आपल्या PAN ची पडताळणी करा.
(PAN पडताळणी झाली सोपी)
(PAN पडताळणी झाली सोपी)
तुमच्या पॅनची पडताळणी करण्यासंबंधी वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. मला माझ्या पॅनची पडताळणी करणे आवश्यक का आहे?
तुम्ही तुमच्या पॅनची पडताळणी येथे करू शकता:
- तुमच्या पॅनचे तपशील, जसे की पॅन कार्डवरील नाव, जन्मतारीख हे पॅन डेटाबेसमध्ये उपलब्ध असलेल्या तपशीलांशी जुळत आहेत की नाही हे तपासा.
- तुमचे पॅन सक्रिय आहे की नाही याची पडताळणी करा.
2. पॅनच्या पडताळणीसाठी ई-फाइलिंग पोर्टलवर माझा मोबाईल नंबर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे का?
तुम्ही पडताळणी दरम्यान तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही वैध मोबाईल नंबर वापरू शकता, ज्यावर तुम्हाला एक ओटीपी प्राप्त होईल (हा ओटीपी जास्तीत जास्त तीन प्रयत्नांसह 15 मिनिटांसाठी वैध असेल).
3.एका वैयक्तिक करदात्यासाठी, एकाच मोबाईल नंबरद्वारे पडताळणी करता येणाऱ्या पॅनच्या संख्येवर काही मर्यादा आहे का?
होय. तुम्ही एका दिवसात एकच मोबाईल नंबर वापरुन जास्तीत जास्त 5 वेगवेगळ्या पॅनची पडताळणी करू शकता.
4. बाहेरील संस्था म्हणून, मी वापरकर्त्याच्या पॅनची पडताळणी करू शकेन का?
होय, पॅन पडताळणी सेवा बाहेरील संस्थांसह सर्व नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. बल्क पॅन / टॅन पडताळणी ही बाहेरील संस्थांसाठी एक स्वतंत्र सेवा आहे आणि त्यासाठी विभागाची मंजुरी आवश्यक आहे.
5. मी माझ्या पॅनचे तपशील ऑनलाइन कसे पाहू शकेन?
तुम्ही ई-फाइलिंग पोर्टलवर उपलब्ध असलेल्या तुमचे पॅन जाणून घ्या सेवेला भेट देऊ शकता. तुमचे पॅन वैध आहे की नाही हे तपासण्यासाठी देखील तुम्ही या सेवेचा वापर करू शकता.