1. अवलोकन
www.incometax.gov.in या ई-फाइलिंग पोर्टलवर सर्व करदात्यांना अधिकृत बँकांच्या डेबिट कार्डद्वारे कर पेमेंट हा पर्याय उपलब्ध आहे . या सेवेसह, आपण ई-फाइलिंग पोर्टलवर ऑनलाइन कर पेमेंट करण्यासाठी उपलब्ध असलेल्या अधिकृत बँकेचे डेबिट कार्ड वापरून(लॉग इन करण्यापूर्वी किंवा लॉग इन केल्यानंतरच्या मोडमध्ये) कराचे ऑनलाइन पेमेंट करू शकता.
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्वअट
आपण लॉग इन करण्यापूर्वी (ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करण्यापूर्वी) किंवा लॉग इन केल्यानंतरच्या (ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर) मोडमध्ये “अधिकृत बँकांचे डेबिट कार्ड” वापरून कर पेमेंट करू शकता.
|
पर्याय |
पूर्वावश्यकता |
|
लॉग इन करण्यापूर्वी |
|
|
लॉग इन केल्यानंतर |
|
महत्त्वाची सूचना: (ई-फाइलिंग पोर्टलवर डेबिट कार्डद्वारे कर पेमेंटची सुविधा देणाऱ्या )अधिकृत बँक [DJ1] [DMG2] यांद्वारे जारी केलेले डेबिट कार्ड असलेले करदाते कर पेमेंट करण्यासाठी ही पद्धती वापरू शकतात. या पद्धतीने कर भरण्यासाठी कोणतेही व्यवहार शुल्क/फी लागू नाही. आतापर्यंत, कॅनरा बँक, ICICI बँक, इंडियन बँक, भारतीय स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकेची डेबिट कार्डे डेबिट कार्ड पद्धतीद्वारे ई-फाइलिंग पोर्टलवर ('कराचे ई-पेमेंट सेवा' द्वारे ) कर पेमेंट करण्याची सुविधा देत आहेत इतर बँकांसाठी, कृपया पेमेंट गेटवे पद्धत निवडा.
3. स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शक
3.1. नवीन चलान फॉर्म (CRN) जनरेट करा – लॉग इन नंतर सेवा
स्टेप 1: आपला वापरकर्ता ID आणि पासवर्डसह ई- फाइलिंग पोर्टल वर लॉग इन करा.
स्टेप 2: डॅशबोर्डवर, ई-फाइल > कराचे ई-पेमेंट वर क्लिक करा. आपल्याला कराचे ई-पेमेंट वर नेव्हिगेट केले जाईल. कराचे ई-पेमेंट पेजवर, ऑनलाइन कर पेमेंट करणे सुरू करण्यासाठी नवीन पेमेंट पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 3: नवीन पेमेंट पेजवर, आपल्याला लागू असलेल्या कर पेमेंट टाइलवर पुढे जा वर क्लिक करा.
स्टेप 4: लागू असलेली कर पेमेंट टाइल निवडल्यानंतर, निर्धारण वर्ष, लघु शीर्षक, इतर तपशील (लागू असेल तर) निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 5: कर विभाजनाचे तपशील जोडा पेजवर, एकूण कर पेमेंट रकमेचे विभाजन भरा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 6: पेमेंट प्रकार निवडा पेजमध्ये, डेबिट कार्ड पद्धत निवडा आणि पर्यायांमधून बँकेचे नाव निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
टीप : कृपया लक्षात घ्या की, (जे ई-फाइलिंग पोर्टलवर डेबिट कार्डद्वारे करच्या पेमेंटची सुविधा देत आहेत), अशा अधिकृत बँकेने जारी केलेले डेबिट कार्ड असलेले करदाते कर भरण्यासाठी या पद्धतीचा उपयोग करू शकतात. या पद्धतीने कर भरण्यासाठी कोणतेही व्यवहार शुल्क/फी लागू नाही. आतापर्यंत, कॅनरा बँक, ICICI बँक, इंडियन बँक, भारतीय स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकेची डेबिट कार्डे डेबिट कार्ड पद्धतीद्वारे ई-फाइलिंग पोर्टलवर ('कराचे ई-पेमेंट सेवा' द्वारे ) कर पेमेंट करण्याची सुविधा देत आहेत इतर बँकांसाठी, कृपया पेमेंट गेटवे पद्धत निवडा.
स्टेप 7: पूर्वावलोकन आणि पेमेंट करा पेजमध्ये, तपशील आणि कर विभाजन तपशीलाची पडताळणी करा आणि आता पैसे भरा वर क्लिक करा.
