Do not have an account?
Already have an account?

फाइल केलेली विवरणपत्रे पाहा

(आपली फाइल केलेली विवरणपत्रे त्वरित पाहा)

फाईल केलेले फॉर्म बघा

1. फाईल केलेला माझा फॉर्म मी डाउनलोड करू शकतो/ शकते का?

होय. ई-फायलिंग पोर्टलवरील ई-फाईल > आयकर फॉर्म्स > फाईल केलेले फॉर्म्स पहा याद्वारे तुम्ही फाईल केलेल्या फॉर्मची PDF आवृत्ती डाउनलोड करू शकता

2. फाईल केलेले फॉर्म्स कोण पाहू शकतात?

ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेली कोणतीही व्यक्ती स्वतः फाईल केलेले किंवा तिच्या वतीने अधिकृत प्रतिनिधीने फाईल केलेले फॉर्म्स पाहू शकते.

3. पूर्वी फाईल केलेले फॉर्म 15CA / 15CB सीए कसे पाहू शकतात?

सीए लॉगिन किंवा TAN लॉगिन असलेले वापरकर्ते ई-फायलिंग पोर्टलवरील फाईल केलेले फॉर्म्स पहा या सेवेच्या माध्यमातून फॉर्म 15CA / 15CB पाहू शकतात.

4. फाईल केलेले फॉर्म्स पहा' अंतर्गत मी कोणते फॉर्म्स पाहू शकतो/शकते?

तुम्ही स्वतः फाईल केलेले किंवा तुमच्या वतीने अधिकृत प्रतिनिधीने फाईल केलेले सर्व वैधानिक फॉर्म्स पाहू शकता. तुमच्या वतीने सीए यांनी फाईल केलेले फॉर्म्स तुम्हाला तसेच संबंधित सीए लाही पाहता येतील.

5. मी पूर्वी मॅन्युअली फाईल केलेला फॉर्म ई-फायलिंग पोर्टलवर पाहू शकतो/शकते का?

नाही. तुम्ही पूर्वी मॅन्युअली फाईल केलेले फॉर्म्स ई-फायलिंग पोर्टलवर पाहू शकणार नाही.

6. मी फाईल केलेला फॉर्म कसा संपादित करू शकतो/शकते?

फॉर्म एकदा फाईल केल्यानंतर तो संपादित करता येत नाही. मात्र, आयकर अधिनियम/नियमांनुसार त्यासाठीची कालमर्यादा संपलेली नसल्यास तुम्ही नवीन फॉर्म फाईल करू शकता. अशा परिस्थितीत, यापूर्वी फाईल केलेला फॉर्म अवैध मानला जाईल.