Do not have an account?
Already have an account?

1. अवलोकन

स्टॅटिक पासवर्ड जनरेट करासेवा हा ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करताना दोन-घटक प्रमाणीकरणासाठी (आपल्या ई-फाइलिंग पासवर्डसाठी अतिरिक्त सुरक्षा कवच) उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांपैकी एक आहे. OTP प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे चांगली मोबाइल नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसल्यास स्थिर पासवर्ड उपयुक्त आहे. ई-फाइलिंग पोर्टलवर सर्व नोंदणीकृत वापरकर्त्यांना ही सेवा उपलब्ध आहे (लॉग इन नंतर).

2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्वअट

  • ई-फाइलिंग पोर्टलवर वैध वापरकर्ता ID आणि पासवर्ड असणारा नोंदणीकृत वापरकर्ता

3. क्रमानुसार- मार्गदर्शक

स्टेप 1: आपला वापरकर्ता ID आणि पासवर्ड वापरुन ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा.

Data responsive


स्टेप 2: डॅशबोर्ड वरुन माझी प्रोफाइल पेजवर जा.

Data responsive


स्टेप 3: स्टॅटिक पासवर्ड यावर क्लिक करा.

Data responsive


स्टेप 4: स्टॅटिक पासवर्डसंबंधी सूचनांची यादी आणि हे कुठे वापरता येईल हे स्टॅटिक पासवर्ड पेजवर दिसेल. सूचना काळजीपूर्वक वाचा आणि स्टॅटिक पासवर्ड जनरेट करा यावर क्लिक करा.

Data responsive


स्टॅटिक पासवर्ड यशस्वीरित्या जनरेट झाल्यांनतर तसे दर्शवणारा संदेश दिसेल.

Data responsive


टीप:

  • आपल्या ई-फाइलिंग वर नोंदणीकृत असलेल्या ईमेल ID वर आपल्याला सिस्टीमद्वारे जनरेट केलेले 10 स्टॅटिक पासवर्ड प्राप्त होतील.
  • लॉग इनसाठी आपण कोणत्याही एका वेळी वापरू शकता. तथापि, तेच स्टॅटिक पासवर्ड पुन्हा वापरला जाऊ शकत नाही.
  • आपल्याला पाठवलेले स्टॅटिक पासवर्ड्स जनरेट केलेल्या तारखेपासून 30 दिवसांसाठी सक्रिय असतील.
  • आपण सर्व 10 पासवर्ड वापरल्यानंतर किंवा 30 दिवस झाल्यांनतर (जे आधी होईल ते), आपण पुन्हा स्टॅटिक पासवर्ड जनरेट करू शकतो.


स्टेप5: आपल्याकडे न वापरलेले स्थिर पासवर्ड असल्यास, आपल्याकडे किती पासवर्ड आहेत, आणि ते कालबाह्य होण्यापूर्वी किती दिवस आहेत (30 पैकी) असा संदेश तेथे असेल.आपल्या ई-फाइलिंग वर नोंदणीकृत असलेल्या ईमेल ID वर न वापरलेल्या स्टॅटिक पासवर्डची यादी प्राप्त करण्यासाठी, स्टॅटिक पासवर्ड पुन्हा पाठवा यावर क्लिक करा.

Data responsive


आता आपल्याला ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या ईमेल ID वर न वापरलेले स्टॅटिक पासवर्ड प्राप्त होतील.

Data responsive


4. संबंधित विषय