ई-फाइलिंग पोर्टल वर नोंदणी करा: CA करिता
क्रमानुसार मार्गदर्शक
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेजवर जा, नोंदणी करा वर क्लिक करा.
स्टेप 2: इतर वर क्लिक करा आणि श्रेणी सनदी लेखापाल म्हणून निवडा आणि पुढे सुरु ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 3: मूळ तपशील पेजवर सर्व अनिवार्य तपशील जसे की PAN, नाव, जन्मदिनांक, सदस्यता क्रमांक व नावनोंदणी दिनांक प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
टीप:
- ई-फाइलिंग पोर्टलवर PAN नोंदणीकृत नसल्यास, त्रुटीचा संदेश दर्शवला जाईल. जर आपले PAN नोंदणीकृत असेल तरच आपण CA म्हणून नोंदणी करू शकता.
- या टप्प्यावर, ही संगणक प्रणाली तपासेल की DSC निर्दिष्ट PAN शी जोडलेला आहे अथवा नाही. DSC नोंदणीकृत नसल्यास किंवा PAN ला जोडलेले DSC कालबाह्य झाले असल्यास त्रुटीचा संदेश दर्शवला जाईल. पुढे जाण्यासाठी आपला DSC आपल्या PAN सह नोंदवा / अपडेट करा.
स्टेप 4: ICAI डेटाबेससोबत यशस्वी प्रमाणीकरण केल्यावर, संपर्क तपशील पेज दिसेल. प्राथमिक मोबाइल नंबर, ई-मेल ID आणि पत्ता यांसारखे सर्व अनिवार्य तपशील प्रविष्ट करा, आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
स्टेप 5: दोन स्वतंत्र OTP आपल्या मोबाइल क्रमांक आणि ई-मेल ID (स्टेप 4 मध्ये प्रविष्ट केलेल्या) वर पाठविले जातात. आपल्या मोबाइल नंबर आणि ई-मेल ID वर प्राप्त झालेले 2 स्वतंत्र 6-अंकी OTP प्रविष्ट करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
टीप:
- OTP केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल
- योग्य OTP प्रविष्ट करण्यासाठी तुमच्याकडे 3 प्रयत्न असतील
- स्क्रीनवरील OTP कालबाह्यतेचा काउंटडाऊन टाइमर तुम्हाला OTP केव्हा कालबाह्य होईल ते सांगतो
- OTP पुन्हा पाठवा वर क्लिक केल्यानंतर, एक नवीन OTP जनरेट होईल आणि पाठविला जाईल
स्टेप 6: प्रविष्ट केलेले सर्व तपशील योग्य आहेत का ते तपासा. आवश्यक असेल तर, स्क्रीनवरील तपशील सुधारा, नंतर पुष्टी करा वर क्लिक करा.
स्टेप 7:सेट पासवर्ड पेज वर, सेट पासवर्ड आणि पासवर्डची पुष्टी करा या दोन्हीही टेक्स्टबॉक्समध्ये, तुमचा इच्छित पासवर्ड प्रविष्ट करा, तुमचा वैयक्तिक संदेश सेट करा आणि नोंदणी करा वर क्लिक करा.
टीप:
रीफ्रेश किंवा मागे जा वर क्लिक करू नका
आपण नवीन पासवर्ड प्रविष्ठ करताना, पासवर्ड धोरणाची काळजी घ्या:
- हा किमान 8 वर्ण आणि कमाल 14 वर्णांचा असला पाहिजे
- त्यामध्ये इंग्रजीमधील मोठ्या आणि लहान लिपीतील अक्षरे समाविष्ट असली पाहिजेत
- त्यामध्ये एक संख्या असली पाहिजे
- त्यामध्ये एक विशिष्ट वर्ण असला पाहिजे (उदा. @#$%)
स्टेप 8: लॉग इन प्रक्रिया सुरु करण्यासाठी लॉग इन सुरू ठेवा वर क्लिक करा. आपले लॉग इन तपशील आपल्या प्राथमिक ईमेल ID वर ईमेल केले जातील.
टीप: ई-फाइलिंग पोर्टलवर आपल्याला उपलब्ध असणारी सर्व वैशिष्ट्ये वापरण्यासाठी लॉग इन करा आणि आपला प्रोफाइल अपडेट करा.