Do not have an account?
Already have an account?

माझे सनदी लेखापाल(सीए)

(कर प्रक्रिया सुलभ करत, एक पाऊल एकावेळी)

(कर प्रक्रिया सुलभ करत, एक पाऊल एकावेळी)

Frequently Asked Questions

माझे सनदी लेखापाल (सीए) – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. माझ्या ई-फायलिंग खात्यात मी माझा सीए कसा जोडू शकते/शकतो?

तुमच्या खात्यात लॉगिन केल्यानंतर उपलब्ध असलेल्या या सेवेद्वारे तुम्ही तुमच्या ई-फायलिंग खात्यात तुमचा/तुमचे सनदी लेखापाल जोडू शकता. माझे सीए सेवेद्वारे तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • तुम्ही अधिकृत केलेल्या ई-फायलिंग पोर्टलवरील सक्रिय आणि निष्क्रिय सीए यांची यादी पाहणे.
  • सीए जोडणे.
  • सीएला फॉर्म नियुक्त करणे.
  • नियुक्त केलेले फॉर्म मागे घेणे.
  • सीए सक्रिय करणे.
  • सीए निष्क्रिय करणे.

2. माझे सीए ही सेवा कोण वापरू शकते/शकतो?

ई-फायलिंग पोर्टलवरील ई-फायलिंगवरील खालीलपैकी कोणत्याही श्रेणीतील सर्व नोंदणीकृत वापरकर्ते या सेवेचा लाभ घेऊ शकतात:

  • वैयक्तिक
  • HUF
  • कंपनी, व्यक्तींची संघटना (AOP), व्यक्तींचा समूह (BOI), कृत्रिम न्यायालयीन व्यक्ती (AJP), विश्वस्त मंडळ, सरकार, LA (स्थानिक प्राधिकरण), फर्म
  • कर कपातकर्ता आणि संकलक

3. मी सीएला नियुक्त केलेले फॉर्म मागे घेऊ शकते/शकतो का?

होय. सीएला नियुक्त केलेले फॉर्म मागे घेता येतात. सीएला नियुक्त केलेले सर्व फॉर्म वापरकर्ता पाहू शकतो आणि आवश्यक असल्यास ते मागेही घेऊ शकतो.

4. मला सीएला अधिकृत करण्याची आवश्यकता का आहे?

तुमच्या वतीने ई-फायलिंग पोर्टलवर कोणताही फॉर्म दाखल करण्यापूर्वी किंवा कोणतीही माहिती सादर करण्यापूर्वी, त्या सीएला तुम्ही अधिकृत केलेले असणे आवश्यक आहे. तसेच, काही वैधानिक फॉर्मसाठी सीएचे प्रमाणपत्र आवश्यक असते. या सेवेद्वारे तुम्ही सीएला जोडू शकता तसेच आयकर विवरणपत्रे/ फॉर्म सबमिट करण्यासाठी सीएने ही विनंती स्वीकारणे आवश्यक आहे.

Detailed guides and documentation