Do not have an account?
Already have an account?

1. फॉर्म 10-ID म्हणजे काय?
उत्पादन करणार्‍या नवीन देशी कंपन्या विशिष्ट अटींच्या अधीन राहून, आयकर अधिनियम 1961 च्या विभाग 115 BAB अंतर्गत 15% (लागू अधिभार आणि उपकर जोडून) सवलतीच्या कर दराने कर भरणे निवडू शकतात. असे करण्यासाठी, पहिल्या मूल्यांकन वर्ष जे 1 एप्रिल, 2020 ला किंवा त्यानंतर सुरू होते लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचे परतावा सादर करण्यासाठी कलम 139 च्या उप-विभाग (1 ) अंतर्गत देय तारखेस किंवा त्यापूर्वी फॉर्म 10 - ID फाईल करणे आवश्यक आहे.

2. फॉर्म 10- ID फाईल करणे कोणाला आवश्यक आहे?
1 ऑक्टोबर, 2019 रोजी किंवा त्यानंतर तयार केलेली उत्पादन करणारी नवीन देशी कंपनी, ज्यात 31 मार्च 2023 रोजी किंवा त्यापूर्वी एखाद्या वस्तूची निर्मिती किंवा उत्पादन सुरू झाले आणि सवलतीच्या दराने कर आकारला जाण्याचा पर्याय निवडला आहे अश्या कंपनी ने फॉर्म 10-ID दाखल करणे आवश्यक आहे.

3.सर्व लागू असलेल्या करदात्यांनी (देशांतर्गत कंपन्या) फॉर्म 10-ID दाखल करणे अनिवार्य आहे का?
आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 115BAB अंतर्गत जर एखादी देशी कंपनी 15%
सवलतीचा कर दर (लागू अधिभार आणि उपकर जोडून) निवडत असेल तरच फॉर्म 10-ID दाखल करणे आवश्यक आहे.

4. मी फॉर्म 10- ID कसा भरणे आणि दाखल करू शकतो?
तुम्ही फक्त ऑनलाइन पद्धतीने (ई-फाईलिंग पोर्टलद्वारे) फॉर्म 10- ID दाखल करु शकता.

5. हा फॉर्म दाखल करण्याची वेळ काय आहे?
ITR भरण्याच्या देय तारखेच्या आधी आपल्याला फॉर्म 10- ID दाखल करणे आवश्यक आहे.

6. पुढील मूल्यांकन वर्षासाठी मला फॉर्म पुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे का?

7. फॉर्म यशस्वीरित्या दाखल केला गेला आहे हे मला कसे कळेल?
तुम्हाला ई-फाईलिंग पोर्टलवर नोंदणीकृत तुमच्या ईमेल ID आणि मोबाईल नंबरवर पुष्टीकरण प्राप्त होईल. याव्यतिरिक्त, आपण आपल्या कृतींसाठी टॅब अंतर्गत आपल्या कार्यसूची अंतर्गत स्थिती देखील पाहू शकता.

8. फॉर्म 10- ID दाखल करण्यासाठी ई - सत्यापन आवश्यक आहे का? होय असल्यास, मी फॉर्म 10- ID कसा सत्यापित करू शकतो?
होय, फॉर्म 10- ID ई - सत्यापित करणे आवश्यक आहे. आपण डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र वापरुन ई - सत्यापित करू शकता.