Do not have an account?
Already have an account?
Document

 

ई-PAN वरील वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न 1:

माझ्याकडे एक PAN आहे परंतु मी ते गमावले आहे. मला आधार कार्डच्या माध्यमातून एक नवीन ई-पॅन मिळू शकतो का?

निराकरण:

नाही. आपल्याकडे PAN नसेल, परंतु वैध आधार असेल आणि आपले KYC तपशील अपडेट केले असतील तरच ही सेवा वापरता येऊ शकते.

प्रश्न 2:

ई-PAN साठी कोणताही शुल्क / फी आहे का?

निराकरण:

नाही. हे पूर्णपणे विनामूल्य आहे.

प्रश्न 3:

त्वरित ई-PAN चा लाभ घेण्यासाठी पूर्व-आवश्यकता काय आहेत?

निराकरण:

त्वरित ई-PAN मिळवण्यासाठी पूर्व-आवश्यकता पुढीलप्रमाणे आहेत:

  • ज्या व्यक्तींना PAN वितरित केलेले नाही
  • वैध आधार आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर
  • विनंतीच्या तारखेपासून वापरकर्ता अल्पवयीन नाही; आणि
  • आयकर कायद्याच्या कलम 160 अंतर्गत प्रतिनिधी निर्धारितेच्या व्याख्येनुसार वापरकर्त्याचा समावेश नाही.

प्रश्न 4:

नवीन ई-PAN मिळवण्यासाठी मला कोणती दस्तऐवज आवश्यक आहेत?

निराकरण:

आपल्याला केवळ अद्ययावत KYC तपशीलांसह वैध आधार आणि आपल्या आधारसोबत लिंक केलेला वैध मोबाइल नंबर आवश्यक आहे.

प्रश्न 5:

मला ई-PAN तयार करण्याची आवश्यकता का आहे?

निराकरण:

आपला आयकर विवरणपत्र फाइल करताना आपला स्थायी खाते नंबर (PAN) नमूद करणे अनिवार्य आहे. जर आपल्याला पॅन देण्यात आला नसेल तर, आपण आपल्या आधारच्या मदतीने आणि आपल्या आधारसोबत नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाने आपला ई-पॅन जनरेट करू शकता. ई-पॅन जनरेट करणे ही विनामूल्य, ऑनलाइन प्रक्रिया आहे आणि आपल्याला कोणताही फॉर्म भरणे आवश्यक नाही.

प्रश्न 6:

माझ्या PAN वाटप विनंती स्थितीची सध्याची स्थिती "PAN वाटप विनंती अयशस्वी झाली आहे" म्हणून अपडेट केली आहे. मी काय करावे?

निराकरण:

आपले ई-PAN वाटप अयशस्वी झाल्यास, आपण epan@incometax.gov.in वर लिहू शकता.

प्रश्न 7:

माझा ई-PAN तयार करण्याची विनंती यशस्वीरित्या सबमिट झाली आहे हे मला कसे कळेल?

निराकरण:

पोचपावती ID सह यशस्वी झाल्याचा संदेश दर्शवला जाईल. भविष्यातील संदर्भांसाठी कृपया पोचपावती ID नोंद करून ठेवा. याव्यतिरिक्त, आपल्याला आधारसोबत नोंदणीकृत आपल्या मोबाईल क्रमांकावर पोचपावती ID ची प्रत मिळेल.

प्रश्न 8:

मी माझ्या ई-PAN मध्ये माझी जन्मतारीख अपडेट करू शकत नाही. मी काय करायला हवे?
निराकरण:

जर आपल्या आधार वर केवळ जन्माचे वर्षच उपलब्ध असेल तर, आपल्याला आपल्या आधार मध्ये जन्मतारीख अपडेट करून पुन्हा प्रयत्न करावा लागेल.

प्रश्न 9:

परदेशी नागरिक ई-KYC पद्धतीद्वारे PAN साठी अर्ज करू शकतात का?
निराकरण:

नाही

प्रश्न 10:

ई-KYC दरम्यान माझे आधार प्रमाणीकरण नाकारले गेले, तर मी काय करावे?

निराकरण:

चुकीचा OTP वापरल्यास आधार प्रमाणीकरण अस्वीकृत होऊ शकते. योग्य ओ.टी.पी. प्रविष्ट करून समस्या सोडवता येते. ते अद्याप नाकारले गेले तर, आपल्याला UIDAI शी संपर्क साधावा लागेल.

प्रश्न 11:

मला KYC अर्जाची प्रत्यक्ष प्रत किंवा आधार कार्डाचा पुरावा सबमिट करण्याची आवश्यकता आहे का?

निराकरण:

नाही. ही एक ऑनलाइन प्रक्रिया आहे. कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही.

प्रश्न 12:

मला ई-KYC साठी स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी इ. अपलोड करण्याची आवश्यकता आहे का?
निराकरण:

नाही

प्रश्न 13:

मला वैयक्तिक पडताळणी (IPV) करण्याची आवश्यकता आहे का?
निराकरण:

नाही. प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. आपल्याला कोणत्याही केंद्राला भेट देण्याची आवश्यकता नाही.

प्रश्न 14:

मला एक प्रत्यक्ष PAN कार्ड मिळेल का?
निराकरण:

नाही. आपल्याला एक ई-PAN जारी केला जाईल जो PAN चा वैध प्रकार आहे.

प्रश्न 15:

मला प्रत्यक्ष PAN कार्ड कसे मिळेल?

निराकरण:

जर PAN वाटप केले असेल तर, आपण खालील लिंकद्वारे विनंती दाखल करून प्रत्यक्ष PAN कार्ड प्रिंट करून घेऊ शकतात.
https://www.onlineservices.nsdl.com/paam/ReprintEPan.html
https://www.utiitsl.com/UTIITSL_SITE/mainform.html

आपण प्रत्यक्ष PAN कार्डसाठी PAN सेवा एजंटकडे ऑफलाइन अर्ज देखील दाखल करू शकता

प्रश्न 16:

माझा आधार आधीच PAN शी लिंक केलेला आहे, मला इन्स्टंट ई- PAN साठी अर्ज करता येईल का?

निराकरण:

आपल्या आधारशी लिंक केलेला PAN आधीच देण्यात आला असेल तर आपण त्वरित ई-PAN साठी अर्ज करू शकत नाही. आपला आधार चुकीच्या PAN शी लिंक केलेला असेल तर PAN मधून आधार डिलिंक करण्यासाठी अधिकारक्षेत्र मूल्यांकन अधिकारी (JAO) यांच्याकडे विनंती सबमिट करा. डिलिंकींग केल्यानंतर, त्वरित ई-PAN विनंती सबमिट करा.

AO चे संपर्क तपशील जाणून घेण्यासाठी भेट द्या:

https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/knowYourAO

प्रश्न 17:

मी त्वरित ई-PAN साठी अर्ज करू शकत नाही कारण आधारमधील माझे नाव/जन्मतारीख/लिंग चुकीचे आहे किंवा माझा आधार क्रमांक कोणत्याही सक्रिय मोबाइल नंबरशी लिंक केलेला नाही. मी काय करायला हवे?

निराकरण:

आपल्याला आधार डेटाबेसमध्ये आपले तपशील दुरुस्त करणे आवश्यक आहे. आपण यावर आपले आधार तपशील दुरुस्त करू शकता:

चौकशी/ सहाय्यता यासाठी, कृपया टोल फ्री क्रमांक 18003001947 किंवा 1947 वर संपर्क साधा

आधारवर मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी आपल्याला जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट देणे आवश्यक आहे.

 

अस्वीकरण: हे वारंवार विचारले जाणारे प्रश्न केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. या दस्तऐवजात काहीही कायदेशीर सल्ला समाविष्ट नाही.