Do not have an account?
Already have an account?

फॉर्म 15CC

फॉर्म 15CC बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. फॉर्म 15CC म्हणजे काय?

कंपनी नसलेल्या अनिवासी व्यक्तीला किंवा परदेशी कंपनीला रेमिटन्स करणाऱ्या प्रत्येक अधिकृत विक्रेत्याने अशा रेमिटन्सचा त्रैमासिक तपशील फॉर्म 15CC मध्ये सादर करणे आवश्यक आहे.

2. फॉर्म 15CC सबमिट करण्याच्या कोणत्या पद्धती आहेत?

फॉर्म 15CC केवळ ऑनलाइन पद्धतीने सबमिट करता येतो. यासाठी ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर संबंधित फॉर्म निवडा, फॉर्ममधील आवश्यक माहिती भरून तो पूर्ण करा आणि सबमिट करा.

3. फॉर्म 15CC फाईल करण्यापूर्वी ITDREIN जनरेट करणे अनिवार्य आहे का?

होय. रिपोर्टिंग संस्थेद्वारे जोडलेल्या अधिकृत व्यक्तीला ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करून फॉर्म 15CC फाईल करण्यासाठी ITDREIN चा वापर करणे आवश्यक आहे

4. फॉर्म 15CC केव्हा फाईल करणे आवश्यक आहे?

ज्या आर्थिक वर्षाच्या तिमाहीशी संबंधित हे पेमेंट आहे, त्या तिमाहीच्या समाप्तीनंतर पंधरा दिवसांच्या आत हा फॉर्म आयकर विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्याकडे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे.

5. फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झाला आहे हे मला कसे समजेल?

ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या तुमच्या ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर तुम्हाला पुष्टीकरण प्राप्त होईल. तसेच, "कार्यसूची" मधील "तुमच्या प्रलंबित कृती" टॅबमध्ये जाऊन तुम्ही त्याची स्थिती देखील पाहू शकता.

6. फॉर्म 15CC सबमिट करण्यासाठी ई-पडताळणी आवश्यक आहे का? असल्यास, फॉर्म 15CC ची ई-पडताळणी कशी करावी?

होय. फॉर्म 15CC सादर करण्यासाठी ई-पडताळणी करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (DSC) वापरून ई-पडताळणी करावी लागेल.