कलम 12A अंतर्गत फॉर्म 10A साठी माफीची विनंती
कलम 12A अंतर्गत फॉर्म 10A साठी माफीच्या विनंतीबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. मी फॉर्म 10A साठी माफीची विनंती ऑफलाइन पद्धतीने फाइल करू शकेन का?
नाही, फॉर्म 10A साठी माफीची विनंती ऑफलाइन पद्धतीने फाइल करता येत नाही, केवळ ऑनलाइन पद्धतीचाच पर्याय उपलब्ध आहे.
2.माफीची विनंती फाइल करताना कोणतेही अनिवार्य जोडपत्र जोडणे आवश्यक आहे का?
जर करदात्याने अनुक्रमांक 2(f) वरील "फॉर्म आधीच भरला गेला आहे का?" या प्रश्नाच्या उत्तरात 'होय' पर्याय निवडला असेल, तर भरलेल्या फॉर्मची PDF कॉपी अपलोड करणे अनिवार्य आहे.
3. फाइल केलेला माफीचा विनंती अर्ज करदाता कसा डाउनलोड करू शकतो?
ज्या करदात्याने माफीची विनंती सबमिट केली असेल, तर तो खालीलमार्गे फॉर्म डाउनलोड करू शकतो: डॅशबोर्ड --> सेवा --> माफीची विनंती --> वैधानिक फॉर्मचा अर्ज --> दाखल केलेल्या माफी विनंतीसमोरील 'तपशील पहा' बटणावर क्लिक करा.-->'फॉर्म डाउनलोड करा' बटणावर क्लिक करा.
4. एखादा करदाता माफीच्या अर्जाची मंजुरी किंवा अस्वीकार आदेश कसा पाहू शकतो?
करदाता खालीलमार्गे मंजुरी/अस्वीकार आदेश मिळवू शकतो:
डॅशबोर्ड --> सेवा --> माफीची विनंती --> वैधानिक फॉर्मसाठी अर्ज --> मंजूर/अस्वीकारलेल्या माफीच्या अर्जासमोरील नोटमध्ये दिलेल्या 'येथे क्लिक करा' बटणावर क्लिक करा --> तुमच्या माहितीसाठी -->'डाउनलोड समाप्ती आदेश' बटणावर क्लिक करा.
5. एखादा करदाता अनेक माफीचे अर्ज फाइल करू शकतो का?
हो, एखादा करदाता वेगवेगळ्या निर्धारण वर्ष आणि कलम कोडच्या संयोजनासाठी एकापेक्षा जास्त माफीचे अर्ज सादर करू शकतो.
6. माफीची विनंती मंजूर झाल्यानंतर फॉर्म 10A कसा भरावा?
माफीच्या अर्जाची मंजुरी मिळाल्यानंतर, करदात्याला फॉर्म 10A भरण्यासाठी खालील स्टेप्स चे अनुसरण करावे लागेल: डॅशबोर्ड --> आयकर फॉर्म्स --> आयकर फॉर्म फाइल करा -->;
आयकर कायदा 1961 नुसार फॉर्म्स --> फॉर्म 10A --> आता फाइल करा.
आता तुम्हाला फॉर्म 10A च्या मुख्य स्क्रीनवर नेले जाते:
A) फाइलिंगचा प्रकार म्हणून माफी निवडा आणि “आधीच मंजूर करण्यात आलेली माफी विनंती” हा माफीचा प्रकार म्हणून निवडा.
B) “DIN क्रमांक मिळवा” बटणावर क्लिक करा.
C) मंजूर झालेल्या माफीच्या अर्जांचे DIN क्रमांक DIN क्रमांकाच्या ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये दिसू लागतील.
D) DIN नंबर निवडल्यानंतर, मंजूर झालेल्या माफीच्या DIN नंबरसमोरील माफीचे वर्ष आपोआप भरले जाईल. यानंतर तुम्ही फॉर्म 10A भरण्यासाठी पुढे जाऊ शकता.
टीप: मंजूर झालेल्या माफीच्या विनंतीशी लिंक असलेला DIN क्रमांक वापरून एकदा फॉर्म 10A भरल्यानंतर, फॉर्म 10A मागे घेतल्याशिवाय तोच DIN नंबर पुन्हा वापरून फॉर्म भरता येणार नाही. कृपया खालील स्क्रीनशॉटचा संदर्भ घ्या:

शब्दावली
| संक्षेप/संक्षिप्त रूप | वर्णन/पूर्ण फॉर्म |
| AO | निर्धारण अधिकारी |
| AY | निर्धारण वर्ष |
| CA | सनदी लेखापाल |
| CPC | केंद्रीकृत प्रक्रिया केंद्र |
| EVC | इलेक्ट्रॉनिक पडताळणी कोड |