Do not have an account?
Already have an account?

1. चलान सुधारणा म्हणजे काय?

आयकरामधील चलान सुधारणा म्हणजे चलान वापरून कर भरताना झालेल्या चुका सुधारण्याची प्रक्रिया होय.

2. चलान (100, 300, 400) संदर्भात ऑनलाइन सुधारणा करण्यासाठी कोणते तपशील उपलब्ध आहेत?

खालील तपशीलांसाठी चलान सुधारणा विनंत्या ई-फायलिंग पोर्टलवर सबमिट केल्या जाऊ शकतात:
•    कर आकारणी वर्ष (निर्धारण वर्ष / कर वर्ष)
•    मुख्य शीर्ष
•    लघू शीर्ष
 

3. ई-फायलिंग पोर्टलद्वारे ऑनलाइन कोणत्या प्रकारच्या सुधारणा करता येतात?

ई-फायलिंग पोर्टलवर केवळ पॅन लॉगिनद्वारेच चलान सुधारणा करण्यास परवानगी आहे. पॅन लॉगिन वापरून, केवळ खालील लघू शीर्षांसाठीच चलान सुधारणा करण्यास परवानगी आहे:
•    100 – अग्रिम कर
•    300 – स्वयं निर्धारण कर
•    400 – नियमित निर्धारण कराची मागणी
आणि त्यांची संबंधित मुख्य शीर्षे.

4. मला चलान सुधारणा विनंती सुविधा कुठे ॲक्सेस करता येईल?

चलान सुधारणा सुविधा केवळ ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन केल्यानंतरच उपलब्ध आहे.
मार्ग: लॉगिन → सेवा → चलान सुधारणा

5. जे चलान ऑनलाइन उपलब्ध नाहीत (म्हणजेच, लघू शीर्ष 100/300/400 व्यतिरिक्त इतर चलान) त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी वापरकर्ता कुठे विनंती करू शकतो/शकते?

लघू शीर्ष 100, 300 आणि 400 व्यतिरिक्त इतर चलानांमध्ये सुधारणा करण्यासाठी, वापरकर्त्याने त्यांच्या अधिकारक्षेत्रीय निर्धारण अधिकाऱ्याशी (JAO) संपर्क साधणे आवश्यक आहे.

6. सुधारणा विनंती फाइल करण्याची कालमर्यादा काय आहे?

•    निर्धारण वर्ष / कर वर्षातील बदलांसाठी: चलान जमा केल्याच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत.
•    इतर सर्व सुधारणांसाठी: चलान जमा केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत

7. ई-फायलिंग पोर्टलवर चलान सुधारणा सुविधा कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आली आहे, कृपया ते वर्ष नमूद करा.

ई-फायलिंग पोर्टलवर केवळ निर्धारण वर्ष 2020–21 आणि त्यानंतरच्या चलानांमध्ये सुधारणा करता येते.
निर्धारण वर्ष 2019–20 किंवा त्यापूर्वीच्या चलानांसाठी ऑनलाइन सुधारणा सुविधा उपलब्ध नाही. अशा प्रकरणांसाठी, वापरकर्त्यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रीय निर्धारण अधिकाऱ्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

8. सुधारणा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, मी सुधारित चलान कुठे डाउनलोड करू शकतो/शकते?

खालील मार्गाचा वापर करून तुम्ही सुधारित चलान तपशील डाउनलोड करू शकता:
मार्ग: लॉगिन केल्यानंतर → सेवा → चलान सुधारणा → सुधारित तपशील डाउनलोड करा

9. जर वापरकर्त्याने JAO कडे ऑफलाइन पद्धतीने काही सुधारणा केली असेल, तर सुधारित चलान ई-फायलिंग पोर्टलवर अपडेट केले जाईल का?

नाही. केवळ ई-फायलिंग पोर्टलद्वारे सबमिट केलेल्या चलान सुधारणाच ऑनलाइन दिसतात आणि त्यांचा मागोवा घेता येतो.
JAO द्वारे ऑफलाइन पद्धतीने प्रक्रिया केलेल्या सुधारणा पोर्टलवर दर्शविल्या जात नाहीत.
मंजूर करण्यात आलेल्या सुधारणा ई-फायलिंग पोर्टलवर उपलब्ध असलेल्या फॉर्म 26AS किंवा AIS द्वारे पडताळल्या जाऊ शकतात.
 

10. चलान वापरले गेल्यानंतर ई-फायलिंग पोर्टलवर चलान सुधारणा विनंती सुरू करता येते का?

नाही. चलान सुधारणा केवळ न वापरलेल्या चलानांसाठीच अनुमत आहे. एकदा चलान वापरले गेले की, ते अंतिम मानले जाते आणि त्यात सुधारणा करता येत नाही.

11. सुधारित चलान मूळ चलानाच्या पेमेंट हिस्ट्रीमध्ये अपडेट केले जाईल का?

नाही. सुधारित चलान पेमेंट हिस्ट्री टॅबमध्ये दिसत नाही.
खालील मार्गाचा अवलंब करून सुधारित तपशील पाहता येतील:
मार्ग: लॉगिन केल्यानंतर → सेवा → चलान सुधारणा → सुधारित तपशील डाउनलोड करा
 

12. चलान सुधारणा विनंती सबमिट केल्यानंतर मला त्यात बदल करता येईल का?

नाही. एकदा सबमिट केल्यानंतर, चलान सुधारणा विनंतीमध्ये बदल करता येत नाही.
जर विनंतीवर प्रक्रिया झालेली नसेल आणि ती नाकारली गेली असेल, तर वापरकर्ता नवीन विनंती सबमिट करू शकतो/शकते.

13. माझी चलान सुधारणा विनंती नाकारली गेल्यास काय होईल?

विनंती नाकारली गेल्यास, वापरकर्ता नवीन सुधारणा विनंती सबमिट करू शकतो/शकते, जर:
•    चलान अद्याप वापरले गेले नसेल आणि
•    सुधारणा विनंती विहित वेळेच्या मर्यादेत असेल.

14. मी चलान सुधारणा विनंती मागे घेऊ किंवा रद्द करू शकतो/शकते का?

नाही. चलान सुधारणा विनंती एकदा सबमिट केल्यानंतर ती मागे घेता किंवा रद्द करता येत नाही.

15. माझ्या सुधारणा विनंतीची स्थिती बराच काळ “प्रलंबित” दिसत असल्यास मी काय करावे?

वापरकर्ते सेवा → चलान सुधारणा अंतर्गत स्थिती तपासू शकतात.
जर स्थिती वाजवी वेळेनंतरही प्रलंबित राहिली, तर वापरकर्ते:
•    ई-फायलिंग पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतात किंवा
•    त्यांच्या अधिकारक्षेत्रीय निर्धारण अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकतात.
 

16. एकाच चलानामध्ये अनेक वेळा सुधारणा केली जाऊ शकते का?

होय. जोपर्यंत चलान वापरले जात नाही आणि विनंत्या विहित वेळेच्या मर्यादेमध्ये केल्या जातात, तोपर्यंत चलानामध्ये अनेक वेळा सुधारणा केल्या जाऊ शकतात.

17. चलानामध्ये नाव, पॅन किंवा TAN मध्ये ऑनलाइन सुधारणा करता येईल का?

नाही. ई-फायलिंग पोर्टलद्वारे नाव, पॅन आणि TAN मध्ये सुधारणा करता येत नाही.
अशा सुधारणांसाठी, वापरकर्त्यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रीय निर्धारण अधिकाऱ्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
 

18. TDS/TCS चलानांसाठी चलान सुधारणा सुविधा उपलब्ध आहे का?

नाही. ई-फायलिंग पोर्टलवरील चलान सुधारणा सुविधा केवळ लघू शीर्ष 100, 300 आणि 400 अंतर्गत कर भरणा करण्यासाठीच उपलब्ध आहे.
TDS/TCS चलानांमध्ये सुधारणा ट्रेसेस पोर्टलद्वारे किंवा निर्धारण अधिकाऱ्याशी संपर्क साधून करणे आवश्यक आहे.

19. चलान सुधारणा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मला कोणतेही पुष्टीकरण मिळेल का?

होय. चलान सुधारणा विनंती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वापरकर्त्यांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवर ईमेल आणि एसएमएस सूचना प्राप्त होतात.