Do not have an account?
Already have an account?

1. अवलोकन

दुरुस्ती विनंती सेवा यासाठी उपलब्ध आहे:

  • ई-फाइलिंग पोर्टलवरील नोंदणीकृत सर्व करदाता
  • नोंदणीकृत ERI वापरकर्ते / नोंदणीकृत अधिकृत स्वाक्षरी करणारे / नोंदणीकृत प्रतिनिधी निर्धारिती (करदात्याला त्याच्यासह संलग्न करायचे असेल तरच लागू होईल)

ई-फाइलिंग पोर्टलमध्ये लॉग इन केल्यानंतरच ही सेवा उपलब्ध आहे. CPC ने विवरणपत्रावर प्रक्रियेसंदर्भात पाठविलेल्या सूचनेत किंवा जारी केलेल्या आदेशात दस्तावेजातून ठळकपणे कोणतीही चूक दिसत असल्यास ती सुधारण्यास अनुमती देते

2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्वअट

  • ई-फाइलिंग पोर्टलवर वैध वापरकर्ता ID आणि पासवर्ड असणारा नोंदणीकृत वापरकर्ता
  • नोंदणीकृत करदात्यांसाठी (किंवा अधिकृत स्वाक्षरी करणारा / करदात्याच्या वतीने प्रतिनिधी निर्धारिती):
    • आयकर अधिनियम, 143 कलम 1 (1961) च्या अंतर्गत किंवा संपत्ती कर कायद्याच्या कलम 16 (1) च्या अंतर्गत CPC, बेंगलुरु कडून प्राप्त झालेली सुचना.
    • माझ्या ERI सेवा वापरून ERI जोडा (करदात्याला ERI याच्यासह संलग्न करायचे असेल तरच लागू होईल)
  • नोंदणीकृत ERI वापरकर्त्यासाठी:
    • ग्राहक सेवा वापरून करदात्याला ग्राहक म्हणून जोडा
    • ERI स्थिती सक्रिय आहे
  • नोंदणीकृत करदाते आणि नोंदणीकृत ERI दोन्ही वापरकरर्ते.
    • डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (DSC) पर्याय वापरण्यासाठी ई-फाइलिंगमध्ये वैध DSC नोंदवा (कालबाह्य नाही); किंवा
    • EVC जनरेट करा

3. क्रमानुसार- मार्गदर्शक

स्टेप1: आपला वैध वापरकर्ता ID आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा.

Data responsive


स्टेप2: सेवा >दुरुस्त करा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 3: दुरुस्ती पेज वर, नवीन विंनती करा यावर क्लिक करा.

Data responsive


स्टेप4a: नवीन विनंती पेजवर आपले PAN आपोआप भरले जाईल. आयकर किंवा संपत्ती कर निवडा.

Data responsive


स्टेप 4b: ड्रॉपडाउनमधून निर्धारण वर्ष निवडा. सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive


टीप:आपण संपत्ती कर पर्याय निवडल्यास, आपल्याला नवीनतम सूचना संदर्भ नंबर देखील प्रविष्ट करणे आवश्यक आहे आणि सुरू ठेवा यावर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 5: दुरुस्ती विनंत्यांचे खालील वर्गीकरण आहे:
 

आयकर दुरुस्ती

विवरणपत्रावर पुनर्प्रक्रिया करणे

विभाग5.1चा संदर्भ घ्या

कर क्रेडिट विसंगती सुधारणा

विभाग5.2चा संदर्भ घ्या

234C व्याजाकरीता अतिरिक्त माहिती

विभाग5.3चा संदर्भ घ्या

दुरूस्तीची स्थिती

विभाग5.4चा संदर्भ घ्या

सवलतीच्या कलमात दुरूस्ती

विभाग5.5चा संदर्भ घ्या

विवरणपत्रमाहिती दुरूस्ती (ऑफलाइन)

विभाग 5.6a चा संदर्भ घ्या

विवरणपत्र माहिती सुधारणा (ऑनलाइन)

विभाग 5.6b चा संदर्भ घ्या

संपत्ती कर दुरुस्ती

विवरणपत्रावर पुनर्प्रक्रिया करणे

विभाग5.7चा संदर्भ घ्या

कर क्रेडिट विसंगती सुधारणा

विभाग 5.8चा संदर्भ घ्या

विवरणपत्रडेटा सुधारणा (XML)

विभाग5.9चा संदर्भ घ्या


टीप: केवळ मूल्यांकन वर्ष 2014-15 आणि मूल्यांकन वर्ष 2015-16 साठी या सेवेचा वापर करून संपत्ती कर विवरणपत्रामध्ये दुरुस्ती फाइल केले जाऊ शकते.

आयकर दुरुस्ती विनंती

5.1 आयकर दुरुस्ती: विवरणपत्रावर पुन्हा प्रक्रिया करा

स्टेप1: विवरणावर पुन्हा प्रक्रिया करा असा विनंती प्रकार निवडा.

Data responsive


स्टेप 2: या पर्यायासह, तुम्हाला केवळ सुधारणा विनंती निवेदन करण्याची आवश्यकता आहे - विनंती सबमिट करण्यासाठी पुढे सुरु ठेवा वर क्लिक करा.

स्टेप 3: आपली विनंती सबमिट केल्यावर, आपल्याला ई-पडताळणी पेजवर नेले जाईल.

टीप: अधिक जाणून घेण्यासाठी ई-पडताळणी कशी करायची वापरकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.


5.2: आयकर दुरुस्ती: कर क्रेडिट विसंगती दुरुस्ती

स्टेप 1: कर क्रेडिट विसंगती दुरुस्ती म्हणून विनंती प्रकार निवडा.

Data responsive


स्टेप2: या विनंती प्रकारातील अनुसूची संंबंधित प्रक्रिया केलेल्या विवरणपत्रामधील उपलब्ध नोंदींच्या आधारे स्वयंचलितपणे भरले जातात. आपल्याला अनुसूची संपादित करायची किंवा हटवायचे असल्यास, अनुसूची निवडा, नंतर संपादित करा किंवा हटवा यावर क्लिक करा.

Data responsive


स्टेप3 : खालील अनुसूचीमध्ये तपशील प्रविष्ट करा: पगारावर स्रोतावर वजा केलेला कर (TDS) याचे तपशील, पगार तपशील सोडून इतर स्रोतावर वजा केलेला कर (TDS) याचे तपशील, स्थावर मालमत्ता/भाडे यावरील स्रोतावर वजा केलेला कर (TDS), स्रोतावर जमा केलेला कर (TCS), अग्रिम कर किंवा स्व निर्धारण कर याचे तपशील. मसुदा म्हणून सेव्ह करा यावर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 4: विनंती सबमिट करण्यासाठी सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप5: सबमिट केल्यावर, आपल्याला ई- पडताळणी पेजवर नेले जाईल.

टीप: अधिक जाणून घेण्यासाठी ई-पडताळणी कशी करायची वापरकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.


5.3 आयकर दुरुस्ती: 234C व्याजासाठी अतिरिक्त माहिती सूचना

स्टेप 1: 234C व्याजासाठी अतिरिक्त माहिती म्हणून विनंती प्रकार निवडा.

Data responsive


स्टेप 2: यापैकी कोणत्याही रेकॉर्डवरील तपशील जोडा वर क्लिक करा,आपल्याला लागू असेल तसे :

  • PGBP कडून उत्पन्न जमा होणे किंवा वाढवणे, प्रथम वेळी (2016-17 पासून पुढे लागू)
  • 2(24) (ix) करपात्र कलम 115B अंतर्गत नमूद केलेले विशेष उत्पन्न
  • कलम 115BBDA मध्ये संदर्भित उत्पन्न (2017-18 पासून पुढे लागू)
Data responsive


स्टेप3: आपल्याला पूर्ण केलेले दस्तावेज संपदित करणे किंवा हटवणे आवश्यकता असल्यास, संपादित करा किंवा हटवा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 4: आपली विनंती सबमिट करण्यासाठीसुरू ठेवा यावर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 5: आपली विनंती सबमिट केल्यावर, आपल्याला ई-पडताळणी पेजवर नेले जाईल.

टीप: अधिक जाणून घेण्यासाठी ई-पडताळणी कशी करायची वापरकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.

5.4 आयकर दुरुस्ती विनंती: स्थिती सुधारणा

स्टेप1: स्थिती सुधारणा असा विनंती प्रकार निवडा.

Data responsive


टीप: स्थिती सुधारणा केवळ ITR-5 आणि ITR-7 साठी मुल्यांकन वर्ष 2018-19 पर्यंत लागू आहे.

चरण 2: यादीतून तुम्हाला लागू असलेली स्थिती निवडा:

  • खाजगी विवेकपूर्ण न्यास
  • सोसायटी नोंदणी अधिनियम 1860 किंवा राज्याच्या संबंधित कायद्यानुसार नोंदणीकृत सोसायटी
  • मृत व्यक्तीची मालमत्ता
  • इतर कोणताही न्यास किंवा संस्था
  • प्राथमिक कृषी पत संस्था/प्राथमिक सहकारी कृषी बँक
  • ग्रामीण विकास बँक
  • इतर सहकारी बँक
Data responsive


स्टेप 3: तपशील जोडा पेजवर, होय/नाही पर्याय निवडून सूचीबद्ध केलेल्या अतिरिक्त प्रश्नांची उत्तरे द्या. सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive


आपण निवडलेल्या स्थिती सुधारणेसाठी आपण सहाय्यक दस्तऐवज अपलोड करणे आवश्यक असू शकते. तपशील जोडा पेजवर, संलग्न करा वर क्लिक करा, आणि आवश्यक दस्तऐवज अपलोड करा, जे PDF स्वरूपात असायला हवे. सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive


टीप:

  • एका संलग्नकाचा आकार 5 MB इतका असावा.
  • जर आपल्याकडे अपलोड करण्यासाठी अनेक कागदपत्रे असतील, तर त्यांना झिप फोल्डरमध्ये एकत्र ठेवा आणि फोल्डर अपलोड करा. झिप फोल्डरमधील सर्व संलग्नकांचा जास्तीत जास्त आकार 50 एम.बी. असावा.

स्टेप 4: आपली विनंती सबमिट केल्यावर, आपल्याला ई-पडताळणी पेजवर नेले जाईल.

टीप: अधिक जाणून घेण्यासाठी ई-पडताळणी कशी करावी वापरकर्ता मॅन्युअलचा संदर्भ घ्या.

5.5आयकर दुरुस्ती: सूट विभाग सुधारणा

स्टेप1: सूट विभाग सुधारणा असा विनंती प्रकार निवडा.

Data responsive


टीप: सूट विभाग सुधारणा तपशील केवळ ITR-7साठी मुल्यांकन वर्ष 2013-14 ते मुल्यांकन वर्ष 2018-19 लागू आहे.


स्टेप2: तपशील जोडा पेजवरील पुढील सर्व फील्डमध्ये आपले तपशील प्रविष्ट करा: प्रकल्प/संस्थेचे नाव, मान्यता/सूचना/नोंदणी क्रमांक, मंजुरी/नोंदणी करणारे प्राधिकरण आणि विभाग ज्या अंतर्गत संस्थेने सूट मिळण्याचा दावा केला आहे. PDF स्वरूपात आवश्यक सहाय्यक दस्तऐवज अपलोड करण्यासाठी संलग्न करा यावर क्लिक करा विनंती सबमिट करण्यासाठी पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा

Data responsive


टीप: एका संलग्नकाचा कमाल आकार ही 5 MB इतका असावा.

स्टेप 3: आपली विनंती सबमिट केल्यानंतर, आपल्याला ई-पडताळणी पेजवर नेले जाईल.

टीप: अधिक जाणून घेण्यासाठी ई-पडताळणी कशी करायची वापरकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.


5.6a आयकर दुरुस्ती: विवरण डेटा सुधारणा (ऑफलाइन)

स्टेप 1: विनंती प्रकार म्हणून विवरणपत्रडेटा सुधारणा (ऑफलाइन)निवडा.

Data responsive


स्टेप 2: लागू होणारी दुरुस्ती कारणे निवडा - लागू असल्यास, आपण प्रत्येक श्रेणी अंतर्गत अनेक कारणे निवडू शकता. त्या पुढे, सुरू ठेवा यावर क्लिक करा

Data responsive


स्टेप 3: बदलण्याची आवश्यकता असलेले अनुसूची निवडा, नंतर सुरू ठेवा यावर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 4: संलग्न करा यावर क्लिक करा आणि ITR ऑफलाइन उपयुक्ततेमधून जनरेट केलेली दुरुस्त XML / JSON अपलोड करा.

Data responsive


टीप: एका संलग्नकाचा कमाल आकार ही 5 MB इतका असावा.

स्टेप 5: लागू असल्यास, देणगी आणि भांडवली नफ्याचे तपशील प्रविष्ट करा.

Data responsive


स्टेप 6:विनंती सबमिट करण्यासाठी सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 7: सबमिट केल्यावर,आपल्याला ई-पडताळणी पेजवर नेले जाईल.

टीप: अधिक जाणून घेण्यासाठी ई-पडताळणी कशी करावी ते वापरकर्ता मॅन्युअल पहा.


स्टेप 5.6b आयकर दुरुस्ती: विवरणपत्रडेटा सुधारणा (ऑनलाइन)

स्टेप 1: विवरणपत्रडेटा सुधारणा (ऑनलाइन) म्हणून विनंती प्रकार निवडा.

Data responsive


स्टेप 2: दुरुस्तीची कारणे निवडा - लागू असल्यास, आपण प्रत्येक श्रेणी अंतर्गत अनेक कारणे निवडू शकता. त्या पुढे, सुरू ठेवा यावर क्लिक करा

Data responsive


स्टेप 3: त्यांच्या अंतर्गत तपशील दुरुस्त करण्यासाठी लागू असलेल्या वेळापत्रकावरील तपशील जोडा क्लिक करा.

Data responsive


स्टेप 4:आपण सर्व अनुसूची अपडेट करणे पूर्ण केल्यावर, सुरू ठेवा यावर क्लिक करा .

Data responsive


स्टेप5: सबमिट केल्यावर, आपल्याला ई- पडताळणी पेजवर नेले जाईल.

टीप: अधिक जाणून घेण्यासाठी ई-पडताळणी कशी करावी या वापरकर्ता मॅन्युअलचा संदर्भ घ्या.

 

संपत्ती कर दुरुस्ती विनंती


5.7 संपत्ती कर दुरुस्ती: विवरणपत्रावर पुन्हा प्रक्रिया करा

स्टेप1: विवरणावर पुन्हा प्रक्रिया करा असा विनंती प्रकार निवडा.

Data responsive


टीप: ही विनंती केवळ मूल्यांकन वर्ष 2014-15 आणि 2015-16 साठी उपलब्ध आहे, कारण 2016-17च्या केंद्रीय अर्थसंकल्पात संपत्ती कर रद्द करण्यात आला होता.

स्टेप 2: कर / व्याज गणनानिवडा आणि सबमिट करा क्लिक करा.

Data responsive


स्टेप 3: सबमिट केल्यावर, आपल्याला ई-पडताळणी पेजवर वर नेले जाईल.

टीप: अधिक जाणून घेण्यासाठी ई-पडताळणी कशी करावी या वापरकर्ता मॅन्युअलचा संदर्भ घ्या.


5.8 संपत्ती कर दुरुस्ती: कर क्रेडिट विसंगती सुधारणा

स्टेप 1:
कर क्रेडिट विसंगती दुरुस्ती विनंती प्रकार म्हणून निवडा.

Data responsive


स्टेप2: आपल्या प्रक्रिया केलेल्या विवरणाचे तपशील संपादन आणि दुरुस्तीसाठी प्रदर्शित केले जातील. आपल्याला नोंद संपादित करायची किंवा हटवायची असल्यास, संपादित करा किंवा हटवा यावर क्लिक करा. जर आपली नोंद अपूर्ण असल्यास, तपशील जोडा यावर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 3:विनंती सबमिट करण्यासाठी सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 4: सबमिट केल्यावर, आपल्याला ई-.पडताळणी पेज वर नेले जाईल.

टीप: अधिक जाणून घेण्यासाठी ई-पडताळणी कशी करावी या वापरकर्ता मॅन्युअलचा संदर्भ घ्या.

 

5.9 संपत्ती कर दुरुस्ती: विवरणपत्र डेटा सुधारणा (XML)

स्टेप 1: विवरणपत्र डेटा सुधारणा(XML)विनंती प्रकार म्हणून निवडा.

Data responsive


स्टेप 2: टेक्स्टबॉक्समध्ये दुरुस्तीचे कारण प्रविष्ट करा, आणि ITR ऑफलाइन उपयोगितेमधून जनरेट केलेले दुरुस्त केलेले XML अपलोड करण्यासाठी संलग्न करा वर क्लिक करा. त्यानंतर, सबमिट कराक्लिक करा.

Data responsive

टीप: एका संलग्नकाचा कमाल आकार 5MB असावा.


स्टेप 4: सबमिट केल्यावर, आपल्याला ई-.पडताळणी पेज वर नेले जाईल.

टीप: अधिक जाणून घेण्यासाठी ई-पडताळणी कशी करावी या वापरकर्ता मॅन्युअलचा संदर्भ घ्या.


यशस्वी पडताळणीनंतर, आपली विनंती सबमिट केली जाईल. यशस्वी संदेश प्रदर्शित केला जाईल. आपल्याला आपल्या ई-मेल ID आणि ई-फाइलिंग पोर्टलसह नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक पुष्टीकरण संदेश देखील प्राप्त होईल.

Data responsive

4. संबंधित विषय