Do not have an account?
Already have an account?

तक्रार नोंदवा उपयोगकर्ता पुस्तिका

1. अवलोकन

ई-निवारण हे ई-फायलिंग पोर्टलवरील तक्रार निवारण मॉड्यूल आहे. याच्या माध्यमातून करदाते ई-फायलिंग, CPC-ITR, निर्धारण अधिकारी (AO) आणि CPC-TDS अशा विविध विभागांशी संबंधित तक्रारी नोंदवू शकतात.

2. तक्रार कोण नोंदवू शकते/शकतो?

ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत किंवा नोंदणी नसलेले वापरकर्ते.

3. असे विभाग ज्यांच्याबाबत ई-निवारण यावर तक्रारी मांडता येतात

a. ई-फायलिंग: आयकर विवरणपत्र किंवा वैधानिक फॉर्म आणि ई-फायलिंगशी संबंधित तसेच ई-पडताळणी व ई-कार्यवाही इत्यादी मूल्यवर्धित सेवांशी संबंधित तक्रारी खालील श्रेणींअंतर्गत ई-फायलिंग विभागाकडे नोंदवता येतात:

ई-फायलिंग विभागातील श्रेणी:

संप्रेषणासाठी DCS संबंधित ई-पॅन ITR फाईल करणे फॉर्मच्या संबंधित
ITDREIN इन्स्टंट ई-पॅन (आधारद्वारे इन्स्टंट ई-पॅन) JSON युटीलिटीच्या संबंधित मोबाइल ॲप पासवर्ड
प्रोफाइल दुरुस्तीच्या संबंधित नोंदणीकरण TAN च्या संबंधित TIN 2.0
टॅक्सजीनी/चॅटबॉट सेवा पडताळणी/ई-पडताळणी करता येत नाही ई-फायलिंग पोर्टल ॲक्सेस ई-कार्यवाही  

b. AO: निर्धारण अधिकारी हे त्यांच्या अधिकारक्षेत्रातील करदात्यांचे निर्धारण करणारे नियुक्त आयकर अधिकारी असतात. मागणी, अपील, पॅन संबंधित विशिष्ट प्रश्न तसेच खालील श्रेणींअंतर्गत येणाऱ्या बाबींसाठी त्यांच्याशी संपर्क साधता येतो:


AO विभागामधील श्रेणी:

अपील निकालाचा आदेश प्राप्त झाला नाही TDS कपातकर्त्याकडून झालेली चूक AO कडून दुरुस्त करावयाची चुकीची मागणी AO कडून दुरुस्त करावयाची चुकीची मागणी विविध प्रलंबित अर्ज
AO कडे पॅनसंबंधित अर्ज पॅनची स्थिती AO कडे प्रलंबित दुरुस्तीची प्रकरणे परतावा प्राप्त झाला नाही इतर

c. CPC-ITR: हा विभाग आयकर विवरणपत्रांवर प्रक्रिया करण्याचे काम करतो. ITR-V, परतावा, आयकर विवरणपत्र प्रक्रियेशी संबंधित बाबी इत्यादींशी संबंधित तक्रारी खालील श्रेणींअंतर्गत CPC-ITR विभागाकडे नोंदवता येतात.

CPC-ITR विभागामधील श्रेणी:

संप्रेषणासाठी मागणी ITR-V
प्रक्रिया दुरूस्ती परतावा

d. CPC-TDS: हा विभाग ई-TDS योजनेशी संबंधित आहे. TAN साठीचा TDS परतावा, 26QB/26QC/26QD/26QE, फॉर्म 26AS/ATS संबंधित बाबी, त्रुटी, TDS/TCS विवरणपत्रांशी संबंधित समस्या तसेच मालमत्ता विक्रीवरील TDS यांसंबंधी तक्रारी खालील श्रेणींअंतर्गत या विभागाकडे नोंदवता येतात:

CPC-TDS विभाग यामधील श्रेणी:

26QB/26QC/26QD/26QE यांच्याशी संबंधित समस्या चलान/BIN संबंधित अनुपालनातील त्रुटींसंबंधित TDS/TCS प्रमाणपत्रे डाउनलोड करण्यासंबंधी समस्या
फॉर्म 13 / फॉर्म 15E / फॉर्म 15C आणि 15D Form 26A/27BA फॉर्म 26AS/ATS संबंधित KYC
TAN साठी TDS परतावा TDS/TCS विवरणपत्रांशी संबंधित समस्या RACES नोंदणी/लॉगिन संबंधित प्रश्न इतर
कर कपात/कर संकलनाच्या त्रैमासिक विवरणपत्रावरील प्रक्रिया TRACES पोर्टलवरील डाउनलोडशी संबंधित समस्या TRACES पोर्टलवरील डाउनलोडशी संबंधित समस्या फॉर्म 26AS/वार्षिक कर विवरणपत्रातील TDS/TCS मधील अचूकतेशी संबंधित समस्या
कर कपातीच्या चलान व विवरणपत्रावरील प्रलंबित मागणी कर कपातीच्या चलान व विवरणपत्राशी संबंधित येणारी समस्या कर कपात/कर संकलनाचे त्रैमासिक विवरणपत्र फाईल करताना येणाऱ्या समस्या कर कपातीच्या चलान व विवरणपत्राशी संबंधित परतावा
TDS/TCS BIN संबंधित समस्या TDS/TCS चलान संबंधित समस्या कर कपात/कर संकलनाच्या त्रैमासिक विवरणपत्रावरील TDS/TCS मागणी इतर

4. तक्रार कशी नोंदवावी आणि सबमिट कशी करावी?

4.1. आपण ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असल्यास:

स्टेप 1: ई-फायलिंग पोर्टल वर जा आणि लॉगिन वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 2: लॉगिन पेजवर तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करा.

Data responsive

स्टेप 3: तुमच्या डॅशबोर्डवरील'तक्रारी मेनूवर' जा > 'तक्रार सबमिट करा' निवडा.

Data responsive

स्टेप 4:'तक्रार' पेजवर संबंधित विभाग निवडा. किंवा, तक्रार नोंदवण्यासाठी सर्च बॉक्समध्ये तुमची समस्या शोधा.

Data responsive

स्टेप 5: संबंधित विभाग निवडल्यानंतर, ड्रॉप-डाउन मेनूमधून तक्रारीची "श्रेणी", "लागू अधिनियम" (आयकर अधिनियम, 2025 किंवा आयकर अधिनियम, 1961) आणि "उपश्रेणी" निवडा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा. श्रेणी आणि उपश्रेणी जाणून घेण्यासाठी कृपया वरील परिच्छेद 3 पहा.

Data responsive

स्टेप 6: तक्रारीच्या श्रेणीनुसार इतर आवश्यक माहिती (उदा. निर्धारण वर्ष (AY), कर वर्ष (TY) इ.) प्रविष्ट करा. त्यानंतर 'तक्रारीचे वर्णन' या बॉक्समध्ये तक्रारीचे वर्णन (किमान 100 अक्षरांमध्ये) लिहा, संबंधित कागदपत्रे अपलोड करा (अनिवार्य नाही) आणि 'तक्रार सबमिट करा' वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 7: आता तक्रार यशस्वीरित्या सादर झाली आहे. तक्रारीची स्थिती तपासण्यासाठी "तक्रार पोचपावती क्रमांक" नोंदवून ठेवा.

Data responsive

याशिवाय, तुम्ही तुमच्या समस्यांसाठी आयकर विभागाच्या तक्रार निवारणाच्या ई-मेल आयडीवरही संपर्क साधू शकता: webmanager@incometax.gov.in


टीप: आयकर विभागाच्या शिफारशीनुसार, करदात्यांनी ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर उपलब्ध असलेल्या तक्रार सुविधेचा वापर करूनच तक्रार नोंदवावी.

4.2. तुम्ही ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत नसल्यास:


स्टेप 1: ई-फायलिंग पोर्टलवर जा. खाली स्क्रोल करा आणि 'आमच्याशी संपर्क साधा' विभागाअंतर्गत असलेल्या 'तक्रारी' वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 2: माझ्याकडे पॅन/TAN नाही' हा पर्याय निवडा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 3: नाव, ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक यांसारखा तपशील प्रविष्ट करा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 4: मागील स्टेपमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीवर प्राप्त झालेला वन टाइम पासवर्ड (ओटीपी) प्रविष्ट करा आणि 'सबमिट करा'वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 5: आता ई-फायलिंग पोर्टलवरील नोंदणीकृत वापरकर्त्याप्रमाणेच तक्रार दाखल करा.

Data responsive

5. तक्रारीची स्थिती कशी तपासावी

तक्रारीची स्थिती प्री-लॉगिन आणि पोस्ट लॉगिन पद्धतीद्वारे तपासता येते.

प्री-लॉगिन पद्धत

स्टेप 1: ई-फायलिंग पोर्टल वर जा, खाली स्क्रोल करा आणि 'आमच्याशी संपर्क साधा' विभागात 'तक्रार पहा' वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 2: तक्रारीचा पोचपावती क्रमांक आणि तक्रार दाखल करताना वापरलेला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.

Data responsive

पोस्ट लॉगिन पद्धत

स्टेप 1: ई-फायलिंग पोर्टल वर जा आणि 'लॉगिन' वर क्लिक करा.

Data responsive

स्टेप 2: लॉगिन पेजवर तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करा.

Data responsive

स्टेप 3: तुमच्या डॅशबोर्डवरील 'तक्रार मेनू' >'तक्रारीची स्थिती पहा' यावर जा.

Data responsive



स्टेप 4: तुमच्या तक्रारीची स्थिती तपासा. तसेच, तक्रार नोंदवल्याची तारीख, विभाग आणि स्थिती या फिल्टरचाही वापर करू शकता.

Data responsive

6.संबंधित विषय

 

शब्दावली

संक्षेप/संक्षिप्त रूप

वर्णन/पूर्ण रूप

ITR

आयकर विवरणपत्रे

DSC

डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र

TY/AY

कर/ निर्धारण वर्ष

PY

मागील वर्ष

FY

आर्थिक वर्ष