Do not have an account?
Already have an account?

1. मी कंपनी म्हणून नोंदणी का केली पाहिजे?
नोंदणी सेवा ई-फाइलिंग पोर्टलवर वापरकर्ता खाते तयार करण्यात मदत करते. ITR फाइल करणे, कर कपात तपशील, परतावा स्थिती इत्यादी सेवांचा लाभ घेण्यासाठी कंपनी पोर्टलवर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. ई-फाइलिंग पोर्टलद्वारे कर संबधी सर्व उपक्रमांचा आढावा केवळ नोंदणी केल्यानंतरच घेता येतो.

2. कंपनी म्हणून नोंदणी करण्यासाठी कोणत्या पूर्वावश्यकता आहेत?
कंपनी म्हणून ई-फाइलिंग वर नोंदणी करण्यासाठी कंपनीचे वैध आणि सक्रिय PAN आणि मुख्य संपर्काचे नोंदणीकृत DSC आवश्यक आहे. मुख्य संपर्काचा PAN ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असला पाहिजे.

3. मुख्य संपर्क म्हणजे कोण?
मुख्य संपर्क म्हणजे अशी व्यक्ती जी कंपनीची मुख्य प्रतिनिधी म्हणून कार्य करते. अशी व्यक्ती जी स्वाक्षरी करण्यासाठी अधिकृत असते आणि कंपनीला बांधील करण्याची क्षमता असते अशी व्यक्ती मुख्य संपर्क म्हणून नियुक्त केली जाते. मुख्य संपर्क कंपनीच्या संदर्भात आयकर विभागाचे सर्व संप्रेषण (सूचना/आदेश सह) प्राप्त करतील. मुख्य संपर्काने ई-फाइलिंग पोर्टलमध्ये नाव, पत्ता, फोन नंबर आणि इतर तपशीलांसह नोंदणी करणे आवश्यक आहे.

4. माझ्या कंपनी/फर्मच्या मुख्य संपर्काकडे PAN नाही आहे. मुख्य संपर्काच्या डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रावर (DSC) डिफॉल्ट PAN आहे. जेव्हा मी DSC अपलोड/नोंदणी करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा PAN मध्ये विसंगती आढळतात काय करावे?
डिफॉल्ट PAN सह डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र ई-फाइलिंग पोर्टलवर स्वीकारले जाणार नाही. या प्रकरणात, PAN एन्क्रिपशन शिवाय डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र वापरले गेले पाहिजे.