फॉर्म 52A
फॉर्म 52A संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. ई-फाइलिंग पोर्टलवरील फॉर्म 52A कोणी फाइल करणे आवश्यक आहे?
एखादी व्यक्ती एखाद्या आर्थिक वर्षात संपूर्ण कालावधीत किंवा त्याच्या कोणत्याही भागात सिनेमॅटोग्राफ चित्रपटाची निर्मिती करते किंवा कोणत्याही निर्दिष्ट उपक्रमात गुंतलेली असते किंवा दोन्ही करत असते, त्या व्यक्तीने अशा कामासाठी किंवा निर्दिष्ट उपक्रमासाठी नियुक्त केलेल्या प्रत्येक व्यक्तीस केलेल्या किंवा देय असलेल्या एकूण पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या सर्व पेमेंटचा तपशील सबमिट करणे आवश्यक आहे.
2. निर्दिष्ट उपक्रम म्हणजे काय?
निर्दिष्ट उपक्रम म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट, माहितीपट निर्मिती, दूरचित्रवाणी किंवा ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म अथवा तत्सम प्लॅटफॉर्मसाठी कार्यक्रम निर्मिती, क्रीडा स्पर्धांचे व्यवस्थापन, इतर सादरीकरण केली जाणरी कला किंवा केंद्र सरकारने राजपत्रात अधिसूचनेद्वारे निर्दिष्ट केलेला इतर कोणताही उपक्रम.
3. फॉर्म 52A फाइल करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
मागील वर्ष संपल्यानंतर 60 दिवसांच्या आत फॉर्म 52A फाइल करणे आवश्यक आहे.
4. फॉर्म 52A फाइल करण्यासाठी आवश्यक पूर्वअटी कोणत्या आहेत?
फॉर्म 52A फाइल करण्यासाठी पुढील पूर्वअटींची पूर्तता करणे आवश्यक आहे:
- करदात्याकडे पॅन असणे आवश्यक आहे.
- करदात्याचा पॅन सक्रिय असावा तसेच तो ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असावा.
5. ई-फाइलिंग पोर्टलवर फॉर्म 52A फाइल करण्याची प्रक्रिया काय आहे?
ई-फाइलिंग पोर्टलवर फॉर्म 52A ऑनलाइन फाइल करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहेत::
स्टेप 1: करदात्याने आयकर पोर्टलवर म्हणजेच www.incometax.gov.in वर पॅन हा वापरकर्ता ID म्हणून वापरून लॉगिन करावे.
स्टेप 2:ई-फाइल > आयकर फॉर्म्स >आयकर फॉर्म्स फाइल करा > आयकर अधिनियम, 1961 नुसार फॉर्म्स > फॉर्म 52A हे निवडा.
स्टेप 3:“मूलभूत माहिती”, “भाग - A”, “भाग - B” आणि “पडताळणी” या 4 विभागांमध्ये आवश्यक तपशील भरा आणि लागू असल्यास CSV फाइल्स जोडा.
स्टेप 4:पूर्वावलोकन स्क्रीनवरील तपशील तपासा आणि सर्व माहिती योग्यरित्या भरलेली असल्यास फॉर्मची ई-पडताळणी करण्यासाठी पुढे जा.
6. फॉर्म 52A ची पडताळणी कशी करता येईल?
तुम्ही EVC किंवा DSC चा वापर करून फॉर्म 52A ची ई-पडताळणी करू शकता.
अधिक माहितीसाठी ई-पडताळणी कशी करावी (https://www.incometax.gov.in/iec/foportal/mr/help/how-to-e-verify- your-e-filing-return) ही वापरकर्ता पुस्तिका पहा.
7. ई-फाइलिंग पोर्टलवर फॉर्म 52A फाइल करण्यासाठी कोणती माहिती/तपशील आवश्यक आहेत?
फॉर्म 52A फाइल करण्यासाठी पुढील माहिती/तपशील आवश्यक आहेत:
- मागील वर्षात निर्मिती केलेल्या सर्व सिनेमॅटोग्राफ चित्रपटांचा किंवा हाती घेतलेल्या निर्दिष्ट उपक्रमांचा, अथवा दोन्हींचा तपशील. यामध्ये चित्रपटाचे नाव किंवा हाती घेतलेल्या निर्दिष्ट उपक्रमाचे नाव, काम सुरू झाल्याची तारीख आणि काम पूर्ण झाले असल्यास पूर्ण झाल्याची तारीख यांचा समावेश असावा.
- सिनेमॅटोग्राफ चित्रपटांच्या निर्मितीसाठी किंवा हाती घेतलेल्या निर्दिष्ट उपक्रमांसाठी नियुक्त केलेल्या आणि ज्यांना ₹50,000 पेक्षा अधिक रक्कम अदा करण्यात आली आहे किंवा द्यायची बाकी आहे, अशा व्यक्तींचे नाव, पॅन, आधार (उपलब्ध असल्यास) आणि पत्ता.
- अशा व्यक्तींना रोख स्वरूपात अदा केलेली रक्कम/ रोखीव्यतिरिक्त इतर माध्यमांतून अदा केलेली रक्कम/ त्यांना देणे बाकी असलेली असलेली रक्कम.
- अशा व्यक्तींना अदा केलेल्या/ देय असलेल्या रकमेवरील स्रोतावर कपात केलेल्या करांचे तपशील. यामध्ये कपात केलेल्या कराची रक्कम आणि ती कोणत्या कलमांतर्गत कपात करण्यात आली आहे याचा समावेश असावा.
8. फॉर्म 52A च्या भाग – A मध्ये तपशील भरण्याची प्रक्रिया काय आहे?
वर्षभरात निर्मिती केलेल्या सिनेमॅटोग्राफ चित्रपटांचा किंवा हाती घेतलेल्या निर्दिष्ट उपक्रमांचा तपशील देण्यासाठी पुढील 2 पर्यायांचा करदाता वापर करू शकतो:
- तपशील समाविष्ट करा:
- तपशील समाविष्ट करा: करदात्याने निर्मिती केलेल्या प्रत्येक सिनेमॅटोग्राफ चित्रपटाचा किंवा केलेल्या प्रत्येक निर्दिष्ट उपक्रमाचा तपशील तक्त्यामध्ये स्वतंत्र ओळ जोडून मॅन्युअली भरावा.
- मूलभूत माहिती या पॅनलमध्ये नमूद केलेल्या सर्व सिनेमॅटोग्राफ चित्रपटांचा किंवा निर्दिष्ट उपक्रमांचा तपशील भरल्यानंतरच भाग – A सेव्ह करण्यासाठी “सेव्ह करा” हे बटण सक्रिय होईल.
- भाग – A मध्ये दिलेल्या सिनेमॅटोग्राफ चित्रपटांच्या/निर्दिष्ट उपक्रमांच्या तपशीलांची पडताळणी मूलभूत माहिती पॅनलमध्ये नमूद केलेल्या चित्रपटांच्या/निर्दिष्ट उपक्रमांच्या संख्येशी केली जाईल. सर्व सिनेमॅटोग्राफ चित्रपटांचा किंवा निर्दिष्ट उपक्रमांचा तपशील भरल्यानंतर “तपशील समाविष्ट करा” हे बटण निष्क्रिय होईल. तुम्हाला आणखी सिनेमॅटोग्राफ चित्रपट किंवा निर्दिष्ट उपक्रम जोडायचे असल्यास, प्रथम मूलभूत माहिती या पॅनलमधील संख्या दुरुस्त करा. त्यानंतर तुम्ही नवीन तपशील जोडू शकता.
- CSV समाविष्ट करा:
- करदात्याने निर्मिती केलेल्या सिनेमॅटोग्राफ चित्रपटांची किंवा हाती घेतलेल्या निर्दिष्ट उपक्रमांची नावे एक्सेल टेम्पलेटमध्ये नमूद करावीत.
- एक्सेल टेम्पलेटमधील सर्व तपशील भरल्यानंतर ती फाइल CSV स्वरूपात रूपांतरित करून अपलोड करावी.
- अपलोड केलेल्या CSV फाइलमध्ये कोणतीही त्रुटी नसल्याची पडताळणी झाल्यानंतरच “सेव्ह करा” बटण सक्रिय होईल.
कृपया लक्षात घ्या की, करदात्याने प्रथम तपशील समाविष्ट करा हा पर्याय निवडून काही सिनेमॅटोग्राफ चित्रपट किंवा निर्दिष्ट उपक्रमांचे तपशील जतन केले असतील आणि त्यानंतर CSV समाविष्ट करा हा पर्याय निवडला, किंवा याउलट केल्यास आधी निवडलेल्या पर्यायांतर्गत सेव्ह केलेला सर्व डेटा हटविला जाईल. अशा परिस्थितीत करदात्याला तपशील पुन्हा भरून भाग – A पुन्हा सेव्ह करावा लागेल.
9. भाग – A साठी CSV फाइल अपलोड करताना मला खालील त्रुटी येत आहेत. त्यांचा अर्थ काय आहे आणि त्या कशा दुरुस्त कराव्यात?
CSV मधील आवश्यक त्या सर्व दुरुस्त्या केल्यानंतर तुम्ही तीच फाइल पुन्हा अपलोड करून पाहू शकता. |
10. भाग – B साठी CSV फाइल अपलोड करताना “प्रत्येक सिनेमॅटोग्राफ चित्रपट/केलेल्या प्रत्येक निर्दिष्ट उपक्रमासाठी Part B CSV मध्ये किमान एक नोंद असणे आवश्यक आहे” असा त्रुटी संदेश दिसत आहे. याचा अर्थ काय आहे आणि ही त्रुटी कशी दुरुस्त करावी?
तुम्हाला पुढील 2 परिस्थितींमध्ये ही त्रुटी दिसू शकते:
अनुक्रमांक | परिस्थिती | उपाय / काय करावे |
1. | सिनेमॅटोग्राफ चित्रपटाचे/निर्दिष्ट उपक्रमाचे नाव भाग – A मध्ये नमूद केले आहे, परंतु त्यासंबंधित कोणताही तपशील भाग – B CSV मध्ये दिलेला नाही. | कृपया लक्षात घ्या की, सिनेमॅटोग्राफ चित्रपटाच्या निर्मितीसाठी किंवा निर्दिष्ट उपक्रमासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तींना ₹50,000 पेक्षा जास्त रकमेचे केलेले पेमेंट दर्शविणारी किमान एक नोंद असणे आवश्यक आहे. कृपया भाग – A मध्ये नमूद केलेल्या सर्व सिनेमॅटोग्राफ चित्रपटांचा किंवा निर्दिष्ट उपक्रमांचा तपशील भाग – B CSV मध्ये भरल्याची खात्री करा. |
2. | सिनेमॅटोग्राफ चित्रपटाच्या निर्मितीसाठी किंवा निर्दिष्ट उपक्रमासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तींना ₹50,000 पेक्षा जास्त रकमेच्या पेमेंटचे तपशील भाग – B CSV मध्ये दिले आहेत, परंतु संबंधित सिनेमॅटोग्राफ चित्रपटाचे किंवा निर्दिष्ट उपक्रमाचे नाव भाग A मध्ये नमूद केलेले नाही. | कृपया लक्षात घ्या की, भाग – A मध्ये नमूद केलेल्या सिनेमॅटोग्राफ चित्रपटांच्या किंवा निर्दिष्ट उपक्रमांच्या नावांची पडताळणी भाग – B मध्ये नमूद केलेल्या सिनेमॅटोग्राफ चित्रपटांच्या किंवा निर्दिष्ट उपक्रमांच्या नावांशी केली जाईल. कृपया सर्व सिनेमॅटोग्राफ चित्रपटांची किंवा निर्दिष्ट उपक्रमांची नावे भाग – A आणि भाग – B या दोन्ही ठिकाणी नमूद केल्याची खात्री करा. |
11. मी मूलभूत माहिती पॅनलमध्ये कोणताही बदल केल्यास भाग –A किंवा भाग – B मध्ये जोडलेली CSV फाइल का डिलीट होते?
कृपया लक्षात घ्या की, निर्मिती केलेल्या सिनेमॅटोग्राफ चित्रपटांची किंवा केलेल्या निर्दिष्ट उपक्रमांची संख्या आणि तपशील यांचे प्रमाणीकरण "मूलभूत माहिती", "भाग A" आणि "भाग - B" या तिन्ही पॅनलमध्ये केले जाते. करदात्याने मूलभूत माहिती किंवा भाग A पॅनलमध्ये नमूद केलेल्या चित्रपटांच्या किंवा निर्दिष्ट उपक्रमांच्या तपशीलांमध्ये कोणताही बदल केल्यास, भाग A आणि भाग - B मध्ये दिलेले तपशील हटविले जातील. अशा परिस्थितीत करदात्याने भाग A आणि भाग - B मध्ये तपशील पुन्हा भरावेत किंवा CSV फाइल पुन्हा जोडावी.
12.मागील वर्षात निर्मिती केलेल्या प्रत्येक सिनेमॅटोग्राफ चित्रपटासाठी किंवा केलेल्या प्रत्येक निर्दिष्ट उपक्रमासाठी मला स्वतंत्र फॉर्म 52A फाइल लागेल का?
नाही. मागील वर्षात निर्मिती केलेल्या प्रत्येक सिनेमॅटोग्राफ चित्रपटासाठी किंवा केलेल्या प्रत्येक निर्दिष्ट उपक्रमासाठी स्वतंत्र फॉर्म 52A फाइल करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक TAN साठी मागील वर्षात निर्मिती केलेल्या सर्व सिनेमॅटोग्राफ चित्रपटांचा आणि/किंवा केलेल्या सर्व निर्दिष्ट उपक्रमांचा तपशील एकत्रित करून त्या TAN नोंदणीसाठी स्वतंत्र फॉर्म 52A सबमिट करावा लागेल.
13. भाग – A किंवा भाग – B मध्ये CSV फाइल अपलोड केल्यानंतर मला त्रुटी असलेली फाइल का दिसत आहे?
भाग – A किंवा भाग – B मध्ये CSV फाइल अपलोड केल्यानंतर दिलेल्या तपशीलांचे प्रमाणीकरण केले जाते. प्रमाणीकरणादरम्यान कोणीतीही त्रुटी आढळल्यास, त्या त्रुटींचा तपशील तुम्हाला एक्सेल फाइलच्या स्वरूपात दिला जाईल. कृपया त्या एक्सेल फाइलमधील संबंधित ओळींमध्ये नमूद केलेल्या त्रुटी तपासून आवश्यक दुरुस्त्या करा. सर्व आवश्यक दुरुस्त्या पूर्ण झाल्यानंतर तीच फाइल पुन्हा अपलोड करण्याचा प्रयत्न करा.
भाग – A आणि भाग – B मध्ये उपलब्ध करून दिलेल्या CSV सूचना फाइल्स पाहू शकता. या फाइल्समध्ये अनिवार्यपणे भरणे आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील तसेच प्रत्येक स्वीकार्य फॉरमॅटची माहिती दिलेली आहे.