फॉर्म 10B (मूल्यांकन वर्ष 2023-24 नंतर)
फॉर्म 10B (निर्धारण वर्ष 2023-24 नंतर) याबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. कोणत्या निर्धारण वर्षापासून पुन्हा-अधिसूचित केलेला फॉर्म 10B लागू आहे?
दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजीच्या अधिसूचना क्रमांक 7/2023 द्वारे अधिसूचित करण्यात आलेला फॉर्म 10B हा निर्धारण वर्ष 2023-24 पासून म्हणजेच निर्धारण वर्ष 2023-24 आणि त्या नंतरच्या सर्व वर्षांकरिता लागू आहे.
2. अधिसूचना क्रमांक 7/2023 जारी करण्याआधी फाइल करण्यात येणारा फॉर्म 10B ई-फाइलिंग पोर्टलवर अजूनही उपलब्ध आहे का ?
होय, जुना फॉर्म 10B देखील पोर्टलवर उपलब्ध आहे आणि केवळ निर्धारण वर्ष 2022-23 पर्यंत लागू आहे.
निर्धारण वर्ष 2022-23 पर्यंत फाइल करण्यासाठी, फॉर्म 10B ई-फाइलिंग पोर्टलवर उपलब्ध आहे आणि येथे ॲक्सेस केला जाऊ शकतो-
“ ई-फाइल -----> आयकर फॉर्म्स -----> आयकर फॉर्म्स फाइल करणे -----> आयकर अधिनियम 1961 नुसार फॉर्म्स -----> फॉर्म 10B” सीए करिता फॉर्म नियुक्त करून देता येईल.
किंवा
वैकल्पिकरित्या, फॉर्म "माझे सीए" प्रक्रिया वापरून देखील नियुक्त केला जाऊ शकतो.
3. अधिसूचना क्र. 7/2023 द्वारे अधिसूचित करण्यात आलेला फॉर्म 10B हा लेखापरीक्षण करून घेणाऱ्या व्यक्तीने /संस्थेने कधी फाइल करणे आवश्यक असते?
निर्धारण वर्ष 2023-24 पासून पुढे खाली उल्लेखित अटींपैकी कोणतीही अट पूर्ण झाल्यास पुन्हा-अधिसूचित केलेला फॉर्म 10Bलागू होईल -
1. खालील उल्लेखित खंड /कलमांच्या तरतुदींचा विचार न करता लेखा परीक्षण केली जाणारी व्यक्ती/ संस्था यांचे एकूण उत्पन्न हे मागील वर्षादरम्यान ₹ 5 कोटींपेक्षा जास्त असल्यास, लागू असेल त्यानुसार-
a) कलम 10 च्या खंड 23C चे उपखंड(iv), (v), (vi) आणि (via)
b) अधिनियमातील कलम 11 आणि 12
2. लेखा परीक्षण केली जाणारी व्यक्ती/संस्था यांना मागील वर्षात कोणत्याही प्रकारचे परदेशी योगदान प्राप्त झाले असल्यास
3. लेखा परीक्षण केली जाणारी व्यक्ती/संस्था यांनी मागील वर्षात आपल्या उत्पन्नाचा कोणताही भाग भारताबाहेर वापरला असल्यास.
अधिक तपशीलांसाठी, तुम्ही आयकर नियम, 1962 चे नियम 16CC आणि नियम 17B पाहू शकता.
4.ई-फाइलिंग पोर्टलवर फॉर्म 10B (निर्धारण वर्ष 2023-24 पासून पुढे) फाइल करण्याची काय प्रक्रिया आहे?
फॉर्म 10B फाइल करण्यासाठी कृपया खालील स्टेप्सचे अनुसरण करा:
स्टेप 1) करदात्याचे लॉगिन: सीएला फॉर्म नेमून द्या. फॉर्म दोनपैकी कोणत्याही एका पद्धतीने नेमून दिला जाऊ शकतो-
a) ई-फाइल-----→ आयकर फॉर्म्स-----→ आयकर फॉर्म्स फाइल करा-----→ आयकर अधिनियम 1961 नुसार फॉर्म्स-----→ फॉर्म 10B (A.Y. 2023-24 पासून पुढे)
b) अधिकृत भागीदार-----→ माझे चार्टर्ड अकाउंटंट (सीए)-----→ सीए समाविष्ट करा (समाविष्ट केलेले नसल्यास)-----→ आयकर अधिनियम 1961 नुसार फॉर्म्स-----→ नेमून दिलेला फॉर्म 10B (A.Y. 2023-24 पासून पुढे)
स्टेप 2) सीए लॉगिन: सीए कार्यसूची मधील "तुमच्या कार्यवाहीसाठी" या टॅबच्या माध्यमातून नेमून दिलेल्या कामाचा स्वीकार करू शकतो किंवा अस्वीकार करू शकतो.
स्टेप 3) जर सीएने नेमून दिलेल्या कामाचा स्वीकार केला तर तिने/त्याने ऑफलाइन पद्धतीद्वारे फाइलिंग करताना PDF जोडपत्रांसह JSON अपलोड करणे आवश्यक आहे.
स्टेप 4) सीएने वैध जोडपत्रांसह JSON सबमिट केल्यानंतर करदात्याला कार्यसूचीमधील "तुमच्या कार्यवाहीसाठी" या टॅबद्वारे सीएने अपलोड केलेल्या फॉर्मचा स्वीकार /अस्वीकार करावा लागतो
5. वरील प्रश्न क्रमांक 3 मध्ये संदर्भित "लेखा परीक्षण केली जाणारी व्यक्ती/संस्था" कोण आहे?
कलम 10 च्या खंड (23C) च्या उपखंड (iv), (v), (vi) किंवा (via) संदर्भित कोणताही निधी किंवा संस्था अथवा न्यास किंवा कोणतेही विद्यापीठ किंवा इतर शैक्षणिक संस्था किंवा कोणतेही रुग्णालय किंवा इतर वैद्यकीय संस्था अधिनियम किंवा अधिनियमाच्या कलम 11 किंवा 12 मध्ये संदर्भित केलेला कोणताही न्यास किंवा संस्था यांना फॉर्ममध्ये "लेखापरीक्षण करणारी व्यक्ती" म्हणून संबोधण्यात येईल.
6. फॉर्म 10B (A.Y. 2023-24 पासून पुढे) फाइल करण्याची देय तारीख काय आहे?
फॉर्मची देय तारीख आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 139 च्या उप-कलम (1) अंतर्गत उत्पन्न विवरणपत्र सादर करण्याच्या देय तारखेच्या एक महिना आधी, म्हणजेच कलम 44AB मध्ये नमूद केलेल्या निर्दिष्ट तारखेच्या दिवशी किंवा त्यापूर्वी आहे.
7. नवीन फॉर्म 10B साठी ऑफलाइन युटिलिटी कशी डाउनलोड करावी?
होम | आयकर विभाग वर जा > डाउनलोड विभागावर जा > आयकर फॉर्म्स > फॉर्म 10B (A.Y.2023- 24 पासून पुढे) > फॉर्म युटिलिटी वर क्लिक करा.
वैकल्पिकरित्या, फॉर्म अपलोड करताना ऑफलाइन युटिलिटी पर्यायाखालील डाउनलोड करा बटणावर क्लिक करून सीए ॲक्सेस करू शकतो.
टीप: कृपया json डाउनलोड आणि अपलोड करण्यासाठी तुम्ही ई-फाइलिंग पोर्टलवर उपलब्ध असलेल्या युटिलिटीची नेहमी नवीनतम आवृत्ती वापरत असल्याचे सुनिश्चित करा.
8. सिस्टीमवर फॉर्म 10B ची पडताळणी करण्यासाठी कोणत्या पद्धती उपलब्ध आहेत?
फॉर्म 10B (निर्धारण वर्ष 2023-24 नंतर) यासाठी पडताळणी करायच्या पद्धती:
- सीएसाठी, फॉर्म अपलोड करण्यासाठी फक्त DSC पर्याय उपलब्ध आहे.
- करदात्यांसाठी (लेखापरीक्षण करणारी व्यक्ती) कंपन्यांव्यतिरिक्त, सीएने अपलोड केलेला फॉर्म स्वीकारण्यासाठी DSC आणि EVC दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
- कंपन्यांसाठी, सीएद्वारे अपलोड केलेला फॉर्म स्वीकारण्यासाठी केवळ DSC पर्याय उपलब्ध आहे.
9. पुन्हा अधिसूचित फॉर्म 10B च्या संदर्भात प्रश्न क्र.3 मध्ये उल्लेखित केल्याप्रमाणे "परदेशी योगदान" चा काय अर्थ आहे?
नियम 16CC आणि नियम 17B साठी, परदेशी योगदान (नियमन) अधिनियम, 2010 (2010 च्या 42) च्या कलम 2 च्या उप-कलम (1) च्या खंड (h) मध्ये "विदेशी योगदान" या शब्दाचा समान अर्थ असेल.
10. सारणी असलेल्या अनुसूचींसाठी अर्थात "तपशील जोडा" पर्याय आणि "CSV अपलोड करा" हे दोन्ही पर्याय वापरून कशा प्रकारे नोंदी प्रदान कराव्यात?
"तपशील जोडा" आणि "CSV अपलोड करा" या दोन्ही पर्यायांसह अनुसूचीसाठी, कृपया खालील गोष्टी लक्षात घ्या:-
- 50 पर्यंतच्या नोंदींसाठी: सारणी किंवा CSV पर्यायाचा वापर केला जाऊ शकतो. दोन्हीं प्रकरणांमध्ये माहिती सारणीमध्ये दिसून येईल.
- 50 पेक्षा जास्त नोंदींसाठी: केवळ CSV पर्यायाचा वापर केला जाऊ शकतो. माहिती CSV जोडपत्राच्या रूपातच दाखविली जाईल.
- 'CSV पर्याय अपलोड करा' वापरताना, खालील स्टेप्सचे अनुसरण करा:-
“एक्सेल टेम्प्लेट डाउनलोड करा ->नोंदी जोडा -> एक्सेल टेम्प्लेट .csv फाइलमध्ये परिवर्तित करा ->.csv फाइल अपलोड करा”
- जेव्हा CSV फाइल अपलोड केली जाते तेव्हा ती काही विद्यमान नोंदी/डेटा असेल तर त्यांची जागा व्याप्त करते. जुन्या नोंदी हटवल्या जातील आणि नवीनतम CSV द्वारे अपलोड केलेल्या नोंदीच ग्राह्य धरल्या जातील.
11. फाॅर्म फाइल करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सूचना किंवा मार्गदर्शन उपलब्ध आहे का?
होय, सीए फॉर्म 10B (निर्धारण वर्ष 2023-24 पासून पुढे) याच्या युटिलिटीमधील सूचना फाइल डाउनलोड करू शकतात.
12. नवीन फॉर्म 10B लागू असल्यास ताळेबंद, नफा आणि तोटा विवरणपत्र तसेच कर लेखा परीक्षण अहवाल कोठे अपलोड करायचा आहे?
लेखापरीक्षकाला सहाय्यक दस्तएवजांसह ई-फाइलिंग पोर्टलवर फॉर्म सबमिट करताना 3CA/3CB अंतर्गत ताळेबंद, नफा व तोटा लेखा आणि लेखापरीक्षण अहवाल PDF किंवा ZIP फाइलमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.
"विविध जोडपत्रे" नावाचा एक पर्यायी जोडपत्रे पर्याय देखील आहे, जेथे इतर कोणतेही संबंधित दस्तऐवज संलग्न केले जाऊ शकतात.
कृपया लक्षात घ्या की, प्रत्येक दस्तऐवजाचा आकार 5MB पेक्षा जास्त नसावा आणि सर्व जोडपत्रे एकत्रितपणे 50MB पेक्षा जास्त नसावीत. याशिवाय सर्व जोडपत्रे फक्त PDF/ZIP फॉरमॅटमध्येच असावीत आणि ZIP फोल्डरमधील सर्व फाइल्स फक्त PDF फॉरमॅटमध्ये असाव्यात.
13. फाइल केलेल्या फाॅर्म 10B (निर्धारण वर्ष 2023-24 पासून पुढे) मध्ये सुधारणा करता येते का?
होय, फाइल केलेला फॉर्म 10B साठी सुधारणेचा पर्याय उपलब्ध आहे.
14. फॉर्म 10B फाइल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली, असे कधी मानले जाते ?
सीएद्वारे सादर केलेला फॉर्म करदात्याकडून स्वीकारला जातो आणि ई-फाइलिंग पोर्टलवर नोंदणीकृत सक्रिय DSC किंवा EVC द्वारे त्याची पडताळणी केली जाते तेव्हाच फॉर्म फाइल झाला आहे असे मानले जाते.
15. फॉर्म 10B ची ऑफलाइन युटिलिटी भरण्यासाठी अनुसूचीचे पॅनल केव्हा उपलब्ध होतील?
वापरकर्त्याने फॉर्ममधील इतर पॅनल पूर्ण केल्यानंतरच अनुसूचीचे पॅनल भरण्यासाठी उपलब्ध होतील.
16. वापरकर्त्याने मागील वर्षी फॉर्म 10B फाइल केला आहे, निर्धारण वर्ष 2023-24 पासून पुढे फॉर्म 10B किंवा 10BB पैकी कोणता फॉर्म फाइल करणे आवश्यक आहे?
आयकर दुरुस्ती (तिसरी दुरुस्ती) नियम, 2023 द्वारे नियम 16CC आणि नियम 17B मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. मागील निर्धारण वर्षांमध्ये कोणताही फॉर्म फाइल केला असला तरी, निर्धारण वर्ष 2023-24 पासून पुढे फॉर्म 10B किंवा फॉर्म 10BB यांची लागू करण्याची क्षमता सुधारित नियम 16CC आणि नियम 17B यांच्या आधारे निश्चित केली जाईल.
17. फॉर्म 10B (A.Y. 2023-24 पासून पुढे) फाइल केल्यानंतर फाइल केलेल्या फॉर्मचे तपशील कोठे पहायचे ?
सीए आणि करदात्याच्या लॉगिनमध्ये फाइल केलेल्या फाॅर्मचे तपशील पाहिले जाऊ शकतात यासाठी ई फाइल टॅब ---→ आयकर फॉर्म्स---→ फाइल केलेले फॉर्म्स पहा ---→ 'आयकर अधिनियम 1961 नुसार फॉर्म्स' वर जा.
18.जर माझे उत्पन्न हे कर आकारण्यायोग्य नसलेल्या कमाल रकमेपेक्षा जास्त नसले तरीदेखील मला फॉर्म 10B फाइल करावा लागणार का?
फॉर्म 10B लागू करण्याची क्षमता निश्चित करण्यासाठी, आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 10 मधील खंड (23C) च्या दहाव्या परंतुकातील खंड (b) तसेच कलम 12A(1) मधील खंड (b) च्या उपखंड (ii) यांच्या संबंधित तरतुदी, आणि त्यासोबत वाचावयाचे आयकर नियम, 1962 मधील नियम 16CC व नियम 17B यांचा संदर्भ घ्यावा.
19. फॉर्म 10B फाइल करताना मला त्रुटी दिसत आहेत उदाहरणार्थ सबमिट करण्यात अयशस्वी किंवा "कृपया खालील त्रुटींमध्ये दुरुस्ती करून पुन्हा सबमिट करा: संपूर्ण नावासाठी अवैध फॉरमॅट, अवैध फ्लॅग/इनपुट/फ्लॅट/पत्ता, कृपया वैध टक्केवारी/पिनकोड" इत्यादी.
फाइलिंग सुरू करण्यापूर्वी, तुम्ही खालील स्टेप्सची खात्री करू शकता ज्यामुळे तुम्हाला फॉर्म यशस्वीरित्या सबमिट करण्यात मदत होईल, जसे की,
- सीए आणि करदात्याची प्रोफाइल सर्व अनिवार्य तपशीलांसह अपडेट केलेली असावेत.
- लागू असल्यास, मुख्य व्यक्तीचे तपशील अपडेट केलेले असावेत.
- JSON मध्ये कोणत्याही त्रुटीशिवाय JSON युटिलिटीमधून डाउनलोड केले असावेत.
- ई-फाइलिंग पोर्टलवर वैध JSON तयार करण्यासाठी आणि अपलोड करण्यासाठी डाउनलोड विभागात उपलब्ध असलेली नवीनतम युटिलिटी नेहमी वापरा.
20. मागील वर्षात कलम 13(3) मधील निर्दिष्ट व्यक्तींसोबत कोणताही व्यवहार झालेला नसला, तरीही आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 13(3) मध्ये नमूद केलेल्या निर्दिष्ट व्यक्तींचा तपशील फॉर्म 10B मधील अनुक्रमांक 41 मध्ये देणे अनिवार्य आहे का?
निर्दिष्ट व्यक्तींचे तपशील अनु.क्र.41 मध्ये देणे अनिवार्य आहे. यासंदर्भात दिनांक 9 ऑक्टोबर 2023 च्या परिपत्रक क्रमांक 17/2023 चा संदर्भ घ्यावा. उपलब्ध असल्यास संबंधित व्यक्तींचे तपशील नमूद करावेत.
21. A.Y. 2023-24 करिता फॉर्म 10B साठी कशा प्रकारे UDIN जनरेट करावा?
A.Y. 2023-24 पासून पुढे लागू असलेल्या पुन्हा-अधिसूचित फॉर्म 10B साठी, “UDIN तपशील पहा/अपडेट करा” या पर्यायात जाऊन "फॉर्म 10B - कलम 10(23C)(b)(iv)/(v)/(vi)/(via) आणि कलम 12A(1)(b)(ii) करिता दहावे परंतुक" हा फॉर्म निवडून UDIN जनरेट करता येईल.
22. तृतीय पक्ष सॉफ्टवेअर वापरून पुन्हा अधिसूचित केलेला फॉर्म 10B फाइल केला जाऊ शकतो का?
होय, तृतीय पक्ष सॉफ्टवेअर वापरून पुन्हा अधिसूचित केलेला फॉर्म 10B फाइल केला जाऊ शकतो.
23. फॉर्ममध्ये संदर्भित केलेल्या व्यवहारचे इलेक्ट्रॉनिक मोड कोणते आहेत ?
आयकर नियम, 1962 च्या नियम 6ABBA मध्ये संदर्भित केल्याप्रमाणे, इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये खालील मोड असतील:
(a) क्रेडिट कार्ड,
(b) डेबिट कार्ड,
(c) नेट बँकिंग,
(d) IMPS (इमिडिएट पेमेंट सर्विस)
(e) UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस),
(f) RTGS (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट),
(g) NEFT (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर),
(h) BHIM (भारत इंटरफेस फॉर मनी) आधार पे.