1. अवलोकन
कर क्रेडिट विसंगती सेवा ई-फाइलिंग पोर्टलवर सर्व नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी (ERI सह) उपलब्ध आहे. या सेव्हेद्वारे, आपण कोणत्याही रेकॉर्डकरिता संबंधित निर्धारण वर्षासाठी आयकर विवरणपत्र अपलोड केल्यानंतर लगेचच आपल्या ई-फाइल आयकर परताव्याचे कर क्रेडिट विसंगती पाहू शकता.
ही सेवा, आपण आयकर विवरणपत्र भरताना, आपण नोंदविलेल्या स्त्रोतांवरील कर कपात, स्त्रोतांवरील जमा झालेला कर, आगाऊ कर किंवा नियमित निर्धारण कर रक्कमेतील कोणतीही विसंगती हायलाइट करते. जुळत नसल्यास, आपण आपल्यानुसार त्रुटी सुधारू शकता किंवा TDS परतावा/फॉर्म जसे 24Q, 26Q, 27Q, 27EQ यामध्ये दुरुस्ती करुन कर कपातकर्त्याद्वारे दुरुस्त करू शकता (एकतर सुधारण विनंती फाइल करून किंवा सुधारित परतावा फाइल करून).
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्वअट
- ई-फाइलिंग पोर्टलवर वैध वापरकर्ता ID आणि पासवर्ड असणारा नोंदणीकृत वापरकर्ता
- वैध आणि सक्रिय PAN
- त्या वर्षातील कर क्रेडिट विसंगती तपासण्यासाठी संबंधित निर्धारण वर्षाकरिता (AY) किमान एक आयकर विवरणपत्र फाइल केला जातो
- ई-फाइलिंग पोर्टलवर TDS आणि/किंवा TCS आणि/किंवा भरलेला आयकर हा फॉर्म 26AS मध्ये दिसून येतो.
- ERI साठी: ERI जोडले गेले असावेत आणि ERI ने करदात्याला क्लायंट म्हणून जोडले असावे
- ERI साठी: ERI ची स्थिती सक्रिय असावी
3. क्रमानुसार- मार्गदर्शक
3.1. कर क्रेडिट विसंगती पहा
स्टेप 1: आपला वापरकर्ता ID आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा.
स्टेप 2: आपल्या डॅशबोर्ड वर, सेवा > कर क्रेडिट विसंगती वर क्लिक करा.
स्टेप 3 : कर क्रेडिट विसंगती पेजवर, निर्धारण वर्ष निवडा (ज्यासाठी आपल्याला विसंगती तपशील पाहायच्या आहेत) आणि सबमिट करा वर क्लिक करा.
टीप: PAN पर्यायाच्या अंतर्गत आपला PAN आधीच भरलेला असेल.
स्टेप 4: आयकर परताव्यामध्ये आपण प्रदान केलेल्या TDS आणि/किंवा TCS आणि/किंवा आयकर भरलेले तपशील आणि फॉर्म 26AS मध्ये दिसणाऱ्या नोंदी यामध्ये विसंगती आहे.
टीप:
- 10 पेक्षा जास्त नोंदी विसंगत असतील, तर ते डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड करा वर क्लिक करा (PDF/XLS फॉरमॅटमध्ये).
- 10 किंवा त्यापेक्षा कमी नोंदी विसंगत असतील, तर आपण ते कर क्रेडिट विसंगती पेजवर पाहू शकता. डाउनलोड करा वर क्लिक करून आपण ते (PDF/XLS मध्ये) डाउनलोड देखील करू शकता.
3.2. कर क्रेडिट विसंगती पहा (ERI साठी)
स्टेप 1: आपला वापरकर्ता ID आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा.
स्टेप 2: आपल्या डॅशबोर्डवर, सेवा >कर क्रेडिट विसंगती वर क्लिक करा.
स्टेप 3: कर क्रेडिट विसंगती पेजवर, PAN प्रविष्ट करा (ज्याचे तपशील आपल्याला तपासायचे आहेत), निर्धारण वर्ष निवडा (ज्यासाठी आपल्याला विसंगतीचे तपशील पहायचे आहेत) आणि सबमिट करा वर क्लिक करा.
स्टेप 4: निवडलेल्या PAN साठी फाइल केलेल्या ITR मध्ये प्रदान केलेला TDS आणि/किंवा TCS आणि/किंवा आयकर भरलेल्याचे (TDS/TCS व्यतिरिक्त) तपशील आणि फॉर्म 26AS मध्ये दिसणाऱ्या नोंदी यांमध्ये विसंगती आहे.
टीप:
- 10 पेक्षा जास्त नोंदी विसंगत असतील, तर ते डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड करा वर क्लिक करा (PDF/XLS फॉरमॅटमध्ये)
- 10 किंवा त्यापेक्षा कमी नोंदी विसंगत असतील, तर आपण ते कर क्रेडिट विसंगती पेजवर पाहू शकता. डाउनलोड करा वर क्लिक करून आपण ते (PDF/XLS फॉरमॅटमध्ये) डाउनलोड देखील करू शकता.