Do not have an account?
Already have an account?

फॉर्म 10BB (A.Y. 2023-24 पासून)

फॉर्म 10BB (निर्धारण वर्ष 2023-24 पासून पुढे) बाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. पुनर्सूचित फॉर्म 10BB कोणत्या निर्धारण वर्षापासून लागू होतो?

दिनांक 21फेब्रुवारी 2023 च्या अधिसूचना क्र. 7/2023 द्वारे अधिसूचित फॉर्म 10BB हा निर्धारण वर्ष 2023-24 पासून पुढे लागू होतो.

2.अधिसूचना क्र. 7/2023 जारी होण्यापूर्वी जो फॉर्म 10BB दाखल केला जात होता, तो अजूनही ई-फाइलिंग पोर्टलवर उपलब्ध आहे का?

सध्याचा फॉर्म 10BB हा पोर्टलवर उपलब्ध आहे आणि तो फक्त निर्धारण वर्ष 2022-23 पर्यंत लागू आहे.

निर्धारण वर्ष 2022-23 पर्यंतच्या फाइलिंग्ससाठी, फॉर्म 10BB ई-फाइलिंग पोर्टलवर उपलब्ध आहे आणि अशा प्रकारे ॲक्सेस केला जाऊ शकतो-

सीएकडे सोपवण्यासाठी “ई-फाइल -----> आयकर फॉर्म ----> आयकर फॉर्म भरा ---> आयकर अधिनियम १९६१ नुसार फॉर्म----> फॉर्म 10BB”.

 किंवा

वैकल्पिकरित्या, हा फॉर्म "माझा सीए" प्रक्रिया वापरून देखील नियुक्त केला जाऊ शकतो.

3.लेखा परीक्षण केली जाणारी संस्था/ व्यक्तीस अधिसूचना क्रमांक 7/2023 अनुसार 10BB केव्हा फाइल करणे आवश्यक आहे?

निर्धारण वर्ष 2023-24 पासून पुढे खाली उल्‍लेखित अटींपैकी कोणतीही अट पूर्ण झाल्‍यास पुनर्सूचित केलेला फॉर्म 10Bलागू होईल-

  1. लागू असलेल्या संबंधित खंड/कलम प्रभाव विचारात न घेता, लेखा परीक्षण केली जाणारी संस्था/ व्यक्तीचे एकूण उत्पन्न-
  1. कलम 10 च्या खंड 23C मधील उप-खंड (iv), (v), (vi) आणि (via)
  2. अधिनियमाची कलमे 11 आणि 12,

मागील वर्षांमध्ये पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त

  1. लेखा परीक्षण केली जाणारी संस्था/ व्यक्तीस मागील वर्षादरम्यान कोणतेही परदेशी योगदान प्राप्त झाले आहे
  2. लेखा परीक्षण केले जाणाऱ्या व्यक्ती /संस्थेने मागील वर्षादरम्यान आपल्या उत्पन्नाचा कोणताही भाग भारताबाहेर वापरला आहे.

    इतर सर्व प्रकरणांसाठी, पुनर्सूचित फॉर्म क्र. 10BB लागू असेल.

    अधिक माहितीसाठी, तुम्ही आयकर नियम, 1962 च्या नियम 16CC आणि नियम 17B चा संदर्भ घेऊ शकता.

4. ई-फाइलिंग पोर्टलवर फॉर्म 10BB (निर्धारण वर्ष 2023-24 पासून पुढे) फाइल करण्याची प्रक्रिया काय आहे?

फॉर्म 10BB (निर्धारण वर्ष 2023-24 पासून पुढे) फाइल करण्यासाठी खालील स्टेप्स आहेत:

स्टेप 1) करदात्याचे लॉगिन: सीएला फॉर्म नेमून द्या. फॉर्म दोनपैकी कोणत्याही एका पद्धतीने नेमून दिला जाऊ शकतो-

  1. ई-फाइल-----> आयकर फॉर्म्स----> आयकर फॉर्म्स फाइल करा ---> आयकर अधिनियम 1961) ----> फॉर्म 10BB (निर्धारण वर्ष 2023-24 पासून)
  2. अधिकृत भागीदार-----> माझे सनदी लेखापाल -----> सीए जोडा (जर जोडलेले नसतील तर)-----> आयकर अधिनियम 1961 नुसार फॉर्म्स-----> फॉर्म 10BB नियुक्त करा (निर्धारण वर्ष 2023-24 पासून)

स्टेप 2) सीए लॉगिन: सीएला असाइनमेंट स्वीकारावे लागेल आणि कार्यसूचीमधील “आपल्या कृतीसाठी” टॅबमधून फॉर्म अपलोड करावा लागेल.

स्टेप 3) करदात्याचे लॉगिन: करदात्याला कार्यसूची मधील “आपल्या कृतीसाठी” टॅबमधून सीएद्वारे अपलोड केलेला फॉर्म स्वीकारावा लागेल.

फॉर्म उशिरा सादर केल्यामुळे उद्भवणारे परिणाम टाळण्यासाठी, कृपया कलम 44AB मध्ये नमूद केलेल्या तारखेपूर्वी, म्हणजेच कलम 139 च्या उप-कलम (1) अन्वये उत्पन्न विवरणपत्र सादर करण्याच्या अंतिम तारखेच्या एक महिन्या आधीची तारीख, या आधी फॉर्म अपलोड आणि स्वीकारला जाईल याची खात्री करा.

5. वरील प्रश्‍न क्रमांक 3 मध्‍ये संदर्भित "लेखा परीक्षण केली जाणारी संस्था/ व्यक्ती" कोण आहे?

कलम 10 च्या खंड (23C) च्या उपखंड (iv), (v), (vi) किंवा (via) संदर्भित कोणताही निधी किंवा संस्था अथवा न्यास किंवा कोणतेही विद्यापीठ किंवा इतर शैक्षणिक संस्था किंवा कोणतेही रुग्णालय किंवा इतर वैद्यकीय संस्था कायदा किंवा कायद्याच्या कलम 11 किंवा 12 मध्ये संदर्भित केलेला कोणताही न्यास किंवा संस्था यांना फॉर्ममध्ये "लेखा परीक्षण केली जाणारी संस्था" म्हणून संबोधण्यात येईल.

6. पुनर्सूचित फॉर्म 10BB च्या संदर्भात प्रश्न क्रमांक 3 मध्ये नमूद केलेल्या "परदेशी योगदान" याचा अर्थ काय आहे?

नियम 16CC आणि नियम 17B साठी, परदेशी योगदान (नियमन) अधिनियम, 2010 (2010 च्या 42) च्या कलम 2 च्या उप-कलम (1) च्या खंड (h) मध्ये "परदेशी योगदान" या शब्दाचा समान अर्थ असेल.

7. फॉर्म 10BB (निर्धारण वर्ष 2023-24 पासून पुढे) फाइल करण्याची अंतिम तारीख काय आहे?

फॉर्म 10BB हा कलम 44AB मध्ये नमूद केलेल्या निर्दिष्ट तारखेपूर्वी म्हणजेच कलम 139(1) अंतर्गत विवरणपत्र फाइल करण्याच्या अंतिम तारखेच्या एक महिन्याआधी दाखल केला पाहिजे.

8. फॉर्म 10BB (निर्धारण वर्ष 2023-24 पासून) फाइल करण्याची प्रक्रिया कधी पूर्ण झाली असे मानले जाते?

करदात्याकडून सीएद्वारे अपलोड केलेला फॉर्म स्वीकारला जातो आणि ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत सक्रिय DSC किंवा EVC द्वारे त्याची पडताळणी केली जाते तेव्हाच फॉर्मचे फाइलिंग पूर्ण झाले आहे असे मानले जाते.

9. फॉर्म 10BB (निर्धारण वर्ष 2023-24 पासून पुढे) यासाठी पडताळणीच्या कोणत्या पद्धती उपलब्ध आहेत?

फॉर्म 10BB (निर्धारण वर्ष 2023-24 पासून पुढे) यासाठी पडताळणीच्या पद्धती:

  • सीएसाठी, फॉर्म अपलोड करण्यासाठी फक्त DSC पर्याय उपलब्ध आहे.
  • करदात्यांसाठी (लेखा परीक्षण केली जाणारी व्यक्ती) कंपन्यांव्यतिरिक्त, सीएने अपलोड केलेला फॉर्म स्वीकारण्यासाठी DSC आणि EVC दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
  • कंपन्यांसाठी, सीएद्वारे अपलोड केलेला फॉर्म स्वीकारण्यासाठी फक्त DSC पर्याय उपलब्ध आहे.

10.मी गेल्या वर्षी फॉर्म 10BB फाइल केला आहे. निर्धारण वर्ष 2023-24 किंवा त्यानंतरच्या निर्धारण वर्षांसाठी, 10B किंवा 10BB या दोन्हीपैकी, कोणता फॉर्म फाइल करणे आवश्यक आहे?

आयकर दुरुस्ती (तिसरी दुरुस्ती) नियम, 2023 द्वारे नियम 16CC आणि नियम 17B मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. मागील निर्धारण वर्षांमध्ये कोणता फॉर्म फाइल गेला असला तरीही, निर्धारण वर्ष 2023-24 पासून लागू फॉर्म 10B आणि 10BB लागू करण्याचा निर्णय सुधारित नियम 16CC आणि नियम 17B च्या आधारे घेतला जाईल.

11. ज्या अनुसूचींमध्ये तक्ता आहे, म्हणजेच जिथे “तपशील समाविष्ट करा” आणि “CSV अपलोड करा” हे पर्याय एकत्र आहेत, त्या अनुसूचींसाठी नोंदी कशा द्यायच्या?

अनुक्रमांक 23(vii), अनुक्रमांक 23(viii) आणि अनुक्रमांक 32 मधील सर्व अनुसूचींसाठी, कृपया खालील गोष्टींची नोंद घ्या:-

  1. 50 पर्यंतच्या नोंदींसाठी: तक्ता किंवा CSV यांपैकी कोणताही पर्याय वापरता येईल. दोन्ही प्रकरणांमध्ये, डेटा तकत्यामध्ये दिसून येईल.
  2. 50 पेक्षा जास्‍त नोंदींसाठी: केवळ CSV पर्यायाचा वापर केला जाऊ शकतो. माहिती CSV जोडपत्राच्‍या रूपातच दाखविली जाईल.
  3. CSV पर्याय अपलोड करा वापरताना, खालील स्टेप्सचे अनुसरण करा:-

"एक्सेल टेम्पलेट डाउनलोड करा -> नोंदी समाविष्ट करा -> एक्सेल टेम्पलेटला .csv फाइलमध्ये रूपांतरित करा -> .csv फाइल अपलोड करा”

  1. जेव्हा कोणतीही CSV फाइल अपलोड केली जाते, तेव्हा ती विद्यमान नोंदी/ माहितीची जागा घेते. म्हणजेच, तुमच्या जुन्या नोंदी काढून टाकल्या जातील आणि नवीन CSV फाइलद्वारे अपलोड केलेली माहितीच अंतिम ग्राह्य धरली जाईल.

12. फाइल केलेल्या फॉर्म 10BB (निर्धारण वर्ष 2023-24 पासून पुढे) यामध्ये सुधारणा केली जाऊ शकते का?

होय, फाइल केलेल्या फॉर्म 10BB साठी सुधारणेचा पर्याय उपलब्ध आहे.

13. फॉर्म फाइल करण्यासाठी काही सूचना किंवा मार्गदर्शन उपलब्ध आहेत का?

हो, एकदा सीएने हे काम स्वीकारले आणि आपल्या ARCA लॉग-इनद्वारे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू केली, की त्यांना सूचनांची फाइल डाउनलोड करता येईल; जे स्क्रीनच्या वरच्या भागात उपलब्ध आहे, जिथे फॉर्म 10BB (निर्धारण वर्ष 2023-24 पासून) चे पॅनल्स दिले आहेत.

नमूद केलेल्या लिंकवर क्लिक करून, सूचना फाइल डाउनलोड केली जाऊ शकते.

14. फॉर्म फाइल करताना कोणतीही जोडपत्रे जोडणे आवश्यक आहे का?

होय, फॉर्मच्या "जोडपत्रे" पॅनेल अंतर्गत खालील जोडपत्रे जोडणे अनिवार्य आहे-

  1. उत्पन्न आणि खर्च खाते/नफा आणि तोटा खाते
  2. ताळेबंद

"विविध जोडपत्रे" नावाचा एक पर्यायी जोडपत्र पर्याय देखील आहे, जेथे इतर कोणतेही संबंधित दस्तऐवज जोडले जाऊ शकतात.

कृपया लक्षात घ्या की प्रत्येक जोडपत्राचा आकार 5 MB पेक्षा जास्त नसावा. सर्व जोडपत्रे केवळ PDF/ZIP स्वरूपात असावीत आणि ZIP फाइलमधील सर्व फाइल्स फक्त PDF स्वरूपातील असाव्यात.

15. फॉर्म 10BB (निर्धारण वर्ष 2023-24 पासून पुढे) फाइल केल्यानंतर फाइल केलेल्या फॉर्मचे तपशील कोठे पाहायचे?

सीए आणि करदात्याच्या लॉगिन अंतर्गत, 'ई-फाइल' टॅबमधील 'आयकर फॉर्म्स' ---> 'फाइल केलेले फॉर्म्स पहा' ---> आयकर अधिनियम 1961 नुसार फॉर्म्स' या मार्गाद्वारे दाखल केलेल्या फॉर्मचा तपशील पाहता येतो.

16. मला फॉर्म 10BB (निर्धारण वर्ष 2023-24 पासून पुढे) याची ऑफलाइन उपयुक्तता कशी डाउनलोड करता येईल?

आयकर विभागाच्या मुख्य पृष्ठावर जा -----> 'डाउनलोड्स' वर जा -----> 'आयकर फॉर्म्स' वर जा -----> 'फॉर्म 10BB (निर्धारण वर्ष 2023-24 पासून पुढे)' निवडा -----> 'फॉर्म उपयुक्तता' वर जा.

वैकल्पिकरित्या, फॉर्म अपलोड करताना सीए ऑफलाइन फाइलिंग पर्यायाच्या अंतर्गत 'डाउनलोड करा' बटणावर क्लिक करून ॲक्सेस करू शकतो.

टीप: कृपया खात्री करा की, तुम्ही नेहमी ई-फाइलिंग पोर्टलवर उपलब्ध असलेल्या उपयुक्ततेची नवीनतम आवृत्ती वापरत आहात.

17. फॉर्म 10BB (निर्धारण वर्ष 2023-24 पासून पुढे) हा ERI द्वारे म्हणजे तृतीय-पक्ष सॉफ्टवेअरद्वारे फाइल केला जाऊ शकतो का?

होय, हा फॉर्म "ऑफलाइन" फाइलिंग मोड वापरून ERI द्वारे देखील फाइल केला जाऊ शकतो.

18. माझे उत्पन्न विहित सूट मर्यादेपेक्षा कमी असल्यास फॉर्म 10BB दाखल करणे आवश्यक आहे का?

फॉर्म 10BB लागू होण्यासाठी कृपया आयकर नियम, 1962 च्या नियम 16CC आणि नियम 17B सह आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 10 च्या कलम (23C) च्या दहाव्या तरतुदीच्या खंड (b) च्या संबंधित तरतुदी आणि कलम 12A(1) च्या खंड (b) चा उप-खंड (ii) वाचा.

19. फॉर्म 10BB मध्ये, 'लेखापालाचा अहवाल' पॅनलच्या खाली, "सोसायटी/कंपनी/ना-नफा संस्था /इत्यादी" निवडण्याचा पर्याय नाही. मी कोणता पर्याय निवडावा?

फॉर्म 10BB "लेखापालाचा अहवाल" पॅनेल अंतर्गत लेखापरीक्षण केल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या तपशीलांची निवड करण्यासाठी खालील पर्याय आहेत- जसे की निधि, विश्वस्त मंडळ, संस्था, विद्यापीठ, इतर शैक्षणिक संस्था, रुग्णालय किंवा इतर वैद्यकीय संस्था.

ज्या संस्थेसाठी तात्पुरती/अंतिम नोंदणी मंजूर करण्यात आली होती त्या संस्थेच्या प्रकारानुसार किंवा संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या कामांच्या स्वरूपानुसार किंवा आधार म्हणून घेतलेल्या इतर कोणत्याही संबंधित घटकानुसार तुम्ही लेखापरीक्षण केल्या जाणाऱ्या संस्था/ व्यक्ती बाबत योग्य असेल ते निवडू शकता.

20.मला सबमिशनमध्ये अडचण येत आहे. फॉर्म सबमिट करताना, सिस्टम अवैध 'पूर्ण नाव', 'फ्लॅग', 'इनपुट', 'टक्केवारी', 'फ्लॅट', 'पत्ता ओळ' आणि 'पिन कोड' यांसारख्या त्रुटी दाखवत आहे.ही समस्या सोडवण्यासाठी मी काय करावे?

मुख्य व्यक्ती तपशिलांसह सर्व अनिवार्य फील्डसाठी करदाता आणि सनदी लेखापालाची प्रोफाइल पूर्ण असल्याची खात्री करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, जुना मसुदा हटवा आणि नवीन फॉर्म पुन्हा फाइल करण्याचा प्रयत्न करा.

21.कलम 13(3) मध्ये नमूद केलेल्या 'निर्दिष्ट व्यक्ती'चा तपशील फॉर्म 10BB मधील अनुक्रमांक 28 मध्ये देणे अनिवार्य आहे का, विशेषतः अशा परिस्थितीत जिथे कलम 13च्या पोट-कलम (1) मधील खंड (c) किंवा पोट-कलम (2) मध्ये नमूद केलेल्या अटी/निकष लागू होत नाहीत?

अनुक्रमांक 28 मध्ये नमूद केलेल्या निर्दिष्ट व्यक्तींचा तपशील देणे अनिवार्य आहे. आपण यापुढे 9 ऑक्टोबर 2023 च्या परिपत्रक क्रमांक. 17/2023 याचा संदर्भ घेऊ शकता आणि उपलब्ध असलेल्या व्यक्तींचे तपशील प्रदान केले जातील.

22. निर्धारण वर्ष 2023-24 साठी फॉर्म 10BB साठी UDIN कसे जनरेट करावे?

कृपया लक्षात घ्या की निर्धारण वर्ष 2023-24 पासून पुढे लागू असलेल्या पुनर्सूचित फॉर्म 10BB साठी, “UDIN तपशील पहा/अपडेट करा” मध्ये फॉर्मचे नाव “फॉर्म 10BB - कलम 10(23C) च्या दहाव्या परंतुकाच्या खंड (b) मधील उपखंड (iv)/(v)/(vi)/(via) आणि कलम 12A(1)(b)(ii)” निवडून UDIN जनरेट करणे आवश्यक आहे.