Do not have an account?
Already have an account?

1. आयकर वैधानिक अर्ज भरण्यासाठी ITD च्या ऑफलाईन युटीलिटीचा वापर कोण करू शकतो?
कोणताही ई-फाईलिंग वापरकर्ता ITR आणि वैधानिक अर्जासाठी ऑफलाईन युटीलिटी डाऊनलोड करू शकतो आणि त्यात प्रवेश करू शकतो, परंतु अर्ज केवळ खालील वापरकर्त्यांद्वारेच दाखल केले जाऊ शकतात:

  • करदाते
  • सनदी लेखापाल
  • कर वजा करणारे आणि गोळा करणारे

2. मी एक सनदी लेखापाल आहे. मी ऑफलाईन युटिलिटीवर माझ्या लॉग इन क्रेडेंशियलचा वापर करून माझ्या ग्राहकासाठी आयकर अर्ज फाईल करू शकतो का?
तुम्ही केवळ तुमच्या लॉगइन क्रेडेंशियलचा वापर करून तुम्हाला नेमून दिलेले अर्जच फाईल करू शकता.

3. वैधानिक अर्जासाठी मूल्यांकन वर्ष 2021-22 मधील ITD च्या ऑफलाईन युटिलीटीबाबत नवीन काय आहे?

  • मूल्यांकन वर्ष 2021-22 पासून, XML हे आधी भरलेल्या डेटा किंवा अपलोड करण्यासाठी युटिलिटी - तयार केलेल्या फाईलचे स्वरूप असणार नाही, ते आता JSON स्वरुपात असणार आहे. .
  • वापरकर्ते एकतर ऑफलाईन युटिलिटीमध्ये त्यांचा आधी भरलेला डेटा डाउनलोड करू शकतात किंवा ई-फाईलिंग पोर्टल वरून त्यांच्या संगणकावर JSON स्वरुपात डाऊनलोड केलेला आधी भरलेला फॉर्म इम्पोर्ट करू शकतात. पूर्वी, आधी भरलेला XML इम्पोर्ट करण्यासाठी फक्त एकच मार्ग होता.
  • मूल्यांकन वर्ष 2021-22 पूर्वी, वापरकर्त्यांना त्यांनी बनवलेल्या फॉर्मची XML तयार करून ती सबमिशनसाठी ई-फाईलिंग पोर्टलवर अपलोड करावी लागत होती. नवीन ऑफलाईन युटिलिटीमुळे, वापरकर्ते युटिलिटीमधून त्यांचे फॉर्म थेट सबमिट आणि सत्यापित करू शकतात. वापरकर्त्यांकडे फॉर्म सबमिट करण्यासाठी अजूनही JSON तयार करण्याचा आणि तो ई-फाईलिंग पोर्टलवर अपलोड करण्याचा पर्याय आहे.

4. वैधानिक फॉर्मसाठी ITD ऑफलाईन युटिलीटी वापरताना एकधीक इम्पोर्ट पर्याय म्हणजे काय आहे?
आयकर फॉर्मसाठी तुमच्या आधी भरलेल्या डेटासोबत तुमच्याकडे JSON इम्पोर्ट करण्यासाठी अनेक पर्याय आहेत:

  • तुमच्या लॉग इन क्रेडेंशियल्स आणि OTP प्रमाणीकरणाच्या [जशी स्थिती असेल त्याप्रमाणे पोच पावती क्रमांक/व्यवहार ID/इतर] आधारे आधी भरलेला फॉर्म डाऊनलोड करा, तुमच्या फॉर्ममध्ये आधी भरलेला डेटा डाऊनलोड केला जाईल.
  • Import Pre-filled JSON – Attach your already downloaded JSON into the offline utility, and based on your PAN/TAN/Form no./AY, your pre-filled data gets downloaded into your form.

5. ऑफलाईन युटिलिटी वापरताना जार मी माझ्या ITR/ वैधानिक फॉर्ममध्ये चुका केल्या, तर मला ते कसे कळेल?
ऑनलाईन फॉर्मसाठी लागू असलेले सर्व प्रमाणीकरण नियम तुम्ही त्यांना पोर्टल वर किंवा थेट ऑफलाईन युटिलिटीमधून सबमिट करता की नाही याकरिता लागू होतील. कोणतीही चूक असेल, तर तुम्हाला सिस्टममधून त्रुटी संदेश मिळेल आणि ज्या फील्डमध्ये त्रुटी आहेत त्यांना फॉर्ममध्ये हायलाईट केले जाईल. जर तुम्ही तुमची JSON फाईल एक्स्पोर्ट आणि अपलोड केली, तर डाऊनलोड करण्यायोग्य त्रुटी फाईल तयार केली जाईल, जिचा तुम्ही चुका दुरुस्त करण्यासाठी संदर्भ घेऊ शकता.

6. ऑफलाईन युटिलिटीवर त्वरित लॉग इन करण्यासाठी कोणता वापरकर्ता ID प्रदान केला पाहिजे?
करदात्यांसाठी, लॉग इन करण्यासाठी वापरकर्ता ID हा PAN आहे. सनदी लेखापाल किंवा CA ला ARCA + 6 अंकी सदस्यता क्रमांक वापरण्याची आवश्यकता आहे. कर वजा करणारे आणि गोळा करणारे यांनी TAN वापरणे आवश्यक आहे.

7. वैधानिक फॉर्मसाठी ऑफलाईन युटिलिटी वापरुन सर्व फॉर्म फाईल केले जाऊ शकतात का?
ऑफलाईन युटिलिटी वापरुन फाईल करता येऊ शकणारे फॉर्म खालीलप्रमाणे आहेत:

  • फॉर्म 15CA (भाग A, B, C आणि D)
  • फॉर्म 15CB
  • फॉर्म 3CA-CD, फॉर्म 3B-CD, फॉर्म 3CEB
  • फॉर्म 29B, फॉर्म 29C
  • फॉर्म 15G, फॉर्म 15H
  • फॉर्म 15CC
  • फॉर्म-V