Do not have an account?
Already have an account?

1. ITNS 282N म्हणजे काय?

ITNS 282N रोखे व्यवहार कर, वस्तू व्यवहार कर, कलम 379 अंतर्गत ई-DRS योजना आणि इतर करांचा भरणा तसेच विविध प्रकारचे प्रत्यक्ष कर करण्यासाठी वापरला जाणारा चलान फॉर्म आहे.

2. ITNS 282N अंतर्गत कोणत्या मुख्य शीर्ष आणि लघु शीर्ष समावेश होतो?

मुख्य शीर्ष:
- रोखे व्यवहार कर (0034)
- कलम 379 अंतर्गत ई-DRS योजना (0075)
- इतर कर (0028)

लघु शीर्ष:
- स्वयंनिर्धारण कर (300)
- अग्रिम कर (100)
- नियमित निर्धारणावरील कर (400)
- विविध प्राप्ती (800)
- वस्तू व्यवहार कर (800)

3. आयकराचा भरणा करण्यासाठी ITNS 282N कसा ॲक्सेस करू शकते/शकतो?

लॉगिननंतर:
ई-फाईल → ई-कर भरणा → लागू असलेला आयकर अधिनियम निवडा → नवीन भरणा → STT / CTT / कलम 379 अंतर्गत ई-DRS / इतर कर टाइल

लॉगिनपूर्वी:
डॅशबोर्ड → ई-कर भरणा (जलद लिंक) → लागू असलेला आयकर अधिनियम निवडा → पॅन आणि मोबाईल क्रमांक → ओटीपी पडताळणी → STT / CTT / कलम 379 अंतर्गत ई-DRS / इतर कर टाइल

4. रोखे व्यवहार कर भरण्यासाठी मुख्य शीर्ष आणि लघु शीर्ष यांचे कोणते संयोजन निवडावे?

रोखे व्यवहार कराचा भरणा करण्यासाठी "मुख्य शीर्ष – रोखे व्यवहार कर (0034)" आणि पेमेंटचा प्रकार अंतर्गत "लघु शीर्ष – स्वयंनिर्धारण कर (300)" निवडा.

5. वस्तू व्यवहार कर भरण्यासाठी मुख्य शीर्ष आणि लघु शीर्ष यांचे कोणते संयोजन निवडावे?

वस्तू व्यवहार कराचा भरणा करण्यासाठी "मुख्य शीर्ष – रोखे व्यवहार कर (0034)" आणि पेमेंटचा प्रकार अंतर्गत "लघु शीर्ष – वस्तू व्यवहार कर(800)" निवडा.

6. ई-DRS शुल्काचा भरणा करण्यासाठी मुख्य शीर्ष आणि लघु शीर्ष यांचे कोणते संयोजन निवडावे?

ई-DRS शुल्काचा भरणा करण्यासाठी "मुख्य शीर्ष – कलम 379 अंतर्गत ई-DRS योजना (0075)" आणि पेमेंटचा प्रकार अंतर्गत "लघु शीर्ष – विविध प्राप्ती (800)" निवडा.