Do not have an account?
Already have an account?

सेवा विनंतीची पडताळणी करा उपयोगकर्ता पुस्तिका

1. अवलोकन


ई-फायलिंग पोर्टलवरील सर्व वापरकर्त्यांसाठी ERI ची सेवा विनंतीची पडताळणी करा ही सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेद्वारे, 'ई-विवरणपत्र मध्यस्था' ने तुमच्या वतीने ई-फायलिंग पोर्टलवर विशिष्ट कृती करताना (जसे की विवरणपत्र आणि फॉर्म्स फाइल करणे) सादर केलेली विनंती तुम्ही पडताळून पाहू शकाल.

ERI त्यांच्या क्लायंटच्या वतीने पुढील सेवा पूर्ण करू शकतात:

  • क्लायंट जोडणे (नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत वापरकर्ते)
  • क्लायंट सक्रिय करणे
  • क्लायंटच्या वैधतेचा कालावधी वाढवणे
  • सेवेची वैधता वाढवणे
  • सेवा जोडणे
  • ITR-V सबमिट करण्यास झालेल्या विलंबाबाबत माफीची विनंती करणे
  • अधिकृत प्रतिनिधी जोडणे
  • स्वतःच्या वतीने दुसऱ्या व्यक्तीला कार्य करण्यासाठी अधिकृत करणे
  • प्रतिनिधी निर्धारिती म्हणून नोंदणी करणे
  • इतर व्यक्तीच्या वतीने कार्य करण्यासाठी नोंदणी करणे
  • आयकर फॉर्म्स फाइल करणे
  • परतावा पुन्हा जारी करण्याची विनंती करणे
  • दुरुस्तीची विनंती करणे
  • मुदतीनंतर ITR फाइल करण्यासाठी विलंबमाफीची विनंती करणे
  • बँक खात्यात पडताळणी केलेल्या संपर्क तपशीलांनुसार प्राथमिक संपर्क तपशील अपडेट करणे.
  • डिमॅट खात्यातील पडताळणी केलेल्या संपर्क तपशीलांनुसार प्राथमिक संपर्क तपशील अपडेट करणे.

तुमच्या क्लायंटने पडताळणी केल्यानंतरच ERI द्वारे सबमिट केलेली विनंती पूर्ण केली जाईल.

2.   या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पूर्वअटी

  • वैध आणि सक्रिय पॅन / TAN
  • ई-विवरणपत्र मध्यस्थाने त्याच्या क्लायंट (करदाता) साठी विनंती केलेली असणे आवश्यक आहे
  • ERI द्वारे फाइल केलेल्या विनंतीचा व्यवहार आयडी
  • फाइल केलेल्या विनंतीचा व्यवहार आयडी विनंतीच्या पडताळणीच्या वेळेस वैध/सक्रिय असला पाहिजे

3. क्रमवार मार्गदर्शक


स्टेप 1: ई-फायलिंग पोर्टल होमपेजवर जा आणि सेवा विनंतीची पडताळणी करा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 2: सेवा विनंतीची पडताळणी करा पेजवर, ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला विनंतीचा व्यवहार आयडी आणि पॅन / TAN प्रविष्ट करा. प्रमाणित करा वर क्लिक करा.

Data responsive


टीप: तुम्ही पोर्टलवर नोंदणीकृत नसाल, तर विनंती सबमिट करते वेळी ERI द्वारे तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरवर प्रदान केलेला व्यवहार आयडी प्रविष्ट करा.

स्टेप 3: प्रमाणीकरण यशस्वी झाल्यानंतर, पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 4: पडताळणीची पद्धत ERI द्वारे सबमिट केलेल्या विनंतीच्या प्रकारावर अवलंबून असेल.

सबमिट केलेल्या विनंतीचा प्रकार पडताळणीची पद्धत
  • क्लायंट जोडणे (नोंदणीकृत वापरकर्ते)
  • क्लायंट सक्रिय करणे
  • क्लायंटच्या वैधतेचा कालावधी वाढवणे
  • सेवेची वैधता वाढवणे
  • सेवा जोडणे
  • ITR-V सबमिट करण्यास झालेल्या विलंबासाठी विलंबमाफीची विनंती
  • अधिकृत प्रतिनिधी जोडणे
  • स्वतःच्या वतीने कार्य करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीस अधिकृत करणे
  • प्रतिनिधी निर्धारिती म्हणून नोंदणी करणे
  • इतर व्यक्तीच्या वतीने कार्य करण्यासाठी नोंदणी करणे
  • बँक खाते / डीमॅट खात्याच्या पडताळणी केलेल्या संपर्क तपशीलांनुसार प्राथमिक संपर्क तपशील अपडेट करणे.
ई-फायलिंग पोर्टलवरील नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर प्राप्त झालेला 6-अंकी ओटीपी
  • क्लायंटची नोंदणी करणे
  • क्लायंट जोडणे (अनोंदणीकृत वापरकर्ते)
ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर प्राप्त झालेले दोन स्वतंत्र 6-अंकी ओटीपी
  • आयकर फॉर्म्स फाइल करणे
  • परतावा पुन्हा जारी करण्याची विनंती
  • दुरुस्तीची विनंती करणे
  • मुदतीनंतर ITR फाइल करण्यासाठी विलंब माफीची विनंती करणे

ई-पडताळणी

स्टेप 5a: 6-अंकी ओटीपी प्रविष्ट करा (अधिक तपशीलांसाठी स्टेप 4 मधील तक्त्याचा संदर्भ घ्या). पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.

Data responsive


टीप:

  • ओटीपी फक्त 15 मिनिटांसाठी वैध असतील.
  • अचूक ओटीपी प्रविष्ट करण्यासाठी तुमच्याकडे 3 संधी आहेत.
  • स्क्रीनवरील ओटीपी कालबाह्य होण्याचा काउंटडाऊन टायमर तुम्हाला ओटीपी कालबाह्य होण्यासाठी किती वेळ शिल्ल्क आहे, हे दर्शवतो.
  • ओटीपी पुन्हा पाठवा वर क्लिक केल्यावर, एक नवीन ओटीपी जनरेट करून पाठवला जाईल.
  • तुम्ही अनोंदणीकृत वापरकर्ता असाल, तर ERI ने तुम्हाला क्लायंट म्हणून जोडताना वापरलेल्या ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरवर प्राप्त झालेले दोन वेगळे 6-अंकी ओटीपी प्रविष्ट करावे लागतील.

स्टेप 5b: जर ERI ने तुमच्या वतीने आयकर फॉर्म फाइल करणे, परतावा पुन्हा जारी करण्याची विनंती, दुरुस्तीची विनंती, मुदत संपल्यानंतर ITR फाइल करण्यासाठी विलंब माफीची विनंती यांसारख्या सेवा करण्याची विनंती केली असेल, तर तुम्हाला उपलब्ध पर्यायांचा वापर करून त्या विनंतीची ई-पडताळणी करावी लागेल.

टीप: अधिक जाणून घेण्यासाठी ई-पडताळणी कशी करावी ह्या वापरकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घ्या.


यशस्वी पडताळणीनंतर, व्यवहार आयडीसह एक यशस्वीतेचा संदेश दर्शविला जाईल. कृपया भविष्यातील संदर्भासाठी हा 'व्यवहार आयडी' नोंदवून ठेवा. तसेच, ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर तुम्हाला एक पुष्टीकरण संदेश देखील प्राप्त होईल.

Data responsive


4. संबंधित विषय