सामान्य फ़ॉर्म
सामान्यतः वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. फॉर्म 3CB-3CD सादर करताना “UDIN” पेज प्रदर्शित होते. कर लेखापरीक्षण अहवाल अपलोड करण्यापूर्वी मी UDIN योग्यरीत्या प्राप्त केलेले असतानाही मला UDIN चा तपशील जोडता येत नाही. अशा परिस्थितीत मी “माझ्याकडे UDIN नाही / मी तो नंतर अपडेट करीन” हा पर्याय निवडावा का?
केवळ फॉर्म 15CB साठी UDIN च्या मोठ्या प्रमाणातील अपलोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा इतर फॉर्मसाठीही लवकरच उपलब्ध करून दिली जाईल. तोपर्यंत तुम्ही “माझ्याकडे UDIN नाही / मी तो नंतर अपडेट करीन” हा पर्याय निवडून फॉर्म फाईल करू शकता. सर्व फॉर्मसाठी UDIN सुविधा उपलब्ध झाल्यानंतर, तुम्ही पोर्टलवर जाऊन UDIN चा तपशील अपडेट करू शकता.
2.मी फॉर्म 10B फाईल करून सबमिट करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, सबमिट करताना “ARN चा फॉरमॅट वैध नाही” असा त्रुटी संदेश प्रदर्शित होत आहे. अशावेळी मी काय करावे?
फॉर्म 10B दाखल करण्यापूर्वी कृपया “माझे प्रोफाईल” विभागातून तुमची प्रोफाइल अपडेट करा आणि सर्व अनिवार्य माहिती भरलेली असल्याची खात्री करा. प्रोफाइलमधील तपशील अपडेट केल्यानंतर पुन्हा लॉगिन करून फॉर्म सबमिट करण्याचा प्रयत्न करा.
3. मला फॉर्म 67 का सबमिट करावा लागतो?
भारताबाहेरील एखाद्या देशात किंवा निर्दिष्ट प्रदेशात भरलेल्या परदेशी कर क्रेडिटचा दावा करावयाचा असल्यास तुम्हाला फॉर्म 67 सबमिट करणे आवश्यक आहे. तसेच, चालू वर्षातील तोटा मागील वर्षांच्या उत्पन्नाशी समायोजित केल्यामुळे परदेशी कराचा परतावा मिळत असल्यास आणि त्या कराचा क्रेडिटचा पूर्वीच्या कोणत्याही वर्षात दावा केला असेल, तर अशा परिस्थितीतही तुम्हाला फॉर्म 67 सबमिट करणे आवश्यक आहे.
4. फॉर्म 67 कोणत्या पद्धतींनी सबमिट करता येतो?
फॉर्म 67 केवळ ई-फायलिंग पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीनेच सबमिट करता येतो. ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर, फॉर्म 67 निवडा, फॉर्म तयार करा आणि तो सबमिट करा.
5. फॉर्म 67 चे ई-पडताळणी कशी करता येते?
तुम्ही EVC किंवा DSC चा वापर करून फॉर्मची ई-पडताळणी करू शकता. अधिक माहितीसाठी ‘ई-पडताळणी कशी करावी’ ही उपयोगकर्ता पुस्तिका पाहू शकता.
6. माझ्या वतीने फॉर्म 67 दाखल करण्यासाठी मी अधिकृत प्रतिनिधी नियुक्त करू शकतो का?
होय, तुम्ही तुमच्या वतीने फॉर्म 67 फाईल करण्यासाठी अधिकृत प्रतिनिधी नियुक्त करू शकता.
7. फॉर्म 67 फाईल करण्याची कालमर्यादा काय आहे?
फॉर्म 67 हा कलम 139(1) अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या उत्पन्नाचे विवरणपत्र फाईल करण्याच्या नियत तारखेपूर्वी फाईल करणे आवश्यक आहे
8. वैधानिक फॉर्म फाईल करताना मी जोडपत्रे अपलोड करण्याचा प्रयत्न करीत असताना पेजवर काही त्रुटी संदेश प्रदर्शित होतात. ई-फायलिंग पोर्टलवर जोडपत्रे अपलोड करताना मी कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्यात?
ही त्रुटी फाइलच्या नावासाठी वापरलेल्या नामकरण पद्धतीमुळे उद्भवू शकते. कृपया फाइलच्या नावामध्ये कोणतीही विशेष चिन्हे वापरणे टाळा आणि फाइलचे नाव लहान ठेवा. तसेच, जोडपत्राचा आकार 5 MB पेक्षा कमी असावा आणि जोडपत्राचे स्वरूप केवळ PDF किंवा ZIP असावे.
9. मला फॉर्म 29B अपलोड करता येत नाही. मी फॉर्म 29B कसा फाईल आणि सबमिट करू शकतो?
फॉर्म 29B ई-फायलिंग पोर्टलवर उपलब्ध आहे. हा फॉर्म करदात्याने त्यांच्या सीए यांना असाइन करणे आवश्यक आहे.
एकदा करदात्याने फॉर्म असाइन केल्यानंतर, सीए ला त्याच्या/तिच्या कार्यसूचीमध्ये हा फॉर्म ॲक्सेस करता येईल.
10. फॉर्म सबमिट करताना पेजवर “अवैध मेटाडाटा” असा त्रुटी संदेश प्रदर्शित होत आहे. मी काय करावे?
अशी त्रुटी कायम राहिल्यास, निवडलेला करदाता, फायलिंगचा प्रकार (मूळ / सुधारित) किंवा निर्धारण वर्ष हे तुमच्या लॉगिन तपशीलांशी सुसंगत नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील नमूद केलेल्या घटकांमध्ये कोणतीही विसंगती नसल्याची खात्री करून घ्यावी.
11.मला निर्धारण वर्ष 2021-22 साठी फॉर्म 29B फाईल करता येत नाही. पेजवर “सबमिशन अयशस्वी: अवैध इनपुट” असा त्रुटी संदेश प्रदर्शित होत आहे. अशावेळी मी काय करावे?
“लेखापालाचा अहवाल”मधील भाग 3 रिक्त ठेवल्यास ही समस्या उद्भवते. संबंधित क्षेत्र लागू नसल्यास, “लेखापालाचा अहवाल” मधील परिच्छेद 3 खाली दिलेल्या मजकूर चौकटीत “लागू नाही” नमूद करून फॉर्म पुन्हा सबमिट करण्याचा प्रयत्न करावा.
12. मला निर्धारण वर्ष 2021-22 साठी फॉर्म 29B फाईल करता येत नाही. पेजवर “ARN चा फॉरमॅट वैध नाही” असा त्रुटी संदेश प्रदर्शित होत आहे. अशावेळी मी काय करावे?
वापरकर्त्याचे “प्रोफाइल” योग्यरित्या अपडेट न केल्यास ही समस्या उद्भवू शकते. कृपया फॉर्ममध्ये भरलेली माहिती आणि तुमच्या प्रोफाइलमधील माहिती यांमध्ये कोणतीही विसंगती नसल्याची खात्री करा. प्रोफाइल अपडेट केल्यानंतर, ई-फायलिंग पोर्टलवर पुन्हा लॉगिन करा आणि पुन्हा प्रयत्न करा.
13.फॉर्म 29B फाईल करताना, भाग C (वाढविणे किंवा कमी करणे आवश्यक असलेल्या रकमेचा तपशील) मध्ये मी पुस्तकी नफ्यात वाढ किंवा घट करण्यासाठी आवश्यक असलेल्या रकमा प्रविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, फॉर्म ऋण मूल्ये स्वीकारत नाही. अशावेळी मी काय करावे?
बहुधा तुम्ही फॉर्म 29B च्या जुन्या ड्राफ्टचा वापर करत आहात. कृपया तो ड्राफ्ट डिलीट करून नवीन फॉर्म फाईल करा.
14. कलम 10AA अंतर्गत फॉर्म 56F फाईल करताना पेजवर त्रुटी संदेश प्रदर्शित होत आहेत. 29 डिसेंबरच्या अधिसूचनेनुसार फॉर्म 56F रद्द करण्यात आला असून त्याऐवजी (फक्त पुनर्गुंतवणुकीच्या तपशीलांसाठी) फॉर्म 56FF लागू करण्यात आला आहे. तथापि, कलम 10AA सह वाचावयाच्या कलम 10A मधील तरतुदींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत मला फॉर्म 56F फाईल करणे आवश्यक आहे का?
दोन्ही फॉर्म पोर्टलवर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत. आयकर विभागाने जारी केलेल्या अधिसूचना / मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच अधिनियम / नियमांमधील लागू तरतुदींनुसार तुम्ही संबंधित फॉर्म फाईल करू शकता.
15. मी फॉर्म 10E कधी फाईल करावा?
तुमचे आयकर विवरणपत्र फाईल करण्यापूर्वी फॉर्म 10E फाईल करणे आवश्यक आहे.
16. फॉर्म 10E फाईल करणे अनिवार्य आहे का?
होय, तुमच्या थकबाकीच्या उत्पन्नावर किंवा आगाऊ प्राप्त उत्पन्नावर कर सवलतीचा दावा करावयाचा असल्यास फॉर्म 10E फाईल करणे अनिवार्य आहे.
17. मी फॉर्म 10E फाईल न करता माझ्या ITR मध्ये कलम 89 अंतर्गत सवलतीचा दावा केल्यास काय होईल?
जर तुम्ही फॉर्म 10E फाईल केला नाही, परंतु तुमच्या ITR मध्ये कलम 89 अंतर्गत सवलतीचा दावा केला, तर ITR वर प्रक्रिया केली जाईल; तथापि कलम 89 अंतर्गत दावा केलेल्या सवलतीला परवानगी दिली जाणार नाही.
18. माझ्या ITR मध्ये दावा केलेली सवलत आयकर विभागाने (ITD) नामंजूर केली आहे हे मला कसे कळेल?
तुम्ही कलम 89 अंतर्गत दावा केलेली सवलत नामंजूर झाल्यास, तुमच्या ITR वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयकर विभागाकडून कलम 143(1) अंतर्गत जारी करण्यात येणाऱ्या सूचनेद्वारे तुम्हाला याची माहिती दिली जाईल.
19. आर्थिक वर्ष 2019-20 साठी फॉर्म 10E फाईल करताना मला उत्पन्नाचा तपशील जोडता येत नाही. मी काय करावे?
तुम्ही निर्धारण वर्ष 2021-22 साठी फॉर्म 10E फाईल करत असल्याची खात्री करा. निर्धारण वर्ष 2021-22 साठी फॉर्म 10E फाईल करण्यासाठी ई-फाईल >आयकर फॉर्म्स >आयकर फॉर्म्स फाईल करा >आयकर अधिनियम, 1961 नुसार फॉर्म्स >फॉर्म 10E > आता फाईल करा वर क्लिक करा. त्यानंतर निर्धारण वर्ष म्हणून 2021-22 निवडा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
20. मी निर्धारण वर्ष 2021-22 साठी ITR फाईल करत आहे. फॉर्म 10E फाईल करताना मी कोणते निर्धारण वर्ष निवडावे?
तुम्ही निर्धारण वर्ष 2021-22 साठी आयकर विवरणपत्र फाईल करत असल्यास, फॉर्म 10E सबमिट करतानाही निर्धारण वर्ष 2021-22 निवडणे आवश्यक आहे.
21. फॉर्म 10E फाईल करताना मला निर्धारण वर्षासाठी लागू असलेले कर दिसत नाहीत. मी पुढे कसे जावे?
सर्व उत्पन्नाचा तपशील भरलेला असल्याची खात्री करा (तक्ता A मधील मागील वर्षाच्या उत्पन्नाच्या तपशीलांसह). लागू कर रक्कम स्लॅब दरानुसार आपोआप प्रदर्शित केली जाईल. पोर्टलवर उपलब्ध असलेल्या तपशीलांनुसार उत्पन्न तुमच्या गणनेशी जुळते का ते पडताळून पाहा आणि संबंधित तक्त्यामध्ये कराची रक्कम नमूद करा.
22. फॉर्म 10BA सबमिट करताना पेजवर “त्रुटी: कृपया वैध मूल्ये प्रविष्ट करा.” असा त्रुटी संदेश प्रदर्शित होत आहे. मी काय करावे?
फॉर्म सबमिट करताना ही समस्या उद्भवत असल्यास, प्रोफाइल अपडेट करण्यासाठी नमूद केलेल्या सर्व स्टेप्स पूर्ण केल्याची खात्री करा. तसेच, "ड्राफ्ट डिलीट करा"वर क्लिक करून फॉर्मचा जुना ड्राफ्ट डिलीट करा. त्यानंतर ई-फायलिंग पोर्टलवर पुन्हा लॉगिन करून प्रयत्न करा.
23.फॉर्म 35 सबमिट करताना अपील शुल्काच्या चलनाचा तपशील भरताना पेजवर “प्रकरणानुसार भरलेले अपील शुल्क ₹250, ₹500 किंवा ₹1000 यांपैकी कोणतीही एक रक्कम असणे आवश्यक आहे.” असा त्रुटी संदेश प्रदर्शित होत आहे. अशावेळी मी काय करावे?
4 थ्या पॅनेलवर, म्हणजेच "अपीलाचे तपशील" वर क्लिक करा.
- "निर्धारण करण्यात आलेल्या उत्पन्नाची रक्कम" यासारखी अनिवार्य माहिती नमूद केलेली असल्याची कृपया खात्री करा.
- TDS अपीलच्या बाबतीत, “लागू नाही” असे निवडता येईल.
ही माहिती अपडेट केल्यानंतर 7 व्या पॅनेलवर, म्हणजेच “अपील फायलिंग तपशील” मध्ये जा आणि चलनाचा तपशील डिलीट करून पुन्हा प्रविष्ट करण्याचा प्रयत्न करा.
24. फॉर्म 10IC फाईल करताना मी “फॉर्म 10-IB मध्ये कलम 115BA(4) अंतर्गत पर्यायाचा वापर करण्यात आला आहे का?” या प्रश्नासाठी “होय” निवडले होते. तरीदेखील “मागील वर्ष” आणि “फॉर्म 10-IB फाईल केल्याची तारीख” ही आधी भरलेली फिल्ड्स दिसत नव्हती. मी काय करावे?
आयकर फॉर्म्स फाईल करा” मध्ये सेव्ह केलेला फॉर्म 10-IC चा ड्राफ्ट डिलीट करून फॉर्म नव्याने फाईल करावा.
25. फॉर्म 10IC फाईल करताना मी “फॉर्म 10-IB मध्ये कलम 115BA(4) अंतर्गत पर्यायाचा वापर करण्यात आला आहे का?” या प्रश्नासाठी “होय” निवडले आहे. तथापि, “मी याद्वारे... रोजी कलम 115BA(4) अंतर्गत वापरण्यात आलेला पर्याय मागे घेत आहे” या निवेदनासमोरील चेक बॉक्स सेव्ह होत नाही. मी काय करावे?
आयकर फॉर्म्स फाईल करा” मध्ये सेव्ह केलेला फॉर्म 10-IC चा ड्राफ्ट हटवून फॉर्म नव्याने फाईल करण्यास सुरुवात करावी.
26. फॉर्म 10-IB फाईल करताना कंपनीचे मूलभूत तपशील “माझे प्रोफाइल” मधून योग्यरित्या स्वयंचलितपणे भरले गेले नाहीत. मी काय करावे?
आयकर फॉर्म्स फाईल करा” मध्ये सेव्ह केलेल्या फॉर्म 10-IB चा ड्राफ्ट हटवून फॉर्म नव्याने फाईल करावा.
27. फॉर्म 10-ID फाईल करताना “निर्धारण अधिकारी” यांचा तपशील “माझे प्रोफाइल” मधून स्वयंचलितपणे भरला जात नाही. मी काय करावे?
आयकर फॉर्म्स फाईल करा” मध्ये सेव्ह केलेला फॉर्म 10-ID चा 'ड्राफ्ट' डिलीट करून फॉर्म नव्याने फाईल करावा.
28. सबमिशन अयशस्वी” असा त्रुटी संदेश प्रदर्शित होत असल्यामुळे मला फॉर्म 10DA सबमिट करता येत नाही. मी पुढे कसे जावे?
आयकर फॉर्म्स फाईल करा” मध्ये आधीच सेव्ह केलेला जुना फॉर्म मागे घ्यावा किंवा डिलीट करावा आणि फॉर्म नव्याने फाईल करण्यास सुरुवात करावी. पडताळणी पॅनेलमधील पत्त्याच्या तपशीलांसह सर्व फील्ड्स पूर्णपणे अपडेट केलेली असल्याची खात्री करा आणि त्यानंतर फॉर्म पुन्हा सबमिट करण्याचा प्रयत्न करा.
29. माझा पॅन हा कर्नाटक सहकारी पतसंस्था अधिनियम, 1959 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी क्रेडिट बँक म्हणून नोंदणीकृत आहे. मला कलम 115BAD अंतर्गत कमी कराच्या दराचा पर्याय स्वीकारायचा आहे. सर्व अटी पूर्ण होत असूनही मला फॉर्म 10-IF फाईल करता येत नाही. अशावेळी मी काय करावे?
कलम 115BAD नुसार या कलमाचा लाभ केवळ सहकारी संस्थांनाच उपलब्ध आहे. बहुधा तुमची नोंदणी AOP ऐवजी कृत्रिम न्यायालयीन व्यक्ती म्हणून झालेली असू शकते. त्यामुळे फॉर्म 10-IF फाईल करण्याची सुविधा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत, NSDL मार्फत तुमचे तपशील अपडेट करून घेण्याची विनंती करण्यात येते.