TAN तपशील जाणणे उपयोगकर्ता पुस्तिका
1. अवलोकन
TAN तपशील जाणणे ही सेवा ई-फाइलिंग वापरकर्त्यांकडून (नोंदणीकृत असलेले आणि नोंदणीकृत नसलेले दोन्हीही) वापरली जाऊ शकते. ही सेवा वापरण्यासाठी आपल्याला ई-फाइलिंग पोर्टलवर वर लॉग-इन करण्याची गरज नाही. या सेवेद्वारे आपण TAN साठी कर वजाकर्ता आणि संग्रहक यांचे TAN तपशील (मुलभूत तपशील आणि AO तपशील) पाहू शकतो. आपण वजाकर्त्याचे नाव किंवा त्यांचे TAN यापैकी कोणतेही एक प्रविष्ट करून तपशील पाहू शकता.
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्वावश्यकता
- वैध मोबाइल नंबर
- वजाकर्त्याचे TAN किंवा वजाकर्त्याचे नाव
- वजाकर्त्याची स्थिती
3. टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन
स्टेप 1 : ई-फाइलिंग पोर्टलच्या होम पेज वर जा आणि TAN तपशील जाणणे वर क्लिक करा.
स्टेप 1
स्टेप 2: TAN तपशील जाणणे पेजवर, जर आपल्याला वजाकर्त्याचे TAN माहित नसल्यास, शोध निकष म्हणून नाव पर्याय निवडा. वजाकर्त्याची श्रेणी आणि राज्य निवडा; वजाकर्त्याचे नाव आणि आपल्यासाठी उपलब्ध असलेला वैध मोबाइल नंबर प्रविष्ट करा.
स्टेप 2: नाव निवडा
वैकल्पिकरित्या, आपल्याला वजाकर्त्याचे TAN माहिती असेल तर, शोध निकष म्हणून TAN पर्याय निवडा. वजाकर्त्याची श्रेणी आणि राज्य निवडा; वजाकर्त्याचे TAN आणि आपल्याला उपलब्ध असलेला वैध मोबाइल नंबर प्रविष्ट करा.
स्टेप 2:TAN निवडा
स्टेप 3: पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा. आपण स्टेप 2 मध्ये भरलेल्या मोबाइल नंबरवर आपल्याला 6-अंकी OTP प्राप्त होईल.
स्टेप 3
स्टेप 4: पडताळणी पेजवर, 6-अंकी OTP प्रविष्ट करा आणि प्रमाणीकरण करा वर क्लिक करा.
टीप:
- OTP केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल.
- योग्य OTP प्रविष्ट करण्यासाठी आपल्याकडे 3 प्रयत्न आहेत.
- स्क्रीनवरील OTP कालबाह्य उलट मोजणी वेळ दर्शक आपल्याला OTP कालबाह्य कधी होईल हे सांगते.
- OTP पुन्हा पाठवा यावर क्लिक केल्यानंतर, एक नवीन OTP जनरेट केला जाईल आणि पाठविला जाईल.
स्टेप 5:स्टेप 2 मध्ये आपण वजाकर्त्याचे नाव प्रविष्ट केलेले असल्यास, नाव जुळणार्या सर्व नोंदींची यादी आपल्याला दिसेल. TAN तपशील सारणीमधून वजाकर्त्याच्या आवश्यक नावावर क्लिक करा आणि आपण वजाकर्त्याचे वैयक्तिक TAN तपशील (मूलभूत तपशील आणि AO तपशील) पाहू शकाल.
वैकल्पिकरित्या, जर आपण स्टेप 2 मध्ये वजाकर्त्याचा TAN प्रविष्ट केला असल्यास, आपल्याला जुळणाऱ्या नोंदी (मूलभूत तपशील आणि AO तपशील) दिसतील.
4. संबंधित विषय