आपल्या PAN ची पडताळणी करण्याबाबत उपयोगकर्ता पुस्तिका
1. अवलोकन
'पॅनची स्थिती पडताळा' ही ई-फाइलिंग पोर्टलवरील लॉगिनपूर्व (पोर्टलमध्ये लॉगिन करणे आवश्यक नाही) सेवा असून, बाहेरील संस्था वगळता सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
बाह्य संस्था ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर यापॅनची स्थिती पडताळासेवेचा लाभ घेऊ शकतात.
या सेवेसह, तुम्ही:
- पॅनवरील तपशील, जसे की पॅनवरील नाव, जन्मतारीख इत्यादी अचूक आहेत की नाही हे तपासू शकता.
- पॅन सक्रिय असल्याची पडताळणी करू शकता
2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्वअटी
- वैध पॅन
- वैध मोबाइल नंबर (तुमच्यासाठी उपलब्ध असलेला)
- बाह्य संस्थांसाठी: वैध यूजर आयडी आणि पासवर्डसह ई-फाइलिंग पोर्टलवरील नोंदणीकृत वापरकर्ता, निगमन दिनांक.
3. क्रमवार मार्गदर्शक
3.1 पॅनची स्थिती पडताळा
स्टेप 1: ई-फाइलिंग पोर्टलच्या होमपेज वर जा.
स्टेप 2: क्विक लिंक्स विभागात, 'पॅनची स्थिती पडताळा'वर क्लिक करा.
स्टेप 3:'पॅन स्थिती पडताळा' पेजवर तुमचा पॅन, पूर्ण नाव, जन्मतारीख आणि (तुमच्यासाठी उपलब्ध असलेला) मोबाईल नंबर प्रविष्ट करा आणि'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.
स्टेप 4:'पडताळणी' पेजवर, स्टेप 3 मध्ये प्रविष्ट केलेल्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला 6 अंकी ओटीपी प्रविष्ट करा आणि 'प्रमाणित करा' वर क्लिक करा.
टीप:
• ओटीपी केवळ 15 मिनिटांसाठीच वैध असेल.
• अचूक ओटीपी प्रविष्ट करण्यासाठी तुमच्याकडे 3 संधी असतील.
•ओटीपी टाइमर नवीन ओटीपी जनरेट करण्यासाठी उर्वरित वेळ दर्शवतो.'ओटीपी पुन्हा पाठवा' वर क्लिक केल्यावर, एक नवीन ओटीपी जनरेट केला जाईल आणि पाठवला जाईल.
यशस्वी पडताळणीनंतर, तुमच्या पॅनची स्थिती प्रदर्शित केली जाईल.
टीप:
हे केवळ माहितीच्या उद्देशाने आहे, याचा ई-फाइलिंगमधील इतर कोणत्याही कार्यक्षमतेवर परिणाम होणार नाही. कोणतीही शंका किंवा प्रश्न असल्यास वापरकर्त्याने केवळ JAO शी संपर्क साधावा
3.2 बाह्य संस्थेसाठी पॅनची पडताळणी करा
स्टेप 1:तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फाइलिंग पोर्टलमध्ये लॉगिन करा.
स्टेप 2: ‘सेवा’ > ‘पॅन तपशील पहा’ वर क्लिक करा.
स्टेप 3: 'तुमच्या पॅनची पडताळणी करा' पेजवर, पडताळणी करावयाचा पॅन, पूर्ण नाव आणि निगमनाची तारीख (DOI) / जन्मतारीख (DOB) प्रविष्ट करा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा.
यशस्वी प्रमाणीकरणानंतर पॅनची स्थिती प्रदर्शित केली जाईल.
4. संबंधित विषय