर्षी थेट ITR मध्ये वापरता येतो आणि असे ITR आयकर कायदा, 1961 च्या कलम 139(1) अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या देय तारखेला किंवा त्यापूर्वी फाइल करणे आवश्यक आहे.
व्यापारिक प्रकरण:
व्यापार आणि व्यवसायातून उत्पन्न मिळवणाऱ्या पात्र करदात्यांच्या बाबतीत, निर्धारितीला डिफॉल्ट कर व्यवस्थेमधून (नवीन कर व्यवस्था) बाहेर पडण्याचा पर्याय निवडायचा असल्यास, त्यांनी उत्पन्नाचे विवरणपत्र सादर करण्यासाठी आयकर कायदा, 1961 च्या कलम 139(1) अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या देय तारखेला किंवा त्यापूर्वी फॉर्म-10-IEA सादर करणे आवश्यक आहे. तसेच, असा पर्याय रद्द करण्यासाठी म्हणजेच डिफॉल्ट कर व्यवस्थेमध्ये (नवीन कर व्यवस्था) पुन्हा प्रवेश करण्यासाठीही उत्पन्नाचे विवरणपत्र सादर करण्यासाठी आयकर कायदा, 1961 च्या कलम 139(1) अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या देय तारखेला किंवा त्यापूर्वी फॉर्म क्र. 10-IEA सादर करणे आवश्यक असेल. तथापि, जुन्या कर व्यवस्थेचा पर्याय रद्द करून डिफॉल्ट कर व्यवस्थेमध्ये (नवीन कर व्यवस्था) पुन्हा प्रवेश करण्याचा पर्याय व्यापार आणि व्यवसायातून उत्पन्न मिळवणाऱ्या पात्र करदात्यांसाठी केवळ पुढील निर्धारण वर्षामध्ये आणि आयुष्यात केवळ एकदाच उपलब्ध असेल.
|
जुनी करव्यवस्था |
आयकर कायदा, 1961 च्या कलम 115BAC अंतर्गत नवीन करव्यवस्था |
||
|
आयकर स्लॅब |
आयकर दर |
आयकर स्लॅब |
आयकर दर |
|
₹ 2,50,000 पर्यंत |
शून्य
|
₹ 4,00,000 पर्यंत |
शून्य |
|
₹ 2,50,001 – |
₹ 2,50,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 5% |
₹ 4,00,001 – |
₹ 4,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 5% |
|
₹ 5,00,001 – |
₹ 5,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 20% |
₹ 8,00,001 – |
₹ 8,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 10% + ₹ 20,000 |
|
₹ 10,00,000 |
₹ 10,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर |
₹ 12,00,001 – ₹ 16,00,000 |
₹ 12,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 15% + ₹ 60,000 |
|
₹ 16,00,001 - ₹ 20,00,000 |
₹ 16,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 20% + ₹ 1,20,000 |
||
|
|
₹ 20,00,001 - ₹ 24,00,000 |
₹ 20,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 25% + ₹ 2,00,000 |
|
|
|
₹ 24,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर |
₹ 24,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 30% + ₹ 3,00,000 |
|
|
जुनी करव्यवस्था |
आयकर कायदा, 1961 च्या कलम 115BAC अंतर्गत नवीन करव्यवस्था |
||
|
आयकर स्लॅब |
आयकर दर
|
आयकर स्लॅब |
आयकर दर |
|
₹ 3,00,000 पर्यंत |
शून्य
|
₹ 4,00,000 पर्यंत |
शून्य |
|
₹ 3,00,001 – |
₹ 3,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 5% |
₹ 4,00,001 – |
₹ 4,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 5% |
|
₹ 5,00,001 – |
₹ 5,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 20% + ₹ 10,000 |
₹ 8,00,001 – |
₹ 8,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर |
|
पेक्षा जास्त उत्पन्नावर |
₹ 10,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 30% + ₹ 1,10,000 |
₹ 12,00,001 – |
₹ 12,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर |
|
|
₹ 16,00,001 – |
₹ 16,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर |
|
|
|
₹ 20,00,001 – |
₹ 20,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर |
|
|
|
पेक्षा जास्त उत्पन्नावर |
₹ 24,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर |
|
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||
लागू अधिभार दर:
|
उत्पन्न मर्यादा |
आयकराच्या रकमेवरील अधिभाराचा दर (नवीन करव्यवस्था) |
आयकराच्या रकमेवरील अधिभाराचा दर (जुनी करव्यवस्था) |
|
₹ 50 लाखांपर्यंत |
शून्य |
शून्य |
|
₹ 50 लाख ते ₹ 1 कोटी |
10% |
10% |
|
₹ 1 कोटी ते ₹ 2 कोटी |
15% |
15% |
|
₹ 2 कोटी ते ₹ 5 कोटी |
25% |
25% |
|
₹ 5 कोटींपेक्षा जास्त उत्पन्नावर |
25% |
37% |
*टीप: संबंधित प्रकरणानुसार, कलम 111A, 112, 112A अंतर्गत करपात्र उत्पन्न तसेच लाभांश उत्पन्नावर 25% आणि 37% चा वाढीव अधिभार आकारला जाणार नाही. त्यामुळे अशा उत्पन्नावरील भरण्यायोग्य करावरील अधिभाराचा कमाल दर 15% असेल, मात्र कलम 115A, 115AB, 115AC, 115ACA आणि 115E अंतर्गत उत्पन्न करपात्र असल्यास हे लागू होणार नाही.
**आयकर कायदा, 1961 च्या कलम 87A अंतर्गत लागू सवलत रहिवासी व्यक्ती खालीलप्रमाणे कर व्यवस्थेच्या अधीन राहून, कमाल मर्यादेच्या अधीन 100% पर्यंत आयकर सवलतीसाठी देखील पात्र आहेत:
|
करव्यवस्था |
सूट मर्यादा |
सूट मिळवण्याची अट |
|
नवीन करव्यवस्था |
₹ 60,000 |
करपात्र उत्पन्न ₹12,00,000 पेक्षा जास्त नसावे |
|
जुनी करव्यवस्था |
₹ 12,500 |
करपात्र उत्पन्न ₹ 5,00,000 पेक्षा जास्त नसावे |
***टीप : दोन्ही कर व्यवस्थांमध्ये आयकराच्या रकमेवर तसेच अधिभारावर (लागू असल्यास) 4% दराने आरोग्य आणि शिक्षण उपकर भरावा लागेल.
जुन्या कर व्यवस्थेअंतर्गत अनुक्रमे ₹50 लाख, ₹1 कोटी, ₹2 कोटी किंवा ₹5 कोटी आणि नवीन कर व्यवस्थेअंतर्गत अनुक्रमे ₹50 लाख, ₹1 कोटी किंवा ₹2 कोटी पेक्षा मिळालेले उत्पन्न जास्त असल्यास, अधिभारावर खालीलप्रमाणे किरकोळ सवलतीचा दावा करता येतो:
|
निव्वळ उत्पन्न श्रेणी |
किरकोळ सवलत |
|
|
पेक्षा जास्त (₹) |
पेक्षा जास्त नाही (₹) |
|
|
50 लाख |
1 कोटी |
आयकर आणि अधिभार म्हणून भरण्यायोग्य रक्कम ही ₹ 50 लाखांपेक्षा जास्त असलेल्या उत्पन्नाच्या रकमेपेक्षा अधिक, ₹ 50 लाखांच्या एकूण उत्पन्नावर भरण्यायोग्य आयकराच्या एकूण रकमेपेक्षा जास्त असणार नाही |
|
1 कोटी |
2 कोटी |
आयकर आणि अधिभार म्हणून भरण्यायोग्य रक्कम ही ₹ 1 कोटीपेक्षा जास्त असलेल्या उत्पन्नाच्या रकमेपेक्षा अधिक, ₹ 1 कोटीपेक्षा एकूण उत्पन्नावर भरण्यायोग्य आयकराच्या एकूण रकमेपेक्षा जास्त असणार नाही |
|
2 कोटी |
5 कोटी |
आयकर आणि अधिभार म्हणून भरण्यायोग्य रक्कम ही ₹ कोटीपेक्षा जास्त असलेल्या उत्पन्नाच्या रकमेपेक्षा अधिक, ₹2 कोटीपेक्षा एकूण उत्पन्नावर भरण्यायोग्य आयकराच्या एकूण रकमेपेक्षा जास्त असणार नाही |
|
5 कोटी |
- |
Aआयकर आणि अधिभार म्हणून भरण्यायोग्य रक्कम ही ₹ 5 कोटीपेक्षा जास्त असलेल्या उत्पन्नाच्या रकमेपेक्षा अधिक, ₹ 5 कोटीपेक्षा एकूण उत्पन्नावर भरण्यायोग्य आयकराच्या एकूण रकमेपेक्षा जास्त असणार नाही. |
गुंतवणूक / पेमेंट्स / उत्पन्न ज्यावर मला कर लाभ मिळू शकेल
A. आयकर कायदा, 1961 च्या कलम 115BAC अंतर्गत नवीन करव्यवस्था पर्याय निवडणाऱ्या करदात्यास कपाती उपलब्ध असतील
1. कलम 24(b) – गृहकर्जावरील भरलेल्या व्याजासाठी घराच्या मालमत्तेच्या उत्पन्नातून कपात:
|
कलम 24(b) – गृहकर्जावरील भरलेल्या व्याजासाठी घरमालमत्तेच्या उत्पन्नातून कपात: |
|||
|
मालमत्तेचे स्वरूप |
कर्ज घेण्याचा उद्देश |
स्वीकार्य (जास्तीत जास्त मर्यादा) |
ITR भरण्यासाठी आवश्यक तपशील |
|
भाडेतत्वावर दिलेली |
घर मालमत्तेचे बांधकाम किंवा खरेदीसाठी |
कोणतीही मर्यादा नसलेले वास्तविक मूल्य (तथापि, “घरमालमत्तेतील उत्पन्न” या शीर्षाखालील तोटा, असल्यास, अनुसूची CYLA मध्ये इतर कोणत्याही शीर्षांखाली समायोजित करता येणार नाही आणि पुढील वर्षांसाठी पुढे नेलाही जाऊ शकणार नाही) |
|
2. आयकर कायदा, 1961 च्या प्रकरण VIA अंतर्गत निर्दिष्ट कर कपात
|
कलम 80CCD (2) |
|
|
केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेत नियोक्त्याने केलेल्या योगदानातील कपात |
|
|
सर्व श्रेणीतील नियोक्त्यांसाठी |
पगाराच्या 14 % पर्यंत कपात मर्यादा |
|
कलम 80CCH |
|
|
अग्निपथ योजनेतील योगदानाच्या संदर्भातील कपात |
|
|
जो निर्धारिती हा वैयक्तिक करदाता असून, तो अग्निपथ योजनेमध्ये नोंदणीकृत आहे आणि 1 नोव्हेंबर 2022 किंवा त्यानंतर अग्निवीर कॉर्पस निधीची सदस्यता घेतली आहे, तसेच मागील वर्षात त्या निधीतील स्वतःच्या खात्यात कोणतीही रक्कम भरली किंवा जमा केली आहे |
भरलेल्या किंवा जमा केलेल्या संपूर्ण रकमेमधून एकूण उत्पन्नाच्या गणनेमध्ये कपातीला परवानगी दिली जाईल |
|
जिथे केंद्र सरकारद्वारे अग्निवीर कॉर्पस फंडमधील निर्धारितीच्या खात्यात कोणतेही योगदान केले जाते |
अशा प्रकारे योगदान दिलेल्या संपूर्ण रकमेची एकूण उत्पन्नाच्या गणनेमध्ये कपात करण्यास परवानगी दिली जाईल |
B. जुनी करव्यवस्था निवडणाऱ्या करदात्यास उपलब्ध कर कपाती
आयकर कायदा, 1961 च्या कलम 24(b) अंतर्गत – गृहकर्ज आणि घराच्या सुधारणेसाठी घेतलेल्या कर्जावरील भरलेल्या व्याजासाठी घरमालमत्तेच्या उत्पन्नातून कपात > स्वतः व्यापित मालमत्तेच्या बाबतीत, गृहकर्जावरील भरलेल्या व्याजासाठी कपातीची कमाल मर्यादा ₹ 2 लाख आहे. कलम 24(b) अंतर्गत स्वीकार्य व्याज कपात खालील तक्त्यामध्ये दर्शविली आहे:
|
मालमत्तेचे स्वरूप |
कर्ज कधी घेतले होते |
कर्जाचा हेतू |
स्वीकार्य (जास्तीत जास्त मर्यादा) |
आवश्यक तपशील |
|
स्व-व्याप्त |
1/04/1999 रोजी किंवा नंतर |
घर मालमत्तेचे बांधकाम किंवा खरेदीसाठी |
₹ 2,00,000 |
|
|
1/04/1999 रोजी किंवा नंतर |
घर मालमत्तेच्या दुरुस्तीसाठी |
₹ 30,000 |
||
|
1/04/1999 पूर्वी |
घर मालमत्तेचे बांधकाम किंवा खरेदीसाठी |
₹ 30,000 |
||
|
1/04/1999 पूर्वी |
घर मालमत्तेच्या दुरुस्तीसाठी |
₹ 30,000 |
||
|
भाडेतत्वावर दिलेली |
कधीही |
घर मालमत्तेचे बांधकाम किंवा खरेदीसाठी |
कोणत्याही मर्यादेशिवाय वास्तविक मूल्य. निर्धारण वर्षामध्ये इतर उत्पन्नाच्या प्रमुख स्त्रोतांच्या समायोजनासाठी कमाल ₹2,00,000 पर्यंतच्या तोट्याला परवानगी आहे आणि उर्वरित तोटा पुढील 8 निर्धारण वर्षांपर्यंत पुढे नेला जाऊ शकतो. |
|
कलम 80C, 80CCC, 80CCD (1) |
||
|
यासाठी करण्यात आलेल्या पेमेंट्ससाठी कपात |
||
|
80C |
|
₹1,50,000 ची एकत्रित कपात मर्यादा
प्रत्येक पात्र पेमेंटसाठी ITR मध्ये भरायचे तपशील:
|
|
80CCC |
पेन्शन योजनेसाठी LIC किंवा इतर विमा कंपनीची वार्षिक योजना |
|
|
80CCD (1) |
केंद्र सरकारची पेन्शन योजना |
|
|
कलम 80CCD(1B) |
|
|
80CCD (1) अंतर्गत दावा केलेली कपात वगळून, केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेसाठी केलेल्या पेमेंटवरील कपात |
₹ 50,000 ची कपात मर्यादा |
कृपया नोंद घ्या:
1. कलम 80C अंतर्गत कपातीचा दावा करणाऱ्या करदात्यांनी खालील तपशील प्रदान करणे आवश्यक आहे:
- कलम 80C अंतर्गत कपातीसाठी पात्र रक्कम
- पॉलिसी क्रमांक किंवा दस्तऐवज ओळख क्रमांक
2. 80CCD (1),80CCD (1B) अंतर्गत कपातीचा दावा करणाऱ्या करदात्यांनी खालील तपशील प्रदान करणे आवश्यक आहे:
- योगदानाची रक्कम
- करदात्याचे PRAN
|
कलम 80CCD (2) |
|
|
केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेत नियोक्त्याने केलेल्या योगदानातील कपात |
|
|
नियोक्ता सार्वजनिक सेवा क्षेत्र (PSU) किंवा इतर क्षेत्रातील असल्यास |
पगाराच्या 10% पर्यंतची कपात मर्यादा |
|
नियोक्ता केंद्र सरकार किंवा राज्य सरकार असल्यास |
पगाराच्या 14% पर्यंतची कपात मर्यादा |
|
कलम 80CCH |
|
|
अग्निपथ योजनेतील योगदानाच्या संदर्भातील कपात |
|
|
जिथे निर्धारिती हा वैयक्तिक करदाता असून, तो अग्निपथ योजनेमध्ये नोंदणीकृत आहे आणि 1 नोव्हेंबर 2022 किंवा त्यानंतर अग्निवीर कॉर्पस निधीची सदस्यता घेतली आहे, तसेच मागील वर्षात त्या निधीतील स्वतःच्या खात्यात कोणतीही रक्कम भरली किंवा जमा केली आहे |
भरलेल्या किंवा जमा केलेल्या संपूर्ण रकमेमधून एकूण उत्पन्नाच्या गणनेमध्ये कपातीला परवानगी दिली जाईल |
|
जेथे केंद्र सरकार अग्निवीर कॉर्पस फंडातील कर निर्धारितीच्या खात्यात कोणतेही योगदान देते |
अशा प्रकारे योगदान दिलेल्या संपूर्ण रकमेची एकूण उत्पन्नाच्या गणनेमध्ये कपात करण्यास परवानगी दिली जाईल |
|
कलम 80D |
|
|
आरोग्य विमा प्रीमियम आणि प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी करण्यात आलेल्या पेमेंट्ससाठी कपात |
|
|
स्वत: साठी / जोडीदार किंवा अवलंबित मुलांसाठी |
₹ 25,000 (कोणतीही व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असल्यास ₹ 50,000) |
|
प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी ₹ 5,000, वरील मर्यादेमध्ये समाविष्ट |
|
|
पालकांसाठी |
₹ 25,000 (कोणतीही व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असल्यास ₹ 50,000) |
|
प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी ₹ 5,000, वरील मर्यादेमध्ये समाविष्ट |
|
|
आरोग्य विमा संरक्षणासाठी कोणताही प्रिमियम भरला नसल्यास, ज्येष्ठ नागरिकाच्या वैद्यकीय खर्चावरील कपात |
|
|
स्वत: साठी / जोडीदार किंवा अवलंबित मुलांसाठी |
₹ 50,000पर्यंतची कपात मर्यादा |
|
पालकांसाठी |
₹ 50,000पर्यंतची कपात मर्यादा |
टीप:
कलम 80D अंतर्गत कपातीचा दावा करणाऱ्या करदात्यांनी खालील तपशील प्रदान करणे आवश्यक आहे:
- विमा कंपनीचे नाव (विमा कंपनी)
- पॉलिसी क्रमांक
- आरोग्य विम्याची रक्कम
|
कलम 80DD |
|
|
अपंग आश्रित व्यक्तीच्या देखभाल किंवा वैद्यकीय उपचारासाठी केलेल्या पेमेंटवरील कपात किंवा संबंधित मंजूर योजनेच्या अंतर्गत कोणतीही भरलेली/जमा केलेली रक्कम |
₹ 75,000 ची सरसकट कपात खर्च कितीही असला तरी अपंग व्यक्तीसाठी उपलब्ध.
₹ 1,25,000 ची कपात आहे जर व्यक्तीला गंभीर अपंगत्व (80% किंवा त्याहून अधिक) असल्यास. |
कृपया नोंद घ्या: कलम 80DD अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी, ITR मध्ये खालील तपशील प्रदान करणे आवश्यक आहे:
- अपंगत्वाचे स्वरूप
- अपंगत्वाचा प्रकार
- कपातीची रक्कम
- अवलंबिताचा प्रकार
- अवलंबित व्यक्तीचा पॅन
- अवलंबित व्यक्तीचे आधार (कार्ड)
- ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी किंवा बहुविकलांगतेच्या प्रकरणात दाखल केलेल्या फॉर्म 10 IA चा पोचपावती क्रमांक.
- UDID क्रमांक (उपलब्ध असल्यास)
|
कलम 80DDB |
|
|
विशिष्ट आजारांसाठी स्वतःच्या किंवा अवलंबितांच्या वैद्यकीय उपचारासाठी केलेल्या पेमेंटवरील कपात |
₹ 40,000 पर्यंतची कपात मर्यादा (ज्येष्ठ नागरिक असल्यास ₹ 1,00,000) |
|
कलम 80E |
|
|
स्वतःच्या किंवा नातेवाईकाच्या उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या पेमेंटवरील कपात |
घेतलेल्या कर्जावर भरलेलल्या व्याजाची एकूण रक्कम |
टीप:
कलम 80E अंतर्गत कपात मिळवण्यासाठी, ITR मध्ये खालील तपशील देणे आवश्यक आहे:
- बँक/संस्थेकडून घेतलेले कर्ज
- ज्या बँकेकडून / संस्थेकडून कर्ज घेतले आहे तिचे नाव
- बँक/संस्थेचा कर्ज खाते क्रमांक
- कर्ज मंजुरीची तारीख
- कर्जाची एकूण रक्कम
- आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेस थकित असलेले कर्ज
- कलम 80E अंतर्गत व्याज
|
कलम 80EE |
|
|
1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 दरम्यान कर्ज मंजूर असलेल्या निवासी घराच्या मालमत्तेच्या अधिग्रहणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज पेमेंटवरील कपात |
घेतलेल्या कर्जावर भरलेल्या व्याजासाठी ₹ 50,000 पर्यंतची कपात मर्यादा |
टीप:
कलम 80EE, अंतर्गत कपात मिळवण्यासाठी, ITR मध्ये खालील तपशील देणे आवश्यक आहे:
- बँक/संस्थेकडून घेतलेले कर्ज
- ज्या बँकेकडून / संस्थेकडून कर्ज घेतले आहे तिचे नाव
- बँक/संस्थेचा कर्ज खाते क्रमांक
- कर्ज मंजुरीची तारीख
- कर्जाची एकूण रक्कम
- आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेस थकित असलेले कर्ज
- 80EE अंतर्गत व्याज
|
कलम 80EEA |
|
|
पहिल्यांदाच निवासी घरमालमत्ता अधिग्रहित करण्यासाठी घेतलेल्या कर्जावर भरलेल्या व्याजासाठी केवळ व्यक्तींसाठी कपात उपलब्ध आहे, त्यामध्ये कर्ज 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2022 या कालावधीत मंजूर झालेले असावे आणि या कपातीचा दावा कलम 80EE अंतर्गत केलेला नसावा |
घेतलेल्या कर्जावर भरलेल्या व्याजासाठी ₹ 1,50,000 पर्यंतची कपात मर्यादा |
टीप:
कलम 80EE, अंतर्गत कपात मिळवण्यासाठी, ITR मध्ये खालील तपशील देणे आवश्यक आहे:
- निवासी घराच्या मालमत्तेचे मुद्रांक मूल्य
- बँक/संस्थेकडून घेतलेले कर्ज
- ज्या बँकेकडून / संस्थेकडून कर्ज घेतले आहे तिचे नाव
- बँक/संस्थेचा कर्ज खाते क्रमांक.
- कर्ज मंजुरीची तारीख
- कर्जाची एकूण रक्कम
- आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेस थकित असलेले कर्ज
- कलम 80EEA अंतर्गत व्याज
कृपया नोंद घ्यावी की, कलम 80EEA अंतर्गत कपातीचा दावा केवळ कलम 24(b) मधील मर्यादा पूर्णपणे वापरली गेल्यासच करता येईल. तसेच, कर्ज मंजुरीची तारीख आणि इतर पात्र अटींनुसार करदात्यांद्वारे कलम 80EE किंवा 80EEA यांपैकी कोणत्याही एका कलमांतर्गतच कपातीचा दावा करता येईल.
|
कलम 80EEB |
|
|
1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2023 या कालावधीत कर्ज मंजूर झाल्यावर इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी घेतलेल्या व्याजाच्या पेमेंटच्या बाबतीतील कपात |
घेतलेल्या कर्जावर भरलेल्या व्याजासाठी ₹ 1,50,000 पर्यंतची कपात मर्यादा |
टीप:
कलम 80EEB, अंतर्गत कपात मिळवण्यासाठी, ITR मध्ये खालील तपशील देणे आवश्यक आहे:
- बँक/संस्थेकडून घेतलेले कर्ज
- ज्या बँकेकडून / संस्थेकडून कर्ज घेतले आहे तिचे नाव
- बँक/संस्थेचा कर्ज खाते क्रमांक
- कर्ज मंजुरीची तारीख
- कर्जाची एकूण रक्कम
- आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेस थकित असलेले कर्ज
- कलम 80EEB अंतर्गत व्याज
- वाहन नोंदणी क्रमांक
|
कलम 80G |
|
|
विहित निधी, धर्मादाय संस्था इत्यादींना देण्यात आलेल्या देणग्यांवरील कपात खालील श्रेणींच्या अंतर्गत देणग्या कपातीला पात्र आहेत |
|
|
कोणत्याही मर्यादेशिवाय |
100% कपात |
|
50% कपात |
|
|
पात्रता मर्यादेच्या अधीन |
100% कपात |
|
50% कपात |
|
|
टीप: या कलमांतर्गत ₹ 2000/- पेक्षा जास्त रोख स्वरूपात देण्यात आलेल्या देणग्यांवर कोणतीही कपात करण्याची परवानगी दिली जाणार नाही |
|
|
कलम 80GG |
||
|
घरासाठी भरलेल्या भाड्यावरील कपात आणि केवळ स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींसाठी किंवा ज्यांच्या पगारामध्ये घरभाडे भत्ता (HRA) समाविष्ट नाही त्यांच्यासाठी लागू. खालीलपैकी सर्वात कमी रकमेला कपात म्हणून परवानगी असेल |
||
|
या कपातीपूर्वी एकूण उत्पन्नाच्या 10% ने कमी केलेले भरलेले भाडे |
दरमहा ₹ 5,000
|
एकूण उत्पन्नाच्या 25% (दीर्घकालीन भांडवली नफा, कलम 111A अंतर्गत अल्पकालीन भांडवली नफा किंवा कलम 115A किंवा 115D अंतर्गत असलेले उत्पन्न वगळून) |
|
टीप: कलम 80GG अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी फॉर्म 10BA फाइल करणे अनिवार्य आहे आणि उत्पन्नाचे विवरणपत्र फाइल करताना अनुसूची 80GG मधील फॉर्म 10BA चा पोचपावती क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. |
||
|
कलम 80GGA |
|
वैज्ञानिक संशोधन किंवा ग्रामीण विकासासाठी दिलेल्या देणग्यांवरील कपात खालील श्रेणींच्या अंतर्गत देणग्या कपातीला पात्र आहेत |
|
यांच्यासाठी संशोधन संस्था किंवा विद्यापीठ, महाविद्यालय अथवा इतर संस्था |
|
|
यांच्यासाठी संघटना किंवा संस्था |
|
|
कोणताही पात्र प्रकल्प राबविण्यासाठी राष्ट्रीय समितीद्वारे मंजूर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU), स्थानिक प्राधिकरण, संघटना किंवा संस्था यांसाठी केंद्र सरकारकडून अधिसूचित केलेले निधी |
|
|
केंद्र सरकारने स्थापित आणि अधिसूचित केल्यानुसार राष्ट्रीय शहरी दारिद्र्य निर्मूलन निधी |
|
टीप: या कलमांतर्गत ₹ 2000/- पेक्षा जास्त रोख स्वरूपात देण्यात आलेल्या देणगीबाबत कोणतीही कपात करण्याची परवानगी दिली जाणार नाही किंवा सकल एकूण उत्पन्नामध्ये व्यापार / व्यवसायातील नफा किंवा मिळकत यांमधील उत्पन्न समाविष्ट असल्यास कपात करण्याची परवानगी दिली जाणार नाही |
|
कलम 80GGC |
|
|
राजकीय पक्ष किंवा निवडणूक न्यासासाठी दिलेल्या योगदानासाठी कपात |
रोख रकमेमध्ये कोणतेही योगदान दिल्यास, कोणतीही कपात करण्याची परवानगी दिली जाणार नाही. |
|
कलम 80TTA |
|
|
ज्येष्ठ नागरिक नसलेल्या व्यक्तीला बचत बँक खात्यांवर मिळणाऱ्या व्याजावरील कपात |
₹ 10,000/- पर्यंतची कपात मर्यादा |
|
कलम 80TTB |
|
|
रहिवासी ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर मिळालेल्या व्याजावरील कपात |
₹ 50,000/- ची कपात मर्यादा |
|
कलम 80U |
|
|
अपंग रहिवासी करदात्यासाठी कपात |
खर्च काहीही झाला असला तरी, अपंगत्व असलेल्या व्यक्तीसाठी सरसकट ₹ 75,000 ची कपात गंभीर अपंगत्व (80% किंवा त्यापेक्षा अधिक) असलेल्या व्यक्तीसाठी, प्रत्यक्ष झालेल्या खर्चाची पर्वा न करता ₹ 1,25,000 ची सरसकट कपातीची परवानगी असेल |
टीप:
कलम 80U अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी खालील तपशील प्रदान करणे आवश्यक आहे:
- अपंगत्वाचे स्वरूप
- अपंगत्वाचा प्रकार
- कपातीची रक्कम
- ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी किंवा बहुविकलांगतेच्या प्रकरणात दाखल केलेल्या फॉर्म 10IA चा पोचपावती क्र.
- UDID क्रमांक (उपलब्ध असल्यास)