Do not have an account?
Already have an account?

1. अवलोकन


ही प्लॉग इन पूर्व सेवा त्या सर्व कर वजावटदार/संकलकांना उपलब्ध आहे ज्यांना ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणी करायची आहे आणि ते वापरायचे आहे. नोंदणी सेवेद्वारे वापरकर्ता सर्व कर-संबंधी उपक्रम वापरू शकतो आणि त्यांचा मागोवा घेऊ शकतो.

2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्वअट

  • वैध आणि सक्रिय TAN
  • मुख्य संपर्काचा PAN ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदवला गेला पाहिजे.

3. क्रमानुसार- मार्गदर्शक

स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा, नोंदणी करा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 2: इतर वर क्लिक करा आणि श्रेणी मध्ये कर वजावटदार आणि संकलक म्हणून निवडा.

Data responsive


स्टेप 3: संस्थेचा TAN प्रविष्ट करा आणि प्रमाणित करा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 4a: जर डेटाबेस मध्ये TAN उपलब्ध असेल, TRACES मध्ये नोंदणीकृत असेल आणि नोंदणीसाठी आधीच विनंती केली गेली नसेल आणि मंजुरीसाठी प्रलंबित असेल तर:

  • मूलभूत तपशील पेज पाहण्यासाठी चालू करा वर क्लिक करा.
  • मुलभूत तपशील आधीच भरलेले असल्यास, चालू करा वर क्लिक करा.
Data responsive


स्टेप 4b: डेटाबेस मध्ये TAN उपलब्ध असल्यास, मात्र TRACES मध्ये नोंदणीकृत नसल्यास आणि नोंदणीसाठी आधीच विनंती केली गेली नसल्यास आणि मंजुरीसाठी प्रलंबित असल्यास:

  • TRACES पेज पाहण्यासाठी चालू करा वर क्लिक करा.
  • मूलभूत तपशील पेज पाहण्यासाठी TRACES वर ई-फाइलिंगसह नोंदणी करा वर क्लिक करा.
  • आवश्यकतेनुसार मूलभूत तपशील प्रविष्ट करा आणि चालू करा वर क्लिक करा.


टीप: आपल्याला प्रथम TRACES वर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर, ई-फाइलिंगसह नोंदणी वर क्लिक केल्यानंतर आपण ई-फाइलिंग नोंदणी पेजवर जाल.

स्टेप 4c: आपले TAN डेटाबेस वर उपलब्ध असल्यास, नोंदणीची विनंती आधीच केली असल्यास आणि मंजुरीसाठी प्रलंबित असल्यास:

  • त्रुटीचा संदेश प्रदर्शित होईल आणि आपण नोंदणी प्रक्रिया मागे घेण्याचा निर्णय घेऊ शकता.


स्टेप 5: पैसे भरणाऱ्या किंवा कर गोळा करणाऱ्या व्यक्तीचे तपशील प्रविष्ट करा आणि चालू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 6: प्राथमिक मोबाईल नंबर, ईमेल ID आणि पोस्टाच्या पत्त्यासह संपर्क तपशील प्रदान करा. पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा

Data responsive


स्टेप 7: 6 व्या स्टेपमध्ये प्रविष्ट केलेल्या आपल्या प्राथमिक मोबाइल नंबर आणि ईमेल ID वर दोन भिन्न OTP पाठवले गेले आहेत. आपल्या मोबाइल नंबर आणि ईमेल ID वर प्राप्त झालेले वेग वेगळे 6-अंकी OTP प्रविष्ट करा आणि चालू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive


टीप:

  • OTP केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल.
  • योग्य OTP प्रविष्ट करण्यासाठी आपल्याकडे 3 प्रयत्न आहेत.
  • स्क्रीनवरील OTP कालबाह्यता काउंटडाऊन टाईमर आपल्याला OTP कधी कालबाह्य होईल याची माहिती देतो.
  • OTP पुन्हा पाठवा वर क्लिक केल्यानंतर, एक नवीन OTP जनरेट होईल व पाठवला जाईल.

स्टेप 8: तपशीलांची पडताळणी करा पेजवर, प्रदान केलेल्या तपशीलांचे पुनरावलोकन करा आणि आवश्यक असल्यास, तपशीलांमध्ये बदल करा. पुष्टी करा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 9: पासवर्ड सेट करा पेजवर, आपला इच्छित पासवर्ड पासवर्ड सेट करा आणि पासवर्डची पुष्टी करा ह्या दोन्ही रकान्यात भरा, आपला वैयक्तिक संदेश ठरवा, आणि नोंदणी करा वर क्लिक करा.

Data responsive


टीप:

  • रिफ्रेश किंवा मागे जा वर क्लिक करू नका.
  • आपण नवीन पासवर्ड प्रविष्ठ करताना, पासवर्ड धोरणाची काळजी घ्या:
    • हे किमान 8 अक्षरे आणि कमाल 14 अक्षरांचे असायला हवे.
    • यामध्ये मोठ्या लिपीमध्ये आणि लहान लिपीमध्ये अशी दोन्ही प्रकारची अक्षरे समाविष्ट असली पाहिजेत.
    • त्यात एक संख्या असावी.
    • यात एक विशेष अक्षर असावे (उदा. @#$%).

व्यवहार ID सोबत यशस्वी झाल्याचा संदेश दाखवला जातो. कृपया भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार ID ची नोंद ठेवा. सक्षम प्राधिकरणाकडून मंजुरी प्राप्त झाल्यांनतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते.
 

Data responsive


4. संबंधित विषय