Do not have an account?
Already have an account?

1. ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी मला माझ्या नोंदणीकृत मोबाइल नंबरची गरज लागेल का?

ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करण्याचे अनेक मार्ग आहेत. नोंदणीकृत मोबाइल नंबर असण्याची गरज नाही. तथापि, आपण आपला पासवर्ड विसरलात तर नोंदणीकृत मोबाइल नंबर उपयुक्त ठरू शकतो.

2. मी माझे PAN ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदवले पाहिजे का?

मजकूर बॉक्समध्ये प्रविष्ट केलेला PAN ई-फाइलिंग पोर्टलमध्ये नोंदवलेला असावा. नसल्यास, आपल्याला खालील संदेश दिसेल - PAN नोंदवलेला नाही, कृपया या PAN ची नोंदणी करा किंवा इतर काही PAN वापरून पहा. PANशी जोडलेले ई-फाइलिंग खाते निष्क्रिय झाले असल्यास, कृपया हेल्पडेस्कवर संपर्क करून पुन्हा सक्रिय करा.

3.मी चुकीचा पासवर्ड प्रविष्ट केल्यास माझे खाते लॉक होईल का?

होय, लॉग इन करण्यासाठी 5 वेळा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर खाते लॉक केले जाईल. "आपले खाते अनलॉक करा" कार्यक्षमता वापरून खाते अनलॉक केले जाऊ शकते किंवा 30 मिनिटांनंतर ते आपोआप अनलॉक होईल.

4. ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी मला आधार आणि PAN सह लिंक करण्याची आवश्यकता आहे का?

आपला PAN आधारशी लिंक नसल्यास, आपण ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करू शकता, परंतु आपल्याकडे मर्यादित ॲक्सेस असेल. त्यामुळे PAN ला आधारशी लिंक करण्याचा सल्ला दिला जातो.

5. ई-फाइलिंग खात्यात लॉग इन करण्यासाठी सर्व बँक नेट बँकिंग सुविधा प्रदान करतात का?

बहुतेक राष्ट्रीय मान्यता प्राप्त बँक आपल्या ग्राहकांसाठी ही सेवा प्रदान करतात. तथापि, सुरक्षित राहण्यासाठी, बँकेची वेबसाइट तपासण्याची किंवा त्यासंबंधित बँकेशी संपर्क साधण्याची शिफारस केली जाते. नेट बँकिंग पर्यायावर क्लिक केल्यानंतर मान्यताप्राप्त बँकांची यादी ई-फाइलिंग पोर्टलवर उपलब्ध आहे.

6. माझ्याकडे OTP साठी मोबाइल कनेक्टिव्हिटी नाही. मी माझ्या ई-फाइलिंग खात्यामध्ये लॉग इन कसे करू शकतो?

ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी आपल्याला OTP ची गरज नाही. आपण “ई-फाइलिंग व्हॉल्ट उच्च सुरक्षा” सेवेमधून कोणताही उच्च सुरक्षा पर्याय सक्षम केला असल्यास, 2रा घटक प्रमाणीकरणासाठी खालीलपैकी कोणतीही पद्धत निवडल्यास, आपण खालील पद्धतींनी लॉग इन करू शकता:

  • बँक खाते EVC (आपल्याकडे आधीपासूनच EVC असल्यास), किंवा
  • डीमॅट खाते EVC (आपल्याकडे आधीपासूनच EVC असल्यास), किंवा
  • DSC किंवा
  • विद्यमान आधार OTP.

7. ई-फाईलिंग वॉल्ट म्हणजे काय? हे मला कसे मदत करते?

ई-फाइलिंग व्हॉल्ट पर्याय लॉग इन आणि पासवर्ड रीसेट करण्यासाठी बहु-घटक प्रमाणीकरण प्रदान करतो. लॉग इन करताना प्रमाणीकरणाच्या अतिरिक्त स्टेपसाठी आपण बँक खाते EVC, डिमॅट खाते EVCआणि DSC सारख्या अनेक पर्यायांमधून निवड करू शकता.

8. नवीन पोर्टलवरील लॉग इन सेवेमध्ये कोणत्या सुधारणा आहेत?

नवीन ई-फाइलिंग पोर्टलमध्ये, त्रास मुक्त लॉग इन सुनिश्चित करण्यासाठी कॅप्चा काढून टाकण्यात आला आहे. फिशिंग वेबसाइटपासून संरक्षणासाठी सुरक्षित ॲक्सेस संदेश जोडला गेला आहे. याव्यतिरिक्त, आपण ई-वॉल्ट सुरक्षेचा वापर करून बहु-घटक प्रमाणीकरण सेट करू शकता.

9. मी एक स्वतंत्र करदाता आहे. लॉग इन करण्यासाठी माझा वापरकर्ता ID काय आहे?

प्रत्येक व्यक्तींसाठी वापरकर्ता ID हा PAN असतो.

10. CA, ERI, बाह्य एजन्सी, ITDREIN वापरकर्ता आणि TIN 2.0 वापरकर्त्यासाठी वापरकर्ता ID काय आहे?

ई-फाइलिंग पोर्टलमध्ये नोंदणी केल्यास वरील वापरकर्त्यांंचा वापरकर्ता ID तयार केला जातो. संबंधित वापरकर्ता ID:

  • CA - ARCA नंतर नोंदणी करताना जनरेट झालेला 6-अंकी नंबर
  • ERI - ERIP त्यानंतर नोंदणी दरम्यान जनरेट झालेला 6-अंकी नंबर
  • बाह्य एजन्सी - EXTA त्यानंतर नोंदणी दरम्यान जनरेट झालेला 6-अंकी नंबर
  • ITDREIN वापरकर्ता - नोंदणी दरम्यान जनरेट झालेला वापरकर्ता ID
  • TIN2.0 वापरकर्ता - TINP नंतर नोंदणी करताना जनरेट झालेला 6-अंकी नंबर

11. माझ्या ई-फाइलिंग खात्यात एखाद्या अनधिकृत व्यक्तीने अ‍ॅक्सेस केला आहे असे मला वाटत असल्यास मी काय करू शकतो?

आपल्याला वाटत असेल की, आपल्या ई-फाइलिंग खात्याशी तडजोड केली गेली आहे किंवा अनधिकृत पद्धतीने अ‍ॅक्सेस केला गेला आहे, तर आपण सायबर गुन्ह्यांचे बळी ठरू शकता. कृपया पहिली पायरी म्हणून संबंधित पोलिस किंवा सायबर-सेल प्राधिकरणांना घटनेची माहिती द्या. पीडित / तक्रारदारांना ऑनलाइन रीतीने सायबर गुन्ह्याच्या तक्रारी नोंदविण्याची प्रकिया सुलभ करण्यासाठी भारत सरकारच्या पुढाकाराने https://cybercrime.gov.in येथे जाऊन आपण ऑनलाइन गुन्ह्याची तक्रार / FIR दाखल करू शकता. कथित सायबर गुन्ह्याशी संबंधित कोणतीही माहिती आयकर विभागामार्फत संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिका-यांना, जेव्हा त्यांना वैधानिक अन्वेषण अंतर्गत बोलावले जाते तेव्हा ते सामायिक केले जाईल.

सामान्य सावधगिरी म्हणून, कृपया आपले लॉग इन क्रेडेंशियल किंवा इतर संवेदनशील माहिती सामायिक करू नका.

12. ई-फाइलिंग पोर्टलमध्ये लॉग इन करण्यासाठी मला माझा वापरकर्ता ID आणि पासवर्ड आवश्यक आहे का?

लॉग इन करण्याच्या बर्‍याच पद्धतींमध्ये, ई-फाइलिंग पोर्टलमध्ये लॉग इन करण्यासाठी वापरकर्ता ID आणि पासवर्ड आवश्यक आहे. नेट बँकिंग यांसारख्या प्रकरणांमध्ये, वापरकर्ता ID आणि पासवर्ड आवश्यक नाही.

13. मला माझ्या ई-फाइलिंग नोंदणीकृत मोबाइलचा ॲक्सेस नसल्यास, मला नवीन पोर्टलवर लॉग इन कसे करता येईल?

आपण वापरकर्ता ID आणि पासवर्ड वापरून नवीन पोर्टलवर लॉग इन करू शकता आणि आपण आधार OTP वापरून लॉग इन सक्षम केले असल्यास, आपला PAN आधारसह लिंक केलेला आहे आणि आपल्याला आधार OTP जनरेट करण्यासाठी आधारसह लिंक केलेल्या मोबाइल नंबरचा ॲक्सेस असल्याची खात्री करा आणि ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा.

 

14. नेट बँकिंग लॉग इनसाठी अनेक बँक खाती वापरली जाऊ शकतात का?

नाही, नेट बँकिंग लॉग इनसाठी फक्त एकच वैध बँक खाते सक्षम केले जाऊ शकते. कोणतेही वैध खाते निवडले नसल्यास, सिस्टम 'ॲक्सेस नाकारला' असा संदेश दर्शवेल.

15. ॲक्सेस नाकारल्या गेलेल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मला माझ्या प्रोफाइलमध्ये 'नेट बँकिंगद्वारे लॉग इन करा' पर्याय कसा सक्षम करता येईल?

'ॲक्सेस नाकारला' समस्येबाबत, कृपया आपल्या प्रोफाइल विभागामध्ये माझ्या बँक खात्यामधील नेट बँकिंगद्वारे लॉग इन पर्याय सक्षम करा. एकदा सक्षम झाल्यानंतर, आपण नेट बँकिंग मोड वापरून लॉग इन करू शकाल.

नेट बँकिंग लॉग इन सक्षम करण्यासाठी प्रक्रिया प्रवाह खालीलप्रमाणे आहे:

  • आपल्या खात्यामध्ये लॉग इन करा
  • प्रोफाइलवर जा
  • माझे बँक खाते जोडा निवडा.
  • नेट बँकिंगद्वारे लॉग इन हा पर्याय सक्षम करा.

16. नेट बँकिंगसाठी ई-व्हॉल्ट उच्च सुरक्षा लॉग इन पर्याय सक्षम करण्यासाठी कोणत्या पूर्व-आवश्यकता आहेत?

नेट बँकिंगसाठी ई-व्हॉल्ट उच्च सुरक्षा लॉग इन पर्याय सक्षम करण्यासाठी, आपल्याला प्रथम 'माझे बँक खाते' स्क्रीनवर उपलब्ध असलेला 'नेट बँकिंग नामांकनाद्वारे लॉग इन करा' पर्याय सक्षम करावा लागेल.

17. ई-व्हॉल्टच्या बाबतीत मी 'नेट बँकिंग नामांकनाद्वारे लॉग इन करा' पर्याय अक्षम केल्यास काय होईल? नेट बँकिंगसाठी उच्च सुरक्षा लॉग इन पर्याय आधीपासून सक्षम केलेला आहे?

आपण "नेट बँकिंग नॉमिनेशनद्वारे लॉग इन करा" हा पर्याय अक्षम करत असल्यास, त्यामुळे आपल्या नेट बँकिंग लॉग इनशी जोडलेल्या सक्षम सुरक्षा लॉग इन वैशिष्ट्याचा ॲक्सेस गमावला जाईल. एकदा अक्षम केल्यानंतर, आपण या पद्धतीने पोर्टलमध्ये लॉग इन करू शकणार नाही. तथापि, आपण इतर कोणतेही ई-व्हॉल्ट लॉग इन पर्याय सक्षम केले असल्यास, ते सक्रिय राहतील.