Do not have an account?
Already have an account?

निर्धारण वर्ष 2025-26 साठी अनिवासी व्यक्ती

 

अस्वीकरण: या पेजवरील कंटेंट केवळ अवलोकन म्हणून आणि सामान्य मार्गदर्शनासाठी आहे आणि तो परिपूर्ण नाही.

संपूर्ण तपशील आणि मार्गदर्शक तत्त्वांसाठी, कृपया आयकर कायदा,1961 चा संदर्भ घ्या.

 

अनिवासी व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती जी कराच्या हेतूने भारताची रहिवासी नाही. एखादी व्यक्ती अनिवासी आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी, तिची निवासी स्थिती आयकर कायदा,1961 च्या कलम 6 अंतर्गत खालीलप्रमाणे निर्धारित करणे आवश्यक आहे:

एखाद्या व्यक्तीला भारतातील रहिवासी म्हणून मानले जाईल जर कोणत्याही मागील वर्षात तो / ती खालीलपैकी कोणतीही अट पूर्ण करत असेल:

  1. जर तो / ती मागील वर्षात 182 दिवस किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी भारतात असेल, किंवा
  2. जर तो / ती मागील वर्षात 60 दिवस किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी भारतात असेल आणि मागील वर्षापूर्वीच्या 4 वर्षांसाठी 365 दिवस किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी भारतात असेल.

जी व्यक्ती वर नमूद केलेल्या दोन्ही अटी पूर्ण करत नाही तिला त्या मागील वर्षात अनिवासी मानले जाईल.

तथापि, वर्षभरात भारताला भेट देणाऱ्या भारतीय नागरिकाच्या आणि भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या संदर्भात, वर (2) मध्ये नमूद केलेला 60 दिवसांचा कालावधी 182 दिवसांनी प्रतिस्थापित केला जाईल. अशीच सवलत त्या भारतीय नागरिकाला दिली जाते जो कोणत्याही मागील वर्षात चालक दल सदस्य म्हणून किंवा भारताबाहेर रोजगाराच्या हेतूने भारत सोडतो.

निर्धारण वर्ष 2021-22 पासून लागू झालेल्या वित्त कायदा, 2020, ने वरील अपवादात सुधारणा केली आहे की, वर (2) मध्ये नमूद केलेला 60 दिवसांचा कालावधी 120 दिवसांनी प्रतिस्थापित केला जाईल, जर एखाद्या भारतीय नागरिकाचे किंवा भारतीय वंशाच्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न, परदेशी स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त, मागील वर्षात ₹ 15 लाखांपेक्षा जास्त असेल.

वित्त कायदा, 2020 ने नवीन कलम 6(1A) देखील सादर केले आहे जे निर्धारण वर्ष 2021-22 पासून लागू आहे. ते हे प्रदान करते की ₹ 15 लाखांपेक्षा जास्त एकूण उत्पन्न (परदेशी स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त) मिळवणाऱ्या भारतीय नागरिकाला भारतातील रहिवासी मानले जाईल जर तो / ती कोणत्याही देशात कर भरण्यास पात्र नसेल.

 

1. ITR-2 अनिवासी व्यक्तीस लागू

हे विवरणपत्र व्यक्ती (रहिवासी किंवा अनिवासी) आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) यांना लागू आहे.

व्यापार किंवा व्यवसायातील नफा आणि मिळकत/लाभांक यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही शीर्षकाखाली उत्पन्न असणे.

 

 

2. ITR-3 अनिवासी व्यक्तीस लागू

हे विवरणपत्र व्यक्ती (रहिवासी किंवा अनिवासी) आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) यांना लागू आहे:

पगार/पेन्शन, घर मालमत्ता, व्यापार किंवा व्यवसायातील नफा किंवा लाभ, भांडवली नफा किंवा इतर स्रोतांमधील उत्पन्न या शीर्षकांखाली उत्पन्न असणे.

अशी व्यक्ती जी ITR-1, 2 किंवा 4 फाइल करण्यासाठी पात्र नाही   

आयकर कायदा,1961 नुसार लागू होणारे फॉर्म्स

खालील फॉर्म्स अनिवासी व्यक्तीसाठी लागू आहेत :

1. फॉर्म 12BB - कर कपातीसाठी कर्मचाऱ्याच्या दाव्यांचे तपशील (आयकर कायदा,1961 च्या कलम 192 अंतर्गत)

प्रदाता

फॉर्ममध्ये दिलेले तपशील

एका कर्मचाऱ्याकडून त्याच्या नियोक्त्याला / नियोक्त्यांना

HRA, LTC, उधार घेतलेल्या भांडवलावरील व्याजाची कपात, TDS मोजण्याच्या हेतूने कर बचत दावे / कपातींचे पुरावे किंवा तपशील

 

 

 

2. फॉर्म 16 - पगारावर स्रोतावर कपात केलेल्या कराचे तपशील (आयकर कायदा, 1961 च्या कलम 203 अंतर्गत प्रमाणपत्र)

प्रदाता

फॉर्ममध्ये दिलेले तपशील

नियोक्त्याकडून कर्मचाऱ्याला

देण्यायोग्य कर / परतावा करण्यायोग्य कर मोजण्याच्या हेतूने दिलेला पगार, कपाती / सूट आणि स्त्रोतावर केलेली कर कपात

 

 

 

3. फॉर्म 16A – पगाराव्यतिरिक्त उत्पन्नावरील TDS करासाठी आयकर कायदा,1961 च्या कलम 203 अंतर्गत प्रमाणपत्र

प्रदाता

फॉर्ममध्ये दिलेले तपशील

वजावट करणारा ते वजावट मिळवणारा

फॉर्म 16A हे स्रोतावर कपात केलेला कर (TDS) याचे त्रैमासिक जारी केले जाणारे प्रमाणपत्र आहे जे TDS ची रक्कम, पेमेंटचा प्रकार आणि आयकर विभागाकडे जमा केलेला TDS दर्शवते.

 

 

 

4. फॉर्म 26 AS आणि AIS

फॉर्म 26 AS

AIS (वार्षिक माहिती विवरण)

प्रदाता:

 

आयकर विभाग (हे ई-फाइलिंग पोर्टलवर उपलब्ध आहे:

लॉग इन > ई-फाइल > आयकर विवरणपत्र > फॉर्म 26AS पहा

प्रदाता:

 

आयकर विभाग (आयकर ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर ते उपलब्ध होऊ शकते)

ई-फाइलिंग पोर्टल > लॉग इन > AIS वर जा

फॉर्ममध्ये दिलेले तपशील:

 

स्रोतावर कपात केलेला / संकलित केलेला कर.

फॉर्ममध्ये दिलेले तपशील:

 

  • स्रोतावर कपात केलेला / संकलित केलेला कर
  • SFT माहिती
  • कर भरणा
  • मागणी / परतावा

इतर माहिती (जसे की प्रलंबित/पूर्ण झालेली कार्यवाही, GST माहिती, परदेशी सरकारकडून प्राप्त माहिती इ.)

 

 

5. फॉर्म 10E - पगार थकबाकीत किंवा आगाऊ अदा केल्यावर आयकर कायदा,1961 च्या कलम 89(1) अंतर्गत सवलत मागण्यासाठी उत्पन्नाचे तपशील सादर करण्याचा फॉर्म

प्रदाता

फॉर्ममध्ये दिलेले तपशील

करदात्याकडून आयकर विभागाला

  • थकबाकी / आगाऊ पगार
  • उपदान
  • सेवा समाप्तीवरील भरपाई
  • निवृत्तीवेतन बदल

 

 

 

6. फॉर्म 3CB-3CD 

सादरकर्ता

फॉर्ममध्ये दिलेले तपशील

करदाता ज्याने आयकर कायदा,1961 च्या कलम 44AB अंतर्गत लेखापालाकडून आपल्या खात्यांचे लेखापरीक्षण करवून घेणे आवश्यक आहे.

 

आयकर कायदा,1961 च्या कलम 139 च्या उप-कलम (1) अंतर्गत उत्पन्नाचे विवरणपत्र सादर करण्याच्या देय तारखेच्या एक महिना आधी सादर करायचे आहे

आयकर कायदा,1961 च्या कलम 44AB अंतर्गत सादर करावयाचा खात्यांच्या लेखापरीक्षणाचा अहवाल आणि तपशीलांचे विवरण

 

 

 

 7. फॉर्म 3CEB

सादरकर्ता

फॉर्ममध्ये दिलेले तपशील

करदाता ज्याने आंतरराष्ट्रीय व्यवहार किंवा निर्दिष्ट देशांतर्गत व्यवहारात प्रवेश करण्यासाठी (आयकर कायदा,1961) च्या कलम 92E अंतर्गत लेखापालाकडून अहवाल प्राप्त करणे आवश्यक आहे.

 

आयकर कायदा,1961 च्या कलम 139 च्या उप-कलम (1) अंतर्गत उत्पन्नाचे विवरणपत्र सादर करण्याच्या देय तारखेच्या एक महिना आधी सादर करायचे आहे.

आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि निर्दिष्ट देशांतर्गत व्यवहारांशी संबंधित लेखापालाचा अहवाल

 

 8. फॉर्म 3CE

सादरकर्ता

फॉर्ममध्ये दिलेले तपशील

असा करदाता ज्यास निर्दिष्ट व्यक्तींकडून निर्दिष्ट उत्पन्न प्राप्त करण्यासाठी (आयकर कायदा,1961) च्या कलम 44DA अंतर्गत लेखापालाकडून अहवाल प्राप्त करणे आवश्यक आहे.

 

आयकर कायदा,1961 च्या कलम 139 च्या उप-कलम (1) अंतर्गत उत्पन्नाचे विवरणपत्र सादर करण्याच्या देय तारखेच्या एक महिना अगोदर सादर करणे आवश्यक आहे.

सरकारकडून किंवा भारतीय उद्योगाकडून रॉयल्टी किंवा तांत्रिक सेवांसाठी शुल्काच्या स्वरूपात उत्पन्न प्राप्तीशी संबंधित लेखापालाचा अहवाल.

कर निर्धारण वर्ष 2026-27 साठी कर स्लॅब्ज

 

  • वित्त कायदा 2023 ने निर्धारण वर्ष 2024-25 पासून कलम 115BAC च्या तरतुदींमध्ये सुधारणा केली आहे जेणेकरून व्यक्ती, HUF, AOP (सहकारी संस्था नसलेल्या), BOI किंवा कृत्रिम न्यायालयीन व्यक्ती असलेल्या निर्धारितींसाठी नवीन कर व्यवस्था ही डिफॉल्ट कर व्यवस्था बनेल. तथापि, पात्र करदात्यांना डिफॉल्ट कर व्यवस्थेतून निवड रद्द करण्याचा आणि जुन्या कर व्यवस्थेअंतर्गत करआकारणी निवडण्याचा पर्याय आहे. जुनी कर व्यवस्था म्हणजे नवीन कर व्यवस्था लागू होण्यापूर्वी अस्तित्वात असलेली आयकर गणना आणि स्लॅब्जची व्यवस्था. जुन्या कर व्यवस्थेत, करदात्यांना विविध कर कपाती आणि सूट मागण्याचा पर्याय आहे.

 

  • "व्यापारेतर प्रकरणांमध्ये", डिफॉल्ट कर व्यवस्था बदलण्याचा पर्याय दरवर्षी थेट ITR मध्ये अंमलात आणला जाऊ शकतो आणि असा ITR आयकर कायदा,1961 च्या कलम 139(1) अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या देय तारखेला किंवा त्यापूर्वी फाइल करणे आवश्यक आहे.

 

  • व्यापार आणि व्यवसायातून उत्पन्न असलेल्या पात्र करदात्यांच्या बाबतीत, जर निर्धारितीला कर व्यवस्थेची निवड रद्द करायची असेल, तर त्यांना उत्पन्नाचे विवरणपत्र सादर करण्यासाठी आयकर कायदा,1961 च्या कलम 139(1) अंतर्गत देय तारखेला किंवा त्यापूर्वी फॉर्म-10-IEA सादर करावा लागेल. तसेच, अशा पर्यायातून बाहेर पडण्याच्या हेतूने म्हणजेच जुन्या कर व्यवस्थेची निवड रद्द करणे देखील फॉर्म क्र.10-IEA सादर करून केले जाईल. तथापि, जुन्या कर व्यवस्थेची निवड रद्द करण्याचा आणि डिफॉल्ट कर व्यवस्थेची पुन्हा निवड करण्याचा पर्याय केवळ त्यानंतरच्या निर्धारण वर्षात उपलब्ध आहे आणि व्यापार आणि व्यवसायातून उत्पन्न असलेल्या पात्र करदात्यांसाठी आयुष्यात केवळ एकदाच उपलब्ध आहे.
अनिवासी व्यक्तीसाठी कर दर खालीलप्रमाणे आहेत:

 

जुनी कर व्यवस्था

आयकर कायदा,1961 च्याकलम 115BAC अंतर्गत नवीन कर व्यवस्था

आयकर स्लॅब

आयकर दर

 

आयकर स्लॅब

आयकर दर

₹ 2,50,000 पर्यंत

शून्य

 

₹ 4,00,000 पर्यंत

शून्य

₹ 2,50,001 - ₹ 5,00,000

₹ 2,50,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 5%

 

 

₹ 4,00,001 - ₹ 8,00,000

₹ 4,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 5%

 

₹ 5,00,001 - ₹ 10,00,000

₹ 5,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 20% + ₹ 12,500

 

₹ 8,00,001 - ₹ 12,00,000

₹ 8,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 10% + ₹ 20,000

₹ 10,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर

₹ 10,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 30% + ₹ 1,12,500

 

 

₹ 12,00,001 - ₹ 16,00,000

₹ 12,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 15% + ₹ 60,000

 

 

₹ 16,00,001 - ₹ 20,00,000

₹ 16,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 20% + ₹ 1,20,000

 

 

₹ 20,00,001 - ₹ 24,00,000

₹ 20,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 25% + ₹ 2,00,000

 

₹ 24,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर

 

 

 

₹ 24,00,000 पेक्षा जास्त उत्पन्नावर 30% + ₹ 3,00,000

 

 

टीप: जुन्या कर व्यवस्थे अंतर्गत, अनिवासी व्यक्तीसाठी कर दर करदात्याच्या जन्मतारखेची पर्वा न करता वरीलप्रमाणेच राहतील.

 

*लागू अधिभार दर:


 

          उत्पन्न मर्यादा

आयकराच्या रकमेवरील अधिभार दर

 

       (नवीन कर व्यवस्था)

आयकराच्या रकमेवरील अधिभार दर

 

       (जुनी कर व्यवस्था)

 

₹ 50 लाखांपर्यंत

शून्य

शून्य

₹ 50 लाख ते ₹ 1 कोटी

10%

10%

₹ 1 कोटी ते ₹ 2 कोटी

15%

15%

₹ 2 कोटी ते ₹ 5 कोटी

25%

25%

₹ 5 कोटींपेक्षा जास्त उत्पन्नावर

25%

37%

 

टीप: कलम 111A, 112, 112A अंतर्गत कर आकारण्यायोग्य उत्पन्नावर आणि अनिवासींना लागू असलेल्या प्रमाणात लाभांश उत्पन्नावर 25% आणि 37% चा वाढीव अधिभार आकारला जात नाही. म्हणून, कलम 115A, 115AB, 115AC, 115ACA आणि 115E अंतर्गत करपात्र असलेल्या उत्पन्नाचा अपवाद वगळता, अशा उत्पन्नावर देण्यास पात्र असलेल्या करावरील अधिभाराचा जास्तीत जास्त दर 15% असेल.

 

जुन्या कर व्यवस्थे अंतर्गत अनुक्रमे ₹ 50 लाख, ₹ 1 कोटी, ₹ 2 कोटी किंवा ₹ 5 कोटींपेक्षा जास्त मिळवलेल्या उत्पन्नावर आणि नवीन कर व्यवस्थे अंतर्गत अनुक्रमे ₹ 50 लाख, ₹ 1 कोटी आणि ₹ 2 कोटींपेक्षा जास्त मिळवलेल्या उत्पन्नावर, अधिभारातून किरकोळ सवलतीचा दावा खालीलप्रमाणे करता येतो:

निव्वळ उत्पन्न श्रेणी

किरकोळ सवलत

(₹) पेक्षा जास्त

(₹) पेक्षा जास्त नाही

50 लाख

1 कोटी

दोन्ही कर व्यवस्थे अंतर्गत, आयकर आणि अधिभार म्हणून देण्यास पात्र असलेली रक्कम ही, ₹ 50 लाखांच्या एकूण उत्पन्नावर देण्यास पात्र असलेल्या एकूण आयकर रकमेपेक्षा, ₹ 50 लाखांपेक्षा जास्त असलेल्या उत्पन्नाच्या रकमेने अधिक असणार नाही.

1 कोटी

2 कोटी

दोन्ही कर व्यवस्थे अंतर्गत, आयकर आणि अधिभार म्हणून देण्यास पात्र असलेली रक्कम ही, ₹ 1 कोटीच्या एकूण उत्पन्नावर देण्यास पात्र असलेल्या एकूण आयकर रकमेपेक्षा, ₹ 1 कोटीपेक्षा जास्त असलेल्या उत्पन्नाच्या रकमेने अधिक असणार नाही.

2 कोटी

5 कोटी

दोन्ही कर व्यवस्थे अंतर्गत, आयकर आणि अधिभार म्हणून देण्यास पात्र असलेली रक्कम ही, ₹ 2 कोटीच्या एकूण उत्पन्नावर देण्यास पात्र असलेल्या एकूण आयकर रकमेपेक्षा, ₹ 2 कोटीपेक्षा जास्त असलेल्या उत्पन्नाच्या रकमेने अधिक असणार नाही.

5 कोटी

-

दोन्ही कर व्यवस्थे अंतर्गत, आयकर आणि अधिभार म्हणून देण्यास पात्र असलेली रक्कम ही, ₹ 5 कोटीच्या एकूण उत्पन्नावर देण्यास पात्र असलेल्या एकूण आयकर रकमेपेक्षा, ₹ 5 कोटीपेक्षा जास्त असलेल्या उत्पन्नाच्या रकमेने अधिक असणार नाही

 

 

   कर सवलत उपलब्ध असलेल्या गुंतवणूकी / पेमेंट्स / उत्पन्न:

 

आयकर कायदा,1961 च्या कलम 115BAC अंतर्गत नवीन कर व्यवस्थेची निवड करणाऱ्या करदात्यासाठी उपलब्ध असलेल्या कपाती:

 

कलम 24(b) – घराच्या मालमत्तेमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून गृहकर्जावर भरलेल्या व्याजावर केली जाणारी कपात

 

मालमत्तेचे स्वरूप

कर्जाचा हेतू

स्वीकार्य (जास्तीत जास्त मर्यादा)

ITR मध्ये भरण्यासाठी आवश्यक तपशील

भाडेतत्वावर देणे

घरमालमत्तेचे बांधकाम किंवा खरेदीसाठी

कोणत्याही मर्यादेशिवाय वास्तविक मूल्य (परंतु "घराच्या मालमत्तेमधून मिळणारे उत्पन्न" या शीर्षांतर्गत कोणताही तोटा झाला असल्यास, तो अनुसूची CYLA मधील इतर कोणत्याही शीर्षांतर्गत समायोजित करता येणार नाही आणि तो पुढील वर्षांसाठी पुढे नेला जाऊ शकत नाही)

  • बँकेकडून / बँकेव्यतिरिक्त इतर स्रोतांकडून घेतलेले कर्ज
  • ज्यांच्याकडून कर्ज घेतले आहे त्या संस्थेचे / बँकेचे / व्यक्तीचे नाव
  • बँक / संस्थेचा कर्ज खाते क्रमांक
  • कर्ज मंजुरीची तारीख
  • कर्जाची एकूण रक्कम
  • आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेस थकीत असलेले कर्ज
  • कलम 24(b) अंतर्गत उधार घेतलेल्या भांडवलावरील व्याज

 

कलम 80CCD(2)
80CCD(2) केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेत नियोक्त्याने केलेल्या योगदानाबाबतची कर कपात पगाराची 14% कपात मर्यादा
 

    आयकर कायदा,1961 नुसार जुन्या कर व्यवस्थेची निवड करणाऱ्या करदात्यासाठी उपलब्ध असलेल्या कपाती

1. कलम 24(b) – गृहकर्ज आणि घर दुरुस्ती कर्जावर भरलेल्या व्याजापोटी, घराच्या मालमत्तेमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून केली जाणारी कपात.

 

 

स्व-व्याप्त मालमत्तेच्या बाबतीत, गृहकर्जावर भरलेल्या व्याजाच्या कपातीची जास्तीत जास्त मर्यादा ₹ 2 लाख आहे. कलम 24(b) अंतर्गत कर्जावरील स्वीकार्य व्याज खालील तक्त्यात दिले आहे:

मालमत्तेचे स्वरूप

कर्ज कधी घेतले होते

कर्जाचा हेतू

स्वीकार्य (जास्तीत जास्त मर्यादा)

आवश्यक तपशील

स्व-व्याप्त

1/04/1999 रोजी किंवा नंतर

घरमालमत्तेचे बांधकाम किंवा खरेदीसाठी

₹ 2,00,000

  • बँकेकडून / बँकेव्यतिरिक्त इतर स्रोतांकडून घेतलेले कर्ज
  • ज्यांच्याकडून कर्ज घेतले आहे त्या बँकेचे / संस्थेचे / व्यक्तीचे नाव
  • बँक / संस्थेचा कर्ज खाते क्रमांक
  • कर्ज मंजुरीची तारीख
  • कर्जाची एकूण रक्कम
  • आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेस थकीत असलेले कर्ज.
  • कलम 24(b) अंतर्गत उधार घेतलेल्या भांडवलावरील व्याज

1/04/1999 रोजी किंवा नंतर

घरमालमत्तेच्या दुरुस्तीसाठी

₹ 30,000

1/04/1999 पूर्वी

घरमालमत्तेचे बांधकाम किंवा खरेदीसाठी

₹ 30,000

1/04/1999 पूर्वी

घरमालमत्तेच्या दुरुस्तीसाठी

₹ 30,000

भाडेतत्वावर देणे

कधीही

घरमालमत्तेचे बांधकाम किंवा खरेदीसाठी

कोणत्याही मर्यादेशिवाय वास्तविक मूल्य

 
आयकर कायदा,1961 च्या प्रकरण VIA अंतर्गत निर्दिष्ट कपाती
 

कलम 80C, 80CCC, 80CCD (1)

यांना दिलेल्या पेमेंट्ससाठी कपात

80C

  • जीवन विमा हप्ता
  • भविष्य निर्वाह निधी
  • काही विशिष्ट इक्विटी शेअर्सची सदस्यता
  • शिकवणी शुल्क
  • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
  • गृहकर्ज मुद्दल
  • इतर विविध बाबी

₹ 1,50,000 ची एकत्रित कपात मर्यादा

प्रत्येक पात्र पेमेंटसाठी ITR मध्ये भरायचे असलेले तपशील.

  • पॉलिसी क्रमांक किंवा दस्तऐवज ओळख क्रमांक
  • कलम 80C अंतर्गत कपातीसाठी पात्र रक्कम

 

80CCC

पेन्शन योजनेसाठी LIC किंवा अन्य विमा कंपनीची वार्षिकी योजना

80CCD (1)

केंद्र सरकारची पेन्शन योजना

80CCD (2) केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेत नियोक्त्याने केलेल्या योगदानाबाबतची कर कपात

14% if contribution made by CG or SG;

10% if contribution made other employer

 

 

कलम 80CCD(1B)

1)80CCD (1) अंतर्गत दावा केलेली कपात वगळून, केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेसाठी केलेल्या पेमेंटवरील कपात

2)उक्त उप-कलमात नमूद केलेल्या पेन्शन योजनेअंतर्गत एखाद्या अल्पवयीन व्यक्तीच्या खात्यात, त्या अल्पवयीन व्यक्तीचे पालक किंवा कायदेशीर पालक असलेल्या निर्धारितीद्वारे कोणतेही पेमेंट किंवा ठेव जमा केली असल्यास, या उप-कलमांतर्गत देखील कपात करण्यास परवानगी असेल.

₹ 50,000 ची कपात मर्यादा

 

टीप:
1. जर तुम्हाला कलम 80 CCD (1), 80 CCD (1B) अंतर्गत कपातीचा दावा करायचा असेल, तर तुम्ही खालील तपशील देणे आवश्यक आहे:
•  योगदानाची रक्कम
• करदात्याचे PRAN

2. जर तुम्हाला कलम 80CCC अंतर्गत कपातीचा दावा करायचा असेल, तर तुम्ही खालील तपशील देणे आवश्यक आहे:
•  ओळखकर्त्याचा प्रकार
•  ओळखकर्त्याचे नाव
•  रक्कम

 

 

कलम 80D

आरोग्य विमा प्रीमियम आणि प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी केलेल्या पेमेंट्सवरील कपात

स्वत:साठी / जोडीदार किंवा अवलंबित मुलांसाठी

₹ 25,000 (कोणतीही व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असेल तर ₹ 50,000)

प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी ₹ 5,000, वरील मर्यादेत समाविष्ट

पालकांसाठी

₹ 25,000 (कोणतीही व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असेल तर ₹ 50,000)

प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी ₹ 5,000, वरील मर्यादेत समाविष्ट

आरोग्य विमा कव्हरवर कोणताही प्रिमियम भरला नसल्यास, ज्येष्ठ नागरिकावर झालेल्या वैद्यकीय खर्चावरील कपात

स्वत:साठी / जोडीदार किंवा अवलंबित मुलांसाठी

₹ 50,000 ची कपात मर्यादा

पालकांसाठी

₹ 50,000 ची कपात मर्यादा

Note:

कलम 80D अंतर्गत कपातीचा दावा करणाऱ्या करदात्यांनी खालील तपशील देणे आवश्यक आहे:

  • विमाकर्त्याचे (विमा कंपनीचे) नाव
  • पॉलिसी क्रमांक
  • आरोग्य विम्याची रक्कम

 

 

80E

स्वतःच्या किंवा नातेवाईकाच्या उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावर केलेल्या व्याजाच्या पेमेंटवरील कपात

घेतलेल्या कर्जावर भरलेल्या व्याजाची एकूण रक्कम

 

टीप:

कलम 80E अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी, ITR मध्ये खालील तपशील देणे आवश्यक आहे:

 

  • बँक/संस्थेकडून घेतलेले कर्ज
  • ज्यांच्याकडून कर्ज घेतले आहे त्या बँकेचे/संस्थेचे नाव
  • बँक/संस्थेचा कर्ज खाते क्रमांक
  • कर्ज मंजुरीची तारीख
  • कर्जाची एकूण रक्कम
  • आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेस थकीत असलेले कर्ज
  • कलम 80E अंतर्गत व्याज

 

80EE

एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 या कालावधीत मंजूर झालेल्या, निवासी घर मालमत्तेच्या अधिग्रहणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या पेमेंट्ससाठी केली जाणारी कपात

घेतलेल्या कर्जावर भरलेल्या व्याजासाठी ₹ 50,000 ची कपात मर्यादा

 

टीप:

कलम 80EE अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी, ITR मध्ये खालील तपशील देणे आवश्यक आहे:

  • बँक/संस्थेकडून घेतलेले कर्ज
  • ज्यांच्याकडून कर्ज घेतले आहे त्या बँकेचे/संस्थेचे नाव
  • बँक/संस्थेचा कर्ज खाते क्रमांक
  • कर्ज मंजुरीची तारीख
  • कर्जाची एकूण रक्कम
  • आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेस थकीत असलेले कर्ज
  • कलम 80EE अंतर्गत व्याज

 

80EEA

1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2022 या कालावधीत मंजूर झालेल्या, पहिल्यांदाच निवासी घर मालमत्तेच्या अधिग्रहणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या पेमेंट्ससाठी केली जाणारी कपात आणि कलम 80EEA अंतर्गत कपातीचा दावा केलेला नसावा

घेतलेल्या कर्जावर भरलेल्या व्याजासाठी ₹ 1,50,000 ची कपात मर्यादा

 

 टीप:

कलम 80EEA अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी, ITR मध्ये खालील तपशील देणे आवश्यक आहे:

  • निवासी घर मालमत्तेचे मुद्रांक मूल्य
  • बँक/संस्थेकडून घेतलेले कर्ज
  • ज्यांच्याकडून कर्ज घेतले आहे त्या बँकेचे/ संस्थेचे नाव
  • बँक/संस्थेचा कर्ज खाते क्रमांक.
  • कर्ज मंजुरीची तारीख
  • कर्जाची एकूण रक्कम
  • आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेस थकीत असलेले कर्ज
  • कलम 80EEA अंतर्गत व्याज

नोंद घ्या की, कलम 80EEA अंतर्गत कपातीचा दावा केवळ तेव्हाच केला जाऊ शकतो जेव्हा कलम 24(b) मधील मर्यादा संपलेली असेल. तसेच, कर्ज मंजुरीची तारीख आणि इतर पात्र अटींच्या आधारे करदात्यांद्वारे 80EE किंवा 80EEA यापैकी एकाचाच दावा केला जाऊ शकतो.

 

80EEB

एप्रिल 2019 ते 31 मार्च 2023 या कालावधीत मंजूर झालेल्या, इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या पेमेंट्ससाठी करण्यात आलेली कपात

घेतलेल्या कर्जावर भरलेल्या व्याजासाठी ₹ 1,50,000 ची कपात मर्यादा

 

 टीप:

कलम 80EEB अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी, ITR मध्ये खालील तपशील देणे आवश्यक आहे:

  • बँक/संस्थेकडून घेतलेले कर्ज
  • ज्यांच्याकडून कर्ज घेतले आहे त्या बँकेचे/ संस्थेचे नाव
  • बँक/संस्थेचा कर्ज खाते क्रमांक.
  • कर्ज मंजुरीची तारीख
  • कर्जाची एकूण रक्कम
  • आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेस थकीत असलेले कर्ज
  • कलम 80EEB अंतर्गत व्याज
  • वाहन नोंदणी क्रमांक.

 

80G

विशिष्ट निधी, धर्मादाय संस्थान इत्यादींना दिलेल्या देणग्यांवरील कपात

 

खालील श्रेणींच्या अंतर्गत देणग्या कपातीस पात्र आहेत:

कोणत्याही मर्यादेशिवाय

100% कपात

50% कपात

पात्रता मर्यादेच्या अधीन

100% कपात

50% कपात

टीप: या कलमांतर्गत ₹ 2,000/- पेक्षा जास्त रकमेची देणगी रोख स्वरूपात दिल्यास कोणतीही कपात करण्यास परवानगी दिली जाणार नाही

 

80GG

घरासाठी भरलेल्या भाड्यावर केलेली कपात आणि ही केवळ त्यांच्यासाठी लागू आहे ज्यांच्या पगारात घरभाडे भत्ता (HRA) समाविष्ट नाही.

 

खालीलपैकी किमान गोष्टींना कपात म्हणून परवानगी दिली जाईल:

या कपातीपूर्वीच्या एकूण उत्पन्नाच्या 10% इतके भरलेले भाडे

दरमहा ₹ 5,000

 

या कपातीपूर्वी एकूण उत्पन्नाच्या 25%

टीप: कलम 80GG अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी    उत्पन्नाचे विवरणपत्र भरताना फॉर्म 10BA फाइल करणे आणि अनुसूची 80 GG मध्ये फॉर्म 10BA चा(पोचपावती क्रमांक.) प्रविष्ट करणे अनिवार्य आहे .

 

80GGA

वैज्ञानिक संशोधन किंवा ग्रामीण विकासासाठी दिलेल्या देणग्यांवरील कपात.

खालील श्रेणींच्या अंतर्गत देणग्या कपातीस पात्र आहेत:

संशोधन संघटना किंवा विद्यापीठ, महाविद्यालय किंवा इतर संस्था यासाठी:

  • वैज्ञानिक संशोधन
  • सामाजिक विज्ञान किंवा सांख्यिकीय संशोधन

संघटना किंवा संस्थेसाठी 

  • ग्रामीण विकास
  • नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन किंवा वनीकरणासाठी

कोणताही पात्र प्रकल्प राबवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा राष्ट्रीय समितीने मान्यता दिलेली एखादी संघटना किंवा संस्था 

यासाठी केंद्र सरकारने अधिसूचित केलेला निधी:

  • वनीकरण
  • ग्रामीण विकास

केंद्र सरकारने स्थापित आणि अधिसूचित केलेला राष्ट्रीय शहरी दारिद्र्य निर्मूलन निधी

टीप: या कलमांतर्गत ₹ 2,000 पेक्षा जास्त रकमेची देणगी रोख स्वरूपात दिल्यास किंवा एकूण उत्पन्नात व्यापार / व्यवसायामधून मिळालेला नफा / लाभ समाविष्ट असल्यास, कोणतीही कपात करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

 

80GGC

राजकीय पक्ष किंवा निवडणूक न्यासास दिलेल्या योगदानासाठी कपात

राजकीय पक्ष किंवा निवडणूक न्यासास दिलेल्या योगदानासाठी कपात. 

कोणतेही योगदान रोख स्वरूपात दिल्यास कोणतीही कपात करण्यास परवानगी दिली जाणार नाही

 

80IA

कलम 80-IA(4)(iv) मध्ये नमूद केलेल्या उपक्रमाच्या नफ्यासंदर्भातील कपात 

 ज्या करनिर्धारण वर्षात करदाता पायाभूत सुविधा विकसित करतो / चालवण्यास आणि त्याची देखभाल करण्यास सुरुवात करतो, त्या वर्षापासून सुरू होणाऱ्या 15 / 20 करनिर्धारण वर्षांच्या कालावधीत येणाऱ्या सलग 10 करनिर्धारण वर्षांसाठी नफ्याच्या 100% रकमेची कपात

1 एप्रिल 2017 रोजी किंवा त्यानंतर पायाभूत सुविधेचा विकास किंवा संचालन आणि देखभाल सुरू करणाऱ्या कोणत्याही उपक्रमाला कोणतीही कपात करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

(विशिष्ट व्यवसायासाठी निर्दिष्ट केलेल्या तारखांनंतर विकास, संचालन इत्यादी सुरू केल्यास कोणतीही कपात करण्याची परवानगी दिली जाणार नाही.)

 

80IB

पायाभूत सुविधा विकास उपक्रमांव्यतिरिक्त अन्य निर्दिष्ट औद्योगिक उपक्रमांमधून मिळणाऱ्या नफा आणि मिळकत/लाभांकापोटी कपात - विहित प्राधिकरणाने मंजूर केलेल्या करनिर्धारण वर्षापासून 10 वर्षांसाठी नफ्याच्या 100% रकमेची कपात (जर 31 मार्च 2000 नंतर परंतु 1 एप्रिल 2007 पूर्वी मंजूरी मिळाली असेल).

 

या कलमांतर्गत मिळणारी कपात अशा निर्धारितीला उपलब्ध आहे ज्याच्या एकूण उत्पन्नात खालील व्यवसायांमधून मिळणारा कोणताही नफा आणि मिळकत/लाभांक समाविष्ट आहे:

  • खनिज तेलाचे व्यावसायिक उत्पादन किंवा शुद्धीकरण [कलम 80-IB (9)]
  • गृहनिर्माण प्रकल्प विकसित करणे आणि बांधणे [कलम 80-IB (10)]
  • फळे, भाज्या, मांस, मांस उत्पादने, कुक्कुटपालन, सागरी किंवा दुग्धजन्य उत्पादनांवर प्रक्रिया करणे, जतन करणे आणि पॅकेजिंगच्या व्यवसायात गुंतलेला उपक्रम [कलम 80-IB (11A)]
  • अन्नधान्याच्या हाताळणी, साठवणूक आणि वाहतुकीच्या एकत्रीकृत व्यापारात गुंतलेला उपक्रम [कलम 80-IB (11A)]

(विशिष्ट अटींच्या अधीन)

 विहित प्राधिकरणाने मंजूर केलेल्या करनिर्धारण वर्षापासून (जर 1 एप्रिल 1999 पूर्वी मंजूरी मिळाली असेल), विविध प्रकारच्या उपक्रमांसाठी निर्दिष्ट केलेल्या अटींनुसार 5 / 10 / 7 वर्षांसाठी 100% / 25% नफा.

 

80IE

ईशान्येकडील राज्यांमध्ये स्थापन केलेल्या विशिष्ट उपक्रमांवरील कपात

 

(विशिष्ट अटींच्या अधीन)

 नमूद केलेल्या विविध अटींच्या अधीन राहून, 10 कर निर्धारण वर्षांसाठी नफ्याच्या 100% रकमेची कपात 

 

80JJA

जैवविघटनक्षम कचरा गोळा करण्याच्या आणि त्यावर प्रक्रिया करण्याच्या व्यवसायातून मिळणाऱ्या नफा आणि मिळकत/लाभांक यांच्या संदर्भातील कपात (विशिष्ट अटींच्या अधीन)

 5 कर निर्धारण वर्षांसाठी नफ्याच्या 100% रकमेची कपात, जिथे निर्धारितीच्या एकूण उत्पन्नात जैवविघटनक्षम कचरा गोळा करण्याच्या आणि त्यावर प्रक्रिया करण्याच्या व्यवसायातून मिळणारा कोणताही नफा आणि मिळकत/लाभांक समाविष्ट असतो

 

80JJAA

(विशिष्ट अटींच्या अधीन) कलम 44AB लागू असलेल्या निर्धारितीस लागू असलेल्या, नवीन कामगार / कर्मचार्‍यांच्या रोजगाराच्या संदर्भातील कपात.

 विशिष्ट अटींच्या अधीन राहून, 3 कर निर्धारण वर्षांसाठी अतिरिक्त कर्मचारी खर्चाच्या 30% कपात

 

80TTA

व्यक्ती (ज्येष्ठ नागरिक वगळून) / हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) यांना त्यांच्या बचत बँक खात्यांमधील ठेवींवर मिळालेल्या व्याजावरील कपात.

₹ 10,000/- ची कपात मर्यादा

पेज शेवटचे पुनरावलोकन केले किंवा अपडेट केले: