Do not have an account?
Already have an account?

आपल्या अधिकारक्षेत्रातील निर्धारण अधिकाऱ्याबद्दल (JAO) जाणून घ्या

(आपल्या अधिकारक्षेत्रातील AO ला सेकंदांमध्ये शोधून काढा)

(आपल्या अधिकारक्षेत्रातील AO ला सेकंदांमध्ये शोधून काढा)

Frequently Asked Questions

तुमच्या JAO विषयी जाणून घ्या - वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. अधिकारक्षेत्रीय निर्धारण अधिकारी (JAO) कोण असतो?

अधिकारक्षेत्रीय निर्धारण अधिकारी (JAO) हा आयकर विभागातील अधिकारी असून, त्याच्या/तिच्या अधिकारक्षेत्रातील करदात्यांनी फाईल केलेली आयकर विवरणपत्रे योग्य आणि अचूक आहेत याची खात्री करण्याची जबाबदारी त्याच्यावर/तिच्यावर असते.

2. मला माझ्या JAO शी संपर्क कधी साधावा लागतो?

तुमच्या आयकर विवरणपत्राच्या फायलिंगसंदर्भात कोणतीही समस्या नसल्यास, तुम्हाला तुमच्या JAO शी संपर्क साधण्याची आवश्यकता नाही. सर्वसाधारणपणे, आयकर विभाग (ITD) करदात्यांना सर्व सेवा ऑनलाइन आणि प्रत्यक्ष संपर्काशिवाय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. तथापि, काही अपवादात्मक परिस्थितींमध्ये आयकर विभाग तुम्हाला तुमच्या अधिकारक्षेत्रीय निर्धारण अधिकाऱ्याशी (JAO) संपर्क साधण्यास सांगू शकतो.

3. तुमचे JAO जाणून घ्या ही सेवा वापरण्यासाठी मला ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेला मोबाईल क्रमांकच वापरावा लागेल का?

या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कोणताही वैध मोबाईल क्रमांक वापरू शकता.

4. मी दुसऱ्या शहरात/राज्यात स्थलांतरित झालो/झाले आहे. मला माझा JAO बदलण्याची आवश्यकता आहे का?

होय. तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात राहायला गेल्यास आणि तुमचा कायमचा किंवा निवासी पत्ता बदलल्यास, तुमचा पॅन नव्या JAO कडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे. साधारणपणे आयकर विभागाच्या बहुतांश सेवा ऑनलाइन उपलब्ध असतात. मात्र, काही प्रसंगी तुम्हाला तुमच्या JAO शी संपर्क साधावा लागू शकतो. त्यामुळे गरज पडल्यास जवळच्या आणि योग्य JAO शी संपर्क साधता यावा यासाठी तुमचा पॅन नव्या अधिकारक्षेत्रात हस्तांतरित करून घेणे फायदेशीर ठरते.

5. आयकर वॉर्ड/सर्कल म्हणजे काय?

आयकराशी संबंधित सेवा आणि कामकाजाचे प्रभावी प्रशासन करण्यासाठी, निश्चित करण्यात आलेल्या अधिकारक्षेत्रानुसार देशभरात विविध वॉर्ड आणि सर्कल निर्माण करण्यात आले आहेत. प्रत्येक वॉर्ड/सर्कलसाठी एक अधिकारक्षेत्रीय निर्धारण अधिकारी (AO) नियुक्त केलेला असतो आणि तो आयकर उपायुक्त (DCIT), आयकर सहाय्यक आयुक्त (ACIT) किंवा आयकर अधिकारी (ITO) असू शकतो.

6. माझा पॅन नव्या JAO कडे हस्तांतरित करण्यासाठी मला काय करावे लागेल?

तुमचा पॅन सध्याच्या अधिकारक्षेत्रीय निर्धारण अधिकाऱ्याकडे (AO) हस्तांतरित करण्यासाठी तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल. या प्रक्रियेमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो:

  1. पत्ता बदलल्यामुळे तुमचा पॅन नव्या अधिकारक्षेत्रात हस्तांतरित करण्याची विनंती करणारा अर्ज तुमच्या सध्याच्या JAO कडे सादर करा.
  2. नव्या JAO कडे अर्ज सादर करून, पॅन हस्तांतरणासाठी विद्यमान JAO कडे आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती करा.
  3. या अर्जास विद्यमान JAO ची मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
  4. मंजुरी मिळाल्यानंतर हा अर्ज आयकर आयुक्तांकडे पाठवला जातो.
  5. आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर तुमचा JAO बदलला जातो

तुमच्या नव्या पत्त्यानुसार तुमचा पॅन नव्या JAO कडे हस्तांतरित करण्यासाठी विद्यमान JAO कडे लेखी अर्ज करणे आवश्यक आहे.

7.माझा पॅन नव्या JAO कडे हस्तांतरित झाल्याचे मला कसे कळेल?

तुमच्या पॅनसाठी असलेल्या अधिकारक्षेत्रीय निर्धारण अधिकाऱ्याबाबतची सद्यस्थिती ई-फायलिंग पोर्टलवरील > 'तुमचे JAO जाणून घ्या' या सेवेद्वारे तपासता येते. ही सेवा वापरण्यासाठी नोंदणी करणे किंवा लॉगिन करणे आवश्यक नाही.

 

Detailed guides and documentation