Do not have an account?
Already have an account?


1. सनदी लेखापाल कोण असतो?
सनदी लेखापाल (CA) हा भारतीय सनदी लेखापाल संस्थेचा नोंदणीकृत सदस्य असतो. CA त्याच्या/तिच्या ग्राहकाच्या वतीने ITR, लेखापरीक्षा अहवाल आणि इतर वैधानिक फॉर्म फाईल करू शकतो.

2. CA म्हणून नोंदणी करण्यासाठी पूर्वावश्यकता कोणत्या आहेत?
CA म्हणून नोंदणी करण्यासाठी आवश्यक पूर्वावश्यकता आहेत सदस्यता क्रमांक आणि नोंदणी दिनांक. आपले PAN ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असले पाहिजे आणि वैध व सक्रिय DSC निर्दिष्ट PAN सह नोंदणीकृत असले पाहिजे.

3. CA म्हणून नोंदणी करताना माझ्याकडे DSC असणे आवश्यक आहे का?
होय, CA म्हणून नोंदणी करताना आपल्याकडे DSC असणे आवश्यक आहे. आपले DSC नोंदणीकृत नसेल तर, प्रथम आपल्याला ई-फाइलिंग पोर्टलवर त्याची नोंदणी करावी लागेल.

4. ई-फाइलिंग पोर्टलवर CA म्हणून नोंदणी करताना माझ्याकडे ईएमसायनर उपयुक्तता असणे आवश्यक आहे का?
होय, आपल्याला ईएमसायनर उपयुक्तता डाउनलोड आणि इंस्टॉल करावी लागेल. नोंदणीच्या वेळेस डाऊनलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली जाते.