Do not have an account?
Already have an account?

1. अवलोकन

ही लॉग इन-पूर्व सेवा त्या सनदी लेखापालांना (CA) उपलब्ध आहे ज्यांना ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणी करायची आहे आणि ते वापरायचे आहे.नोंदणी सेवेद्वारे वापरकर्ता सर्व कर-संबंधी उपक्रम वापरू शकतो आणि त्यांचा मागोवा घेऊ शकतो.

2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्वअट

  • CA सदस्यता क्रमांक
  • CA म्हणून नोंदणी केल्याचा दिनांक
  • ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत PAN
  • निर्दिष्ट PAN सह नोंदणीकृत वैध आणि सक्रिय DSC

3. क्रमानुसार- मार्गदर्शक


स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा, नोंदणी करा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 2: इतर वर क्लिक करा आणि श्रेणी मध्ये सनदी लेखापालनिवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 3: मूलभूत तपशील पेजवर PAN, नाव, DOB, सदस्यता क्रमांक आणि नोंदणी दिनांक असे सर्व अनिवार्य तपशील प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive


टीप:

  • ई-फाइलिंग पोर्टलवर PAN नोंदणीकृत नसल्यास, त्रुटीचा संदेश दर्शवला जाईल. जर आपले PAN नोंदणीकृत असेल तरच आपण CA म्हणून नोंदणी करू शकता.
  • या टप्प्यावर, ही प्रणाली तपासेल की DSC निर्दिष्ट PAN शी जोडलेला आहे अथवा नाही. DSC नोंदणीकृत नसल्यास किंवा PAN ला जोडलेले DSC कालबाह्य झाले असल्यास त्रुटीचा संदेश दर्शवला जाईल. पुढे जाण्यासाठी आपला DSC आपल्या PAN सह नोंदवा / अपडेट करा.


स्टेप 4: ICAI डेटाबेसमध्ये यशस्वीपणे प्रमाणीकरण झाल्यांनतर, संपर्क तपशील पेज दिसेल. प्राथमिक मोबाइल नंबर, ईमेल ID आणि पत्ता यासरखे सर्व अनिवार्य तपशील प्रविष्ट करा आणि चालू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 5: स्टेप 4 मध्ये प्रविष्ट केलेल्या आपल्या मोबाइल नंबर आणि ईमेल ID वर दोन वेगळे OTP पाठवले जातील. आपल्या मोबाइल नंबर आणि ईमेल ID प्राप्त झालेले वेगळे 6-अंकी OTP प्रविष्ट करा आणि चालू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive



टीप:

  • OTP केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल.
  • अचूक OTP प्रविष्ट करण्यासाठी आपल्याकडे 3 प्रयत्न उपलब्ध आहेत.
  • स्क्रीन वरीलOTP कालबाह्य उलट मोजणी वेळ दर्शक आपल्याला OTP कालबाह्य कधी होईल हे सांगते.
  • OTP परत पाठवा वर क्लिक केल्यावर, एक नवीन OTP तयार केला जाईल आणि पाठविला जाईल.


स्टेप 6: प्रविष्ट केलेले सर्व तपशील अचूक आहेत अथवा नाही हे तपासा. आवश्यक असेल तर, स्क्रीनवरील तपशील सुधारा, नंतर पुष्टी करा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 7: पासवर्ड सेट करा पेजवर, आपला इच्छित पासवर्ड पासवर्ड सेट करा आणि पासवर्डची पुष्टी करा ह्या दोन्ही रकान्यात भरा, आपला वैयक्तिक संदेश ठरवा, आणि नोंदणी करा वर क्लिक करा.

Data responsive


टीप:

  • रिफ्रेश किंवा मागे जा वर क्लिक करू नका.
  • आपण नवीन पासवर्ड प्रविष्ठ करताना, पासवर्ड धोरणाची काळजी घ्या:
    • हे किमान 8 अक्षरे आणि कमाल 14 अक्षरांचे असायला हवे.
    • यामध्ये मोठ्या लिपीमध्ये आणि लहान लिपीमध्ये अशी दोन्ही प्रकारची अक्षरे समाविष्ट असली पाहिजेत.
    • त्यात एक संख्या असावी.
    • यात एक विशेष अक्षर असावे (उदा. @#$%).


स्टेप 8: लॉग इन प्रक्रिया सुरू करण्यासाठी लॉग इन सुरू ठेवा वर क्लिक करा. आपले लॉग इन तपशील आपल्या प्राथमिक ईमेल ID वर ईमेल केले जातील.

Data responsive


टीप: ई-फाइलिंग पोर्टलवर आपल्याला उपलब्ध असणारी सर्व वैशिष्ट्ये वापरण्यासाठी लॉग इन करा आणि आपली प्रोफाइल अपडेट करा.

4. संबंधित विषय