1. अवलोकन
आयकर कायदा, 1961 च्या कलम 195 आणि आयकर नियम, 1962 च्या नियम 37BB अनुसार, कंपनी किंवा परदेशी कंपनी नसलेल्या अनिवासी व्यक्तीला पेमेंट करणाऱ्या प्रत्येक अधिकृत डीलरने अशा पेमेंटच्या विवरणपत्रासह फॉर्म 15CC सबमिट करणे आवश्यक आहे.
आर्थिक वर्षाच्या तिमाहीच्या समाप्तीपासून पंधरा दिवसांच्या आत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आयकर विभागाच्या सक्षम अधिकार्याकडे अशा प्रकारची संबंधित विधाने सादर करणे आवश्यक आहे.
फॉर्म 15CC केवळ ऑनलाइन पध्दतीने फाइल केला जाऊ शकतो.
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्वअट
| वापरकर्ता | पूर्वावश्यकता |
| अहवाल देणारी संस्था |
|
| अधिकृत व्यक्ती |
|
3. फॉर्मबद्दल
3.1. हेतू
नियम 37BB अनुसार अधिकृत विक्रेत्यांनी फॉर्म 15CC मधील आर्थिक वर्षाच्या प्रत्येक तिमाहीसाठी पाठवलेल्या रकमेचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
15CC फॉर्म फाइल करण्यापूर्वी, अहवाल देणाऱ्या संस्थेने ई-फाइलिंग पोर्टलवर ITDREIN (आयकर विभागाद्वारे फॉर्म 15CC आणि फॉर्म V सबमिट करण्यासाठी जारी केलेला युनिक ID) जनरेट केला पाहिजे. ITDREIN यशस्वीपणे जनरेट केल्यानंतर, या ITDREIN संदर्भात फॉर्म 15CC फाइल करण्यासाठी अहवाल देणाऱ्या संस्थेने अधिकृत व्यक्ती सामील करणे गरजेचे आहे.
3.2. कोण याचा वापर करू शकतो?
ITDREIN क्रमांक जनरेट केल्यानंतर अहवाल देणाऱ्या संस्थेद्वारे जोडलेले अधिकृत व्यक्ती.
4. एका दृष्टीक्षेपात फॉर्म
फॉर्म 15CC याचे तीन विभाग आहेत:
- अधिकृत विक्रेते तपशील
- रेमिटन्सचे तपशील
- पडताळणी
4.1. अधिकृत विक्रेत्याचे तपशील
पहिल्या विभागात अधिकृत विक्रेत्याचे तपशील असतात.
4.2. रेमिटन्सचे तपशील
पुढील विभागात कंपनी किंवा परदेशी कंपनी नसलेल्या अनिवासी व्यक्तीला रेमिटन्स रकमेचे तपशील आहे.या विभागामध्ये आपण रेमिटर, रेमिटी आणि ज्या स्थानावर रेमिटन्स केले गेले आहेत त्याचे तपशील जोडू शकता.
टेम्पलेट (एकाच पेजवर उपलब्ध) वापरून अनेक रेमिटन्सचे तपशील अपलोड करण्यासाठी आपण .csv फाइल वापरू शकता. रिक्त टेम्पलेट डाउनलोड करण्यासाठी CSV टेम्पलेट डाउनलोड करा वर क्लिक करा. CSV फाइल अपडेट केल्यानंतर, तपशील अपलोड करण्यासाठी CSV फाइल संलग्न करा क्लिक करा. अधिक माहितीसाठी कृपया csv टेम्पलेट भरण्यासाठी सूचना डाउनलोड करा.
4.3. पडताळणी
अंतिम विभागामध्ये फॉर्म 15CC साठी स्व-घोषणा फॉर्म आहे.
5. ॲक्सेस आणि सबमिट कसे करावे
आपण खालील पद्धतींद्वारे फॉर्म 15CC भरू आणि सबमिट करू शकता:
- ऑनलाइन पद्धत - ई-फाइलिंग पोर्टलद्वारे
ऑनलाइन पद्धतीद्वारे फॉर्म 15CC भरण्यासाठी आणि सबमिट करण्यासाठी खालील स्टेप्सचे पालन करा.
5.1. फॉर्म 15CC (ऑफलाइन पद्धत) सबमिट करणे
स्टेप 1: ITDREIN, आपला वापरकर्ता आयडी (PAN) आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा.
स्टेप 2: आपल्या डॅशबोर्ड वर,ई-फाइल > आयकर फॉर्म्स > आयकर फॉर्म्स फाइल करा वर क्लिक करा.
स्टेप 3: आयकर फॉर्म्स फाइल करा पेजवर, फॉर्म 15CC फाइल करानिवडा.तसेच, फॉर्म शोधण्यासाठी सर्च बॉक्समध्ये फॉर्म 15CC प्रविष्ट करा.
स्टेप 4: फॉर्म 15CC पेजवर, फाइलिंग प्रकार, आर्थिक वर्ष (F.Y.) आणि तिमाही निवडा. पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 5: सूचना पेजवर, चला, सुरुवात करा वर क्लिक करा.
स्टेप 6: चला, सुरुवात करा वर क्लिक केल्यानंतर, फॉर्म 15CC प्रदर्शित होतो. सर्व आवश्यक तपशील भरा आणि पूर्वावलोकन करा वर क्लिक करा.
स्टेप 7: पुर्वावलोकन पेजवर, तपशीलांची पडताळणी करा आणि ई-पडताळणी कराण्यासाठी पुढे जा यावर क्लिक करा.
स्टेप 8: सबमिट करण्यासाठी होय वर क्लिक करा.
स्टेप 9: होय वर क्लिक केल्यानंतर, आपल्याला ई-पडताळणी पेजवर नेले जाईल जिथे आपण डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र वापरून पडताळणी करू शकता.
नोंद: अधिक जाणून घेण्यासाठी ई-पडताळणी कशी करावी या उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या
यशस्वी ई-पडताळणीनंतर, व्यवहार ID आणि पोचपावती क्रमांकासह एक यशस्वी झाल्याचा संदेश प्रदर्शित केला जातो. कृपया भविष्यातील संदर्भासाठी व्यवहार ID आणि पोचपावती क्रमांकाची नोंद ठेवा. आपल्याला (आणि अहवाल देणाऱ्या संस्थेला) ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरवर एक पुष्टीकरण संदेश देखील प्राप्त होईल.